विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की झाले अजून गहन ?


आपल्या भोवताली असणाऱ्या अथांग अश्या विश्व निर्मितीचे कोडे उलगडले की अजून गहन झाले ? असा प्रश्न पडावा अस्या घडामोडी नुकत्याच खगोलशास्त्रात घडल्या . त्याविषयी आपल्याकडे इंडियन एक्सप्रेस सारख्या काही इंग्रजी वृत्तपत्रे सोडून अन्य माध्यमांनी फारशी दखल घेतलेली नाही . आपल्याकडे इंग्रजी भाषेतील माध्यमांपेक्षा  प्रादेशिक भाषेत माहिती देणाऱ्या माध्यमांना  काहीसे अधिक महत्व असल्याने मराठी या प्रादेशिक भाषेत तो शोध सांगण्यासाठी आजचे लेखन . या लेखाच्या शेवटी मूळ इंडियन एक्सप्रेस या  वृत्रपत्रातील लेखाची लिंक दिली आहे . ज्यांना या शोधाची मुळातून माहिती हवी आहे, अश्या व्यक्ती त्या  लिंकवर क्लिक करून मुळातून लेख वाचू शकतात  

  तर .मित्रानो , आपल्या पृथ्वीपासून  17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे . शास्त्रज्ञांनी या जागेला GW190521 असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्वीय लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत आता आपल्या पर्यंत पोहोचल्या आहेत विश्वाचे वय साधारणतः 17ते  20 अब्ज असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . त्या हिशोबाने विश्व जन्मला आल्यावर लगेच ही घटना घडलेली असावी . हे वेगळेपण इथेच संपत नाही . या आधी जे जे कृष्णविवर शोधण्यात आले आहेत त्यांचे वस्तुमान आणि या दोन कृष्णविवराचे वस्तुमान यात कमालीचे नाट्य आहेत . शास्त्रज्ञांनी या आधी 65 सौर वस्तुमाना (सूर्याच्याएकूण वस्तुमानाच्या 65 पट ) पेक्षा कमी वस्तुमान असणारी कृष्णविवरे अथवा हजारो वस्तुमान असणारी कृष्णविवरे शोधलेली आहेत मात्र सौर वस्तुमानाच्या 65 ते 120 पट वस्तुमान असणारी कृष्णविवरे शोधली नव्हती .जी दोन कृष्णविवरे शोधण्यात आलेली आहेत त्यांचे वस्तुमान 66आणि  85 सौर वस्तुमान आहे तर या दोन्हींचा एकत्रीकरणातून तयार झालेल्या नव्या कृष्णविवराचे वस्तुमान 144 सौर वस्तुमान आहे . या दोन्ही कृष्णविवराच्या एकत्रीकरणातून ज्या वस्तुमानाच्या नाश झाला त्याच्या गुरत्त्वीय लहरी निर्माण झाल्या ज्या ओळखून याचा शोध लागला 

हा शोध आल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार विश्वात आहेत अशी मान्यता असणाऱ्या गुत्त्वीय लहरींमुळे लागला  . आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी ही संकल्पना मांडल्यावर सुमारे शतकभर कालावधी उलटून गेल्यावर सन  2015 मध्ये शास्त्रज्ञांना याचे ठोस पुरावे मिळाले . त्यानंतर विश्वात सर्वत्र या गुरुत्त्वीय लहरी आढळून आल्या आहेत . अमेरिका देशातील LIGO आणि इटली देशातील VIRGOया प्रयोगशाळांनी एकत्रितरित्या शोधला असल्याचे नुकतेच  Physical Review Letters,   आणि The Astrophysical Journal Letters, या दोन विद्न्य विषयाला वाहिलेल्या मासिकांमध्ये जाहीर करण्यात आले (मी जाणून बुजून या परिच्छेदात इंग्रजी भाषेतील शब्द तसेच ठेवले आहेत ) असो 

आपल्या मराठीत ज्याला विज्ञान म्हणता येईल अश्या प्रकारची   माहिती देणारी (पुराणातील वांगी पुराणात  . हे तत्व अनुसरून ) फारशी माध्यमे नाहीत . तो भरून काढण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न तुम्हला आवडला असेल अशी आशा करून सध्यापुरते थांबतो , नमसकार 


मूळ इंडियन एक्सप्रेसच्या लेखाची लिंक 

https://indianexpress.com/article/explained/black-hole-merger-ligo-virgo-6581811/ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?