मानवा आता तरी जागा हो !

       

                 मी अनेकदा चँनेल न्युज एशिया, एन एच के वर्ल्ड, सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन    नविन माहिती मिळाल्या  .त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातम्या  शोधण्याचा प्रयत्न केला असता, ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी . या  बातमीच्या  लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत  दोन्ही बातम्या हवामान बदल या विषयाशी संबधित आहेत .

तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट म्हणून सर्वाना परिचित असणाऱ्या ग्रीनलँड या बेटावरील बर्फ वितळण्याचा वेगाचा नवा उच्चांक झाल्यासंबंधी ती बातमी होती . बातमीत सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात  बर्फ वितळण्याचा वेग कमी झालेला असताना सन 2019 या वर्षी हा बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढल्याचे एका बातमीत सांगण्यात आले आहे . तर दुसऱ्या बातमीनुसार वाढत्या तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांचा शेतीचे उत्पादन करताना येणाऱ्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते . याच बातमीच्या पुढच्या अर्ध्या भागात शास्त्रज्ञांनी कर्बवायू शोषून घेणाऱ्या दोन यंत्रांच्या निर्मितीचे प्रयोग सूर केल्याचे सांगितले आहे . त्यात हे यंत्र दोन प्रकारे करता येईल असे सांगितले आहे 


       पहिल्या बातमीनुसार गेल्या वर्षभरात ग्रीनलँडचा 552 गीगाटन इतका बर्फ वितळला आहे . ज्यामुळे संपूर्ण युनिटेड किंगडम हा देश हा देश अडीच मीटर पाण्याखाली जाऊ शकतो .सन  2012 आणि गेल्या वर्षी ग्रीनलँड या बेटावर जेट स्ट्रीम या प्रवाहाचा  अधिक दाबाचा प्रवाह आल्याने त्याचा परिणाम स्वरूप ही बर्फ वेगाने वितळण्याची घटना घडली असे शास्त्रज्ञाचे मत आहे . मित्रानो आल्प्स पर्वतावरून वाहणाऱ्या दोन जेट स्ट्रीम पैकी पश्चिम दिशेला जेट स्ट्रीममुळे ही घटना घडली होती . पूर्व दिशेला जाणाऱ्या जेट स्ट्रीममुळे भारताच्या पावसावर परिणाम होतो हेही आपण या वेळी लक्षात घेयला हवे  ग्रीनलँडवरील  बर्फ वितळण्याचा   प्रकारातील सध्या अनुभवयास आलेला हा लाक्षणिय  बदल 1948 नंतर पहिल्यांदाच अनुभवत आहोत .

संपूर्ण जगाचा विचार  विचार करता महतवाची असणारी मुंबई , कराची , सिंगापूर  तसेच ऑस्ट्रोलिया या खंडातील बहुतांशी   शहरे ही समुद्रकिनारीच आहे . रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्याचा  जवळ समुद्रात आढळलेली भिंत ही समुद्राचे पाणी सातत्याने कोकणाचा घास घेत आहे . याचीच साक्ष देत आहेत . मात्र आपल्या  भारतीय वृत्तवाहिन्या एका सिने अभिनेत्याचा मृत्यूबाबत जेव्हढा काथ्याकूट करतात , त्याचा एक शतांश देखील सरकारकडून, समाजसेवी संस्थेकडून व्यक्तींकडून पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय केले जाते . त्याचा कितपत उपयोग होतो , यावर भाष्य करत नाही .

मित्रानो आज  ग्रीनलँड या युरोपातील बेटातील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढलाय . उद्या ही वेळ भारतावर देखील  येऊ शकते हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्यास सध्या बिहार ,आसाम पश्चिम बंगाल आधी प्रदेशात जे पूर आले आहेत , त्याचा कैक जास्त पटीने पूर येतील त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होतील, हे वेगळे सांगायला नकोच . सध्या मानवजात ज्या विषयांवर आपसात भांडत आहे , ते विषय सोडून मानवजातीने  पर्यावरण रक्षण या विषयावर एकत्र येणे अत्यावश्यक आहे . कारण जर मुळात जर मानव जातच अस्तित्वात नसेल तर भांडणार कोणाशी ? त्यामुळे म्हणावेसे वाटते  मानवा आता तरी जागा हो !

 बीबीसीच्या बातमीच्या  लिंक

https://www.bbc.com/news/science-environment-53849695

https://www.bbc.com/news/science-environment-53891414

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?