वाढदिवस एका मराठी म्हणीचा

 
आपल्या मराठीला म्हणी वाक्यप्रचार यांचा प्रचंड साठा लाभलेला आहे . यातील काही म्हणी, या लोकांच्या अनुभवातून, समाजाच्या चालीरितीतून जन्माला आलेल्या आहेत . तर काही म्हणी, वाक्यप्रचारांचा उदय होण्यामागे एखादी ऐताहासिक घटना कारणीभूत आहे. जसे पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील हानीमुळे सर्वश्व नाहीसे होणे यासाठी उदयास आलेली पानिपत होणे ही म्हण अथवा खुप मोठा पराक्रम केल्यास त्याचे वर्णन करायला वापरली जाणारी अटकेपार झेंडा रोवणे ही म्हण  .
               1758साली आँगस्ट महिन्याच्या दहाव्या तारखेला झालेल्या अटकेच्या विजयाच्या  घटनेमुळे समस्त भारतीयांना आणि अफगाणिस्तानातील 1989पर्यत (युनाटेड सेव्हीयत  सोशालिस्ट रशियाने आक्रमण करण्यापर्यत) सत्ताधिश असणाऱ्या  सत्ताधिशांना मराठी सत्ता काय चीज आहे हे समजले. येत्या सोमवारी अर्थात 10आँगस्ट 2020रोजी या घटनेला तब्बल 262 वर्षे पुर्ण होत आहे .त्या निमित्ताने समस्त मराठी भाषिक जनतेला वंदन .
               

सन 1962रोजी चीनने भारतावर आक्रमण केल्यावर महाराष्ट्रीयन असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या देशसेवेचा नेहमी दाखला देण्यात येतो. तो महान आहेच , मात्र याही घटनेच्या 204वर्षे आधी सुद्धा आक्रमक असणाऱ्या अफगाणि सत्तेला आपल्या तलवारीचे पाणी पाजत त्यांनी जिंकलेल्या अटक या गावातील सिंधू नदीच्या काठावरील किल्यावर भगवे निशाण फडकवले होते . याच दिवशी या घटनेच्या तीन वर्षे आधी जन्मलेल्या नारायण पेशव्याला एकप्रकारे ही वाढदिवसाची भेट मिळाली होती असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही .मी याच्या आधी एकदा नारायण पेशव्यावर लिहलेले आहे .त्याची लिंक याचा खाली देण्यात आली आहे .
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात 10आँगस्ट रोजी घडलेली घटना म्हणून नव्हे तर एक मराठी भाषिक म्हणून मला ही घटना खुप आवडते . यामुळे उत्तर भारतात मराठी सत्तेचा दरारा निर्माण झाला , मात्र या घटनेनंतर जेमतेम 3वर्षांनी हरीयाणातील पानिपत येथे झालेल्या पराभवामुळे याचा पुरेपुर फायदा आपणास घेता आला नाही हेही तितकेच खरे .
                  आपल्या पराक्रमाच्या जोरावर दिल्लीवर जर कोणी आक्रमण केले तर बादशहाच्या संरक्षणाची जवाबदारी स्विकारणाऱ्या मराठी सत्तेसाठी हा विजय खुपच मोठा होता , हे नाकारुन चालणार नाही . 
या घटनेकडे बघताना या घटनेच्या आधी याच अफगाणी शासकाला आपण एकदा धूळ चारली होती .त्यावेळी  मराठी सत्तेची धहशत बसून अन्य उत्तर भारतीय शासकांनी त्यास जाणून बुजून बोलावले , तेव्हा  आपण अटक जिंकले मात्र त्यास पुन्हा माघारी जिवंत सोडले , या उपकाराची परतफेड या अफगाणी सत्ताधिशाने त्या नंतर अडीच वर्षाने जानेवारी 1761रोजी हरीयाणातील पानिपतच्या युद्धात केली, हा इतिहास विसरुन चालणार नाही .याबाबतीत  with due all respectपृथ्वीराज चौहान यांचे बलीदान व्यर्थ गेले , असेच दुर्देवाने म्हणावे लागते .असो .मात्र या घटनेमुळे मराठीतील म्हणींचा खजिन्यात एका म्हणीची भर पडली हे उत्तमच नाही का? अशी मराठीतील म्हणीच्या खाणीत सातत्याने भर पडो , अशी सदिच्छा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार
माझ्या नारायणराव पेशवे यांच्यावरील लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?