पर्यावरणाबाबत आपण जागृत कधी होणार ?

               मित्रांनो, आपल्या भारतातील देशपातळीवरील  इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्या सुशांतसिंग राजपुत यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांबरोबर स्वतःचा स्वतंत्र अस्या तपासात मग्न असताना, आपल्या देशावर भविष्यात  दुरगामी परीणाम करतील अस्या दोन.घटना जगात घडत आहे, माझे आजचे लेखन त्यासाठी 
                 तर मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरीका या देशातील कँलिफोर्निया या राज्यात प्रचंड असा वणवा लागलेला आहे . आजमितीस तो वणवा कँलिफोर्निया या राज्यचा शेजारील नेवाडा या राज्यात देखील पसरला आहे . मित्रांनो कँफिलोर्निया या राज्यातील जंगले उत्तर अमेरीका खंडातील प्रमुख जंगले आहेत, आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातील प्रमुख जंगलात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे . काही महिन्यांपुर्वी दक्षीण अमेरीकेतील अँमेझाँनच्या जंगलामध्ये वणवा लागलेला होता, तो शांत होतोच न होतो तोच आँस्टोलिया या देशात वणवा लागला . आँस्टोलिया येथील वणव्यामधून मानव उशांत घेत असताना सबैरीया येथे वणवा लागला .तो धुमसत असतानाच आता उत्तर अमेरीका खंडात वणवा  पेटलेला आहे .पृथ्वीच्या 7खंडापैकी 4खंडातील वनसंपदा वणव्यात जळून गेली आहे .ज्यामध्ये दक्षीण अमेरीका, आँस्टोलिया, आशिया , उत्तर  अमेरीका या खंडाचा समावेश होतो. आता युरोप आणि आफ्रिका आणि अंटार्टिका हे तीन खंड वणव्याचा भक्ष्यस्थानी पडण्याचे बाकी आहेत . मात्र मानवाच्या गेल्या अनुभवांवरुन तेही लवकरच वणव्याचा भक्ष्यस्थानी पडतील असे जगातील शास्त्रज्ञांना वाटत आहे. देव करो आणि अशी वेळ न येवो. 
                           जगात झपाट्याने बदलत जाणारे हवामान, नागरी वस्तीसाठी अधिकाधीक जागा मिळावी  यासाठी वनजमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनियंत्रीत तसेच निष्काळजीपणे पुरेसी काळजी न घेता केल्या जाणाऱ्या उपाययोजना ही या मागची कारणे आहेत, असे पर्यावरणीय शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. माध्यमांमधून बदलते हवामान याविषयी काय माहिती दिली जाते, हे आपण जाणतातच .असो.
                                    एकिकडे कँलिफोर्नियामध्ये वणवा पेटलेला असताना आफ्रिका खंडातील सागरी जैववैवधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे . आफ्रिका खंडाच्या पुर्व किनाऱ्यावर असणाऱ्या हिंदी महासागरातील माँरीशियस या भारतीयांची बहुसंख्येने असणाऱ्या बेटस्वरुपातील देशाच्या पुर्व किनाऱ्यावर हा धोका निर्माण झाला आहे . आणि त्याला कारणीभूत ठरली आहे की, एक जपानी जहाज कंपनी . या कंपनीच्या तेलवाहतूक करणाऱ्या जहाजातून तेल सांडल्याने या देशाच्या किनाऱ्याचा प्रदेशातील जैवश्रुष्टी धोक्यात आली आहे .  भारत फ्रान्स , जपान या देशांचे नूकसान कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत . हा लेख लिहित असताना त्या जहाजाचे दोन तूकडे झाल्याने धोका अधिकच वाढला आहे . माँरीससच्या किनाऱ्यापासून समुद्रात हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे .(सदर जहाज किनाऱ्यावर उभे राहिले तर दिसू शकते इतक्या अंतरावर आहे ) मुख्यतः सागरी पर्यटनावर अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशाचे अक्षरशः.कंबरडे यामुळे मोडले आहे .समुद्राच्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने  हे जपानी जहाज किनाऱ्याजवळचा उथळ दलदलीच्या प्रदेशात रुतले , आणि कलंडले , तेथून या प्रसंगाची सुरवात झाली .  ज्याचे परीणाम फार मोठ्या जनसमुहाला भोगावे लागत आहे .असो
आपल्या मानवी इतिहासात मानवाने अनेक संकटावय यशस्वी मात केल्याचे दिसले आहे . याही संकटावर मांव यशस्वी मात करेल असा विश्वास व्यक्त करून सध्यापुरते आपली रजा घेतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?