भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

         


  विविध 16 उपकंपन्यामार्फत  वेगवेगळ्या  प्रकारची देशसेवा करणाऱ्या,  तसेच विविध अश्या  17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेत सध्या अत्यंत जलद गतीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे ज्यामध्ये रेल्वेमार्गातील गेजचे विविध प्रकार नाहीसे करून भारतातील सर्व रेल्वे या ब्रॉडगेज या एकाच स्वरूपात आणणे, सर्व रेल्वेचे विद्युतीकरण करणे . उत्पनाचे विविध मार्ग शोधणे  आदी गोष्टींचा समावेश करावा लागेल याच बदलाच्या मालिकेत गेल्या पंधरवड्यात  देशाच्या प्रगतीला वेगाने चालना देणाऱ्या 2 गोष्टी महाराष्ट्रात तर एक गोष्ट केरळ या राज्यात घडली . माझे लेखन  आजचे या बदलाची माहिती देण्यासाठी 
            तर मित्रानो,  गेल्या पंधरवड्यात आपल्या महाराष्ट्रातील नाग विदर्भ ( विदर्भातील नागपूर विभागीय आयुक्ता  लयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला नाग विदर्भ म्हणतात . तर अमरावती आयुक्तालयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला वऱ्हाड म्हणतात ) प्रदेशातील गोंदिया -छिनवाडा आणि नागपूर -  जबलपूर या  दोन मार्गाचे नॅरोगेजचे रूपांतरण ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करण्यासह या मार्गाचे विद्यतीकरण पूर्ण करण्यात आले आहे . दोन्ही मार्गावरील रेल्वे सुरक्षा विभागाची चाचणी सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . त्यामुळे जेव्हा करोनमुळे घालण्यात आलेली बंधने दूर होऊन रेल्वेसेवा पूर्ववत होईल , त्यावेळी या मार्गावर ब्रॉडगेजचे विद्युत रेल्वे इंजिन धावायला लागेल . या पूर्वी या दोन्ही मार्गावर डिझेलवर चालणारे मीटरगेज इंजिन धावत असे .


 

हे  दोन्ही मार्ग ज्या क्षेत्रातून जातात ते मार्ग खनिज साधनसंपत्ती आणि वनसंपदेने समृद्ध आहेत . मात्र  वाहतुकीच्या सोइसुविधा आधुनिक नसल्याने हा भाग विकासाच्या शर्यतेत खूपच मागे पडला होता आणि नक्षलवादाच्या बळी ठरला होता . जे ग्रहण आता दूर होण्यास सुरवात झाल्याने . या भागात सुद्धा विकासाची गंगा वाहण्यास सुरवात होईल देशाच्या मध्यभागातून हे दोन्ही मार्ग जात असल्याने देशाचा उत्तर आणि दक्षिण भाग अधिक जवळ येतील .  पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजन अंतर्गत हे दोन्ही बदल होत आहे . ( नागपूरला मध्य रेल्वेची सुद्धा एक डिव्हिजन आहे )असो

           एका बाजूला देशाच्या मध्य भागात हे बदल घडत असताना देशाचा दक्षिण भागात देखील खूप सकारत्मक बदल घडत आहे . दक्षिण रेल्वेच्या पल्लकड या डिव्हिजनमधील टोकुर ते सोन्नुर या दोन रेल्वेस्टेशन दरम्यान रेल्वेच्या  कंटनेर वाहतुकीसाठी  वापरण्यात येणाऱ्या  वॅगनमार्फत ट्रकची  वाहतूक करण्याचा  प्रयोगाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे . याला रोल अँड रॉल असे म्हणताता .  ही सेवा रअँड रो या नावाने विशेष प्रसिद्ध आहे . आपल्या भारतात या आधी ही सेवा कोकण रेल्वेत विशेष प्रचलित होती .त्या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे भारतीय रेल्वे या प्रकारची सेवा भारतात अन्यत्र सुरु करण्याचा विचार करत आहे . त्याचाच एक भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली ,

 
या सेवेमुळे रस्त्यामार्गे वाहतूक करताना निर्माण होणारे धोके कमी होतील .  तसेच वाहतुकीच्या खर्चात देखील प्रचंड प्रमाणात घट होईल . आणि डिझेलचा वापर कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल ,रेल्वेच्या महसुलात वाढ होईंल  अशी करणे रेल्वे या मागे देत आहेत . त्यातील किती करणे खरी ठरतात हे येणार काळच ठरवेल . 
                 मात्र आपली आशिया खंडातील पहिली  150वर्षाहून जुनी असणारी भारतीय रेल्वे प्रकाशाचा वेगाने बदलत आहे हे मात्र नक्की . येत्या पाच ते सहा महिन्याचा आढावा घेतल्यास दर दहा ते पंधरा दिवसांनी रेल्वेच्या बाबतीत मोठे बदल घडत  असल्याची एक तरी बातमी येतेच . अन्य सरकारी विभागापेक्षा या  विभागातील बदल अत्यंत वेगाने घडत आहे .  रेल्वेत होणारे हे बदल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच मात्र तूर्तास इतकेच नमस्कार 




           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?