रेल्वेची घौडदौड सुरुच

   
सध्या भारतीय रेल्वे विक्रमी गतीने बदलत आहे. गेल्या आठवड्याभरात रेल्वेने तीन गोष्टी केल्या. त्यातील एक गोष्ट विश्वविक्रम करणारी होती,  आणि दुसरी गोष्ट रेल्वेच्या कचऱ्याची स्वस्तात विल्हेवाट लावून वर दानाचे पुण्य देखील पदरात पाडून घेणारी होती , तर तिसरी गोष्ट रेल्वेचे हवेतील प्रदुषण कमी व्हावे ,यासाठी करावयाचा उपक्रमातील महत्तवाचा टप्पा होती .आता या तिन्ही गोष्टी टप्याटप्याने बघूया . सुरवात विश्वविक्रमाने
                                           तर मित्रांनो, या करोना काळात देखील रेल्वेमार्फत विविध प्रकारची कामे अव्याहतपणे सुरु आहेत. त्या अंतर्गतच वेस्टन डेडिकेटेड फ्रेड काँरीडर या मार्गाचे काम सुरु असताना हरीयाणा राज्यात मेवाड आणि गुरुग्राम  या दोन जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेमार्गावर अरवली पर्वतरांगेत एक किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला . जर हा बोगदा तयार करण्यात आला नसता, तर सुमारे 40ते55 किमीचा फेरा पडला असता . तूम्हाला कदाचित वाटू शकते एक किलोमीटरचा बोगदा तयार केला , यात काय विशेष ?कोकण रेल्वेत असे अनेक बोगदे सापडतील, तर मित्रांनो हा बोगदा विशेष लांब नसेलही, मात्र या बोगद्याची उंची आणि
रुंदी ही या बोगद्याला विशेष बनवते . मालगाडीचे एकावर एक असे  दोन कंटनेर  तेही इलेक्ट्रीक इंजिनामार्फत वाहून नेण्यात येणाऱ्या मालगाड्या जावू शकतील (इलेक्ट्रीक इंजिनाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा आणि डबा यांचा संपर्क होवून दुर्घटना होवू नये यासाठी डब्याचे छत आणि वीज वाहक तारा यामध्ये काही अंतर ठेवावे लागते .या वीज वाहक तारांचा वरती काही उंचीवर बोगद्याचे छत असते . डिझेल रेल्वे इंजिन यांना या वीज वाहक तारा नसल्याने इलेक्टीक इंजिन  धावणाऱ्या रेल्वेमार्गापेक्षा  डिझेल इंजिन असणाऱ्या रेल्वेमार्गावर बोगद्याचे छत थोडे कमी उंचीवर चालू शकते. हे यावेळी आपण लक्षात घेतले पाहिजे.जगात ज्या ठिकाणी रेल्वेमार्फत डबल कंटेनेर वाहतूक होते ती सर्व डिझेल रेल्वे इंजिनामार्फत होते . इलेक्ट्रीक नाही, हाही मुद्दा यावेळी विचारात घेणे आवश्यक आहे) इतकी उंची तसेच एकावेळी दोन ब्राँडगेज गाड्या सहजतेने जावू शकतील इतकी रूंदी या दोन बाबींमुळे हा बोगदा विश्वविक्रमी समजला जातोय .
                                             आता बोलूया रेल्वेने स्वस्तात मिळवलेल्या पुण्याविषयी . तर भारतीय रेल्वेने 27 जूलैला भारतीय रेल्वेसाठी जून्या तंत्रज्ञानावर आधारीत, ज्यांचे वापरण्याचे आयुष्य जवळपास संपल्यात जमा आहे, आणि जे सध्याचा भारतीय रेल्वेच्या संपुर्ण विद्युतीकरण करण्याचा मार्गात अडथळा ठरू शकतील अशी  'WDM 3D' या सिरीजची 10इंजिने बांगलादेश रेल्वेला दिली . ही सर्व रेल्वे इंजिने ब्राडगेज प्रकारची डिझेलवर चालणारी होती . या इंजिनाखेरीज डिझेलवर चालणारी मिटरगेज प्रकारची 10 डिझेल इंजिने बांगलादेशला भारताकडून हवी होती . मात्र या प्रकारची रेल्वे इंजिन भारताकडे उपलब्ध नसल्याने भारत ती बांगलादेशाला देवू शकला नाही . सध्या बांगलादेश रेल्वेला डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांची नितांत आवश्यकता आहे.तसेच भारतात सर्वत्र विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरु असल्याने डिझेल इंजिन ही भारतासाठी एक प्रकारची अडचणच आहेत. यागोष्टीचा फायदा उचलत हा व्यवहार झाला. .ही रेल्वे इंजिने भारतात 110किमी प्रती तास चालवता येवू शकत होती . मात्र बांगलादेशातील रेल्वे रुळांची स्थिती बघता ही इंजिने तिथे 50ते 60किमी प्रती तास या वेगानेच चालवावी लागतील .परीणामी हळू चालवल्या गेल्यामुळे त्यांचे वापरण्याचे आयुष्य वाढेल, आणि भारतीय रेल्वेसाठी निरोपयोगी ठरत असणाऱ्या या रेल्वे इंजिनांमुळे बांगलादेश रेल्वेला मदत होत असल्याने बांगलादेश वांसीयाचे आशिर्वाद मिळून भारतीय रेल्वेला स्वस्तात पुण्य मिळेल .
                                 आता तिसऱ्या मुद्याकडे वळूया . मित्रांनो रेल्वेमार्फत हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी रेल्वे मार्गाचे  विद्युतीकरण वेगाने सुरु असल्याचे आपणास माहिती आहेच, त्यातील एक भाग म्हणून भारतात सर्वाधिक डिझेल इंजिनांचा वापर असलेल्या राजस्थानातील महत्तवाचा रेल्वेमार्ग असणाऱ्या अजमेर ते नवी दिल्ली या मार्गाचे संपुर्णतः विद्युतीकरण पुर्ण करण्यात आले असून दोन प्रवासी गाड्यांची यशस्वी चाचणी 27 आणि28 जूलै रोजी घेण्यात आली.
                    मित्रांनो, भारतीय रेल्वे झापाट्याने कात टाकत आहे, हे वरील विवेचनातून आपणास समजले
असेलच . दिवसोंदिवस अधिक वेगाने भारतीय रेल्वे बदलत आहे, माझ्या मते जे आता तीस ते पस्तीस वर्षांचा दरम्यान  आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी किंवा त्यांंच्या आईवडीलांनी बघीतलेली रेल्वे येत्या पाच ते दहा वर्षात ओळखू सुद्धा येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात बदललेली असेल, अर्थात हे बदल चांगले की वाईट हे आता तरी सांगता येणे अवघड आहे. येणाऱ्या काळावरच हा निर्णय सोडणे योग्य ठरेल . हे बदल सकारात्मकच ठरो, अशी पवित्र अस्या श्रावण महिन्यात इश्वरचरणी प्रार्थना करून आपली रजा घेतो,नमस्कार.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?