हा विक्रम अभिमानास्पद नाही !

         
      सध्या भारतीय करोनाच्या धास्तीत जगत असताना त्याही पेक्षा धक्कादायक बातमी नुकतीच भारतीय हवामान खात्यामार्फत जाहिर करण्यात आली . जेव्हापासून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली, त्यापासूनच्या आतापर्यतचा विचार केला असता जमू काश्मीर  या केंद्रशासित प्रदेशमधील कुपवारा  येथे आँगस्ट महिन्यातील सर्वाधिक 17 आँगस्ट रोजी  तापमान नोंदवले गेले , तसेच प्रमाणे श्रीनगर येथे देखील गेल्या 39 वर्षातील सर्वाधिक तापमान  नोंदवले गेले आहे.अशी ती बातमी होती .सध्याच्या हवामान बदलाच्या काळात या बातमीला विशेष महत्त्व आहे . 
             
 गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण हवामानात होणारे बदल तिव्रतेने अनुभवत आहोत . नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात पडणारा पाउस , हिवाळ्यात पडणारी असाह्य थंडी, उन्हाळ्यात नोंदवलेले जाणारे प्रचंड तापमान, पावसाची येण्याची तारीख उशीरा होणे , कमी वेळात जास्त पाउस पडण्याचा प्रसंगामध्ये वाढ होणे यासारखे बदल आपण अनुभवत आहोत . मात्र या बदलांना सामोरे जाताना ज्या गतीने पाउले उचलायला पाहिजे , त्या गतीने आपण पाउले उचलत नाहीये , दुर्दैवाने असो .
                   भारत सोडून ईतर देशांच्या निवडणूकीकडे बघीतले असता, तेथील पक्षाच्या जाहिरनाम्यात पर्यावरण रक्षणाचा मुद्दा असतो . आपल्याकडे काय मुद्दे असतात, हे आपण जाणतातच .  दरवर्षी डिसेंबर महिन्यात पर्यावरण रक्षणाच्यासाठी जागतिक पातळीवर काँन्फरस आँफ पार्टीझ् (जी काँप या नावाने प्रसिद्ध आहे) ही परीषद होते .जीचे वार्तांकन करताना आपण भारतीय प्रतिनिधी काय बोलले इतकेच करतो, अन्य देशांचे प्रतिनिधी काय मुद्दे मांडत आहेत याकडे काहीसे दुर्लक्ष करतो .जेव्हा आपंण या मुद्याकडे सजगतेने लक्ष देवू , त्याचवेळी आपण पर्यावरण रक्षण करतोय , असे म्हणण्यास अर्थ आहे . 

                           हिंदींम़ध्ये एक म्हण आहे "जान है, तो जहान हे!" त्यानुसार बोलायचे झाल्यास पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे .कारण पर्यावरण नसेल तर मानवजात सुद्धा नसेल . फक्त महाविद्यालयीन स्तरावर अथवा शालेय स्तरावर पर्यावरण हा एक अभ्यासाचा विषय सध्या आहे, मात्र एक अभ्यासयाचा विषय या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून प्रत्यक्ष कृती करायची नितांत आवश्यकता आहे .असो.  भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा आणि लोकसंख्येची प्रचंड घनता असणारा देश असल्याने थोड्यास्याही हवामान बदलाचा परीणाम खुप मोठ्या लोकसंख्येवर होतो . त्यामुळे भारतीय नागरीकांनी हवामान बदलाबाबत अत्यंत जागरूक राहिले पाहिजे . 
आपल्या पृथ्वीचे हवामान अत्यंत गुंतागुतीचे आहे .आँस्टोलियाचा पुर्व किनाऱ्याचा जवळ असणाऱ्या अल् निनो आणि ला निना या समुद्र प्रवाहाचा भारतीय मान्सुमवर होणारा परीणाम सर्वश्रुत आहेतच . तसेच याचा आँस्टोलियाचा हवामानावर देखील परीणाम होतो, त्याचप्रमाणे युरोपात आल्पर्स पर्वतरांगेत पडणाऱ्या बर्फामुळे फ्रान्समधील हिवाळा आणि भारतीय पावसावर परीणाम  होतो .थोडक्यत पृथ्वीवरील सर्व हवामान एकमेकांशी जोडलेले आहे .त्यामुळे जगभरातत हवामानात काय बदल होत आहेत, त्याचा भारतावर काय परीणाम होइल, याबाबत प्रत्येकाने जागरुक होवून माहिती घेणे अत्यावश्यक आहे .
मित्रांनो, आपल्या मानवजातीला पृथ्वीबाहेर राहता येवू शकते का ?, याबाबतचे संशोधन  आजमितीस सन 2020मध्ये अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे ,परीणामी आपणास पृथ्वीवरचे पर्यावरण वाचवणे अत्यंत आवश्यक आहे . कारण त्यामुळेच ही सजीवश्रुष्टी वाचू शकते .आपण याबाबत काहीना काही कार्यवाही करत असालाच. त्याची गती वाढवूया .आणि या पृथ्वीचे ढासळते हवामान अजून ढासळण्यापासून थांबवूया .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?