मानवा तूझे काउंटडाऊन सुरु झाले आहे .

         

     सध्या समस्त भारतीय वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याचा मृत्यबाबत पोलिसांच्यापेक्षा अधिक गतीने तपास करत असताना मानवजातीचे पृथ्वीवरचे दिवस भरले असल्याचे सुचित करणाऱ्या अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र भारतीय  वृत्तवाहिन्या याबाबत काहीच बातम्या दाखवताना दिसत नाहीये .
तर मित्रांनो मी सदर लेखन करत असताना भारताच्या बिहार , आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांसह पाकिस्तानातील सिंध प्रांत(त्यातही कराची शहर) आणि उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका आदी देशात बदलत्या हवामानाने तेथील प्रशासनाला अक्षरशः.रडकुंडीला आणले आहे. बिहार ,आसाम, हिमाचल प्रदेश , गुजरात ,सिंध आदी भागात अत्यंत कमी वेळात पडलेल्या अतिमुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात पुर आलेले आहेत . तर उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, अमेरीका आदी देशात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेच्या आलेल्या वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले आहे, आणि हे सर्व घडत आहे , जगात तिव्रतेने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे .

                             सध्याचा हवामान बदलाचा वेग बघून, हवामानशास्त्रज्ञांंनी या आधीच आमचे ज्ञात हवामानशास्त्र आता संपले असून,  आता आपल्या सर्वांचा अज्ञात हवामानशास्त्रातील प्रवास सुरु झाले असल्याचे जाहिर केले आहे, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे . मात्र जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या भारतासह,  जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या आपल्या दक्षिण आशियातील अन्य देशांची हवामान बदलाला सामोरे जाण्याची तयारी अत्यंत तूटपुंजी आहे, हे सर्वश्रुत आहेच. दक्षीण आशियातील बहुसंख्य देश हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या भारतावरच अवलूंबून आहेत . भुतान बांगलादेश आणि मालदीव, नेपाळ ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे म्हणून बघता येतील  
                                बदलत्या हवामानामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढणार असल्याची बातमी बिबिसीने केली असल्याचे आपणास माहिती असेलच .याचा आपल्या शेतीवर आणि शेतकऱ्यांवर विपरीत परीणाम होणार , हे वेगळे सांगायलाच नको.

                                ज्या संस्कृतीचा शोध लागून या 2020 साली 100वर्षे पुर्ण होत आहे. त्या सिंधू संस्कृतीचा (काही ठिकाणी या संस्कृतीचा उल्लेख हरप्पा संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असा देखील होतो ) ऱ्हास होण्यमागे एक प्रमुख कारण बदलते हवामान होते,  हे आपण लक्षात घेयला हवे . हवामान बदलाला सामोरे कसे जायचे ? या एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करायची वेळ आता आली आहे . कारण जर मानवजातच जर नसेल तर आपण जात, धर्म , वंश, वर्ण, भाषा, देश, प्रांत, गरीब,श्रीमंत आदी मुद्द्यावरुन भांडणार तरी कुणाशी ?
                           मित्रांनो, पृथ्वीवर विषवृत्तापासून  उत्तरेकडे आणि दक्षिशणेकडे  पाच अक्षवृत्तापासून  साडे तेवीस अक्षवृत्तापर्यंत उन्हाळ्यात समुद्रात चक्रीवादळे तयार होतात . (त्याला विविध स्थानिक नावे आहेत , जसे अमेरीकेत त्याला हरीकेन , चीन , कोरीया ,आदी प्रदेशात टायफून तर भारतात चक्रीवादळ म्हणतात. सर्वसामान्यपणे ही वादळे tropical cyclone म्हणून ओळखली जातात  ) गेल्या काही वर्षातील या वादळांचा आढावा घेतला असल्यास त्याची तिव्रता अत्यंत जलद गतीने वाढत आहे. ज्यामुळे या भागात अत्यंत कमी वेअ ळात अतिशय जास्त पाउस तसेच  अती वेगात वारे वाहण्याचा घटनांमध्ये वाढ होत आहे . जगाचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्या याच भागात रहाते. त्यामुळे मानवाची पृथ्वीवर राहण्याची उलटी गणती सुरु झाली आहे , असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र आपण सध्या काय करत आहोत ते सर्वांनाच माहिती आहेच .
                तरी अजूनही आपल्या हातातून वेळ पुर्णपणे निघून गेली आहे, असे समजण्याचे कारण नाही , मात्र आपल्यासाठी करा अथवा मरा , ही वेळ आल्याचे निश्चितपणे म्हणता येईल . हवामान बदल हा विषय अनेक पाश्चात्य देशातील निवडणूकीच्या अजेंड्यावर आलेला आहे . तसाच तो लवकरात लवकर भारतीय निवडणूकीत सुद्धा येवो असी या चार्तुमासात इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?