भारतीय रेल्वेची घोडदौड सुरूच


 जगात चौथ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी, ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढ्या व्यक्तींची दररोज वाहतूक करणारी भारतीय रेल्वे सध्या वायुवेगाने बदलत आहे . रोज नवनवीन कीर्तिमान रेल्वेकडून केले जात आहेत , हे आपण जाणतातच . मग तो कधी जगातील विश्वविक्रम करणारे पूल बांधणे असो, अथवा मालवाहतूक वेगवान व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असो किंवा प्रवाश्याना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी केलेली उपाययोजना असो . भारतीय रेल्वे कायमच प्रगतीच्या वाटेवर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे . माझे आजचे लेखन यातील काही बाबींची दखल घेण्यासाठी . 
तर मित्रानो , नुकतेच देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद्योगिकदृष्ट्या शा ओडिशा या राज्याच्या देशातील औद्योगिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या भागाशी जोडला जाईल 


आपली विविध रेल्वेस्थानके प्रवाश्यांच्या गर्दीने सतत ओसंडून वाहत असतात मात्र ती प्रवाश्याना आवश्यक ती सोयीसुविधा देण्यामध्ये जागतिक दर्जाचा विचार करता खूपच मागे आहेत याचा विचार करून रेल्वेमार्फत 50 रेल्वेस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचे ठरवले आहे . त्याच्याच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी 5 स्थानकाची नवे रेल्वेने जाहीर केली असल्याचे आपणास माहिती असेलच . त्याचाच एक भाग म्हणून पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या बिहारमधील 5 स्थानकाची नावे  रेल्वेने  दोन तीन दिवसापूर्वी केली आहे .ज्यामध्ये राजेंदनगर टर्मिनल, मुज्जफरनगर, गया जंक्शन, बेगुसऱ्य , सिंगरोली यांच्या समावेश होतो . यासासाठी रेल्वेमार्फत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलेले असून स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम सध्या सुरु आहे.  तसेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चे सुशोभीकरण कसे करायचे याचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचे नूतनीकरण करण्यासाठी रेल्वेने 1642 कोटी रुपयाची तरतूद केली आहे 
रेल्वेमार्फत विविध विश्वविक्रम करून काश्मीर आणि ईशान्य भारतातात बांधण्यात येणाऱ्या पुलांबाबत पुढच्या पोस्टमध्ये बोलेल तो पर्यंत नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?