46व्या अमेरिकी अध्यक्षांचे बिगुल (भाग 4 )

   
        सध्या समस्त जगत  करोनाच्या भीतीत जगत असताना जगात अनेक घडामोडी घडत आहेत . नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार ठरला जाणे , हि त्या यापैकीच एक होय . जगातील सर्वात बलाढ्य अश्या युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या या देशाच्या 46 व्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते. ,याकडे समस्त अमेरिकेचे लक्ष लागलेले आहे . गेल्या वर्षभरापासून सुरु असणारी ही प्रक्रिया आता अंतिम  टप्यात आली आहे . ही प्रक्रिया कशी असते ? याबाबत मी याच ब्लॉग मध्ये आधीच्या तीन पोस्ट मध्ये सांगितली आहे . ज्यांना ती बघायची असेल त्यांनी या पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे .
           तर मित्रानो , डेमोक्रेटिक पक्षातर्फे नुकतीच JOE  BIDEN  याना उमेदवारी जाहीर झाली आहे . रिपब्लिक पक्षातर्फे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानाच  उमेदवारी देण्यात येणार आहे . डेमोक्रेटिक पक्षातर्फ़े अनेक महिला उमेदवार अध्यक्षपदासासाठी उत्सुक होत्या , त्यामुळे जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या अध्यक्षपदी महिला येण्याची शकयता होती . मात्र  अमेरिकेत झालेल्या प्रायमरी आणि कॉक्कस   मध्ये त्या मागे पडल्या आणि ती संधी हुकली . आणि बराक ओबामा यांच्या काळात उपराष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या JOE  BIDEN  यांची डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवड करण्यात आली . सध्या ज्या जन्मात चाचण्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत त्यामध्ये Joe Biden यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निसटत्या बहुमताची अगदी मिळत आहे .या चाचण्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना 45ते 49%मते मिळत आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी  Joe Biden यांना 51 ते 55 % मते मिळत आहेत . मात्र ज्यांना अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीची गमंत माहिती आहे त्यांना popular votes आणि iletrol votes देखील माहिती असतीलच . त्यामुळे होणारी गंमत
आपण हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या वेळी बघितली होती .सबब याला किती महत्व देण्याचे हे सुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे .
                             भारताचा विचार करता दोन्ही पक्षांची इतिहास बघता भारताविषयक भूमिका जवळपास सारखीच आहे . मात्र वासरात लंगडी गाय  शहाणी या म्हणीनुसार माझ्या मते डेमोक्रेक्तिक थोडे उजवे आहेत असो अमेरिकेचा 46व राष्ट्राध्यक्ष ठरायला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत , थोड्याच दिवसात चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल . तो पर्यंत नमस्कार . .

 भाग पहिला
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_6.html
भाग दुसरा
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_47.html
भाग तिसरा
http://ajinkyatarte.blogspot.com/2019/11/blog-post_7.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?