बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग5)

                     

    सध्या आपल्या भारतात करोना साथीच्या काळात बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात निवडणूकीचे पडघम वाजत असताना जगातील एक क्रमांकाची महासत्ता असणाऱ्या अमेरीकेच्या 46व्या अध्यक्षासाठी 2020 नोव्हेंबर 3 रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत एक मुद्दा भलताच गाजत आहे, तो म्हणजे पोस्टामार्फत होणारे मतदान.(माझी ही अमेरीकेच्या 46व्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीसंदर्भात 5वी पोस्ट आहे . ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायचा आहेत, ते या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करु शकतात )
                   हा मुद्दा समजण्यासाठी आपणास काही बाबी माहिती असणे आवश्यक आहे, त्यापुढीलप्रमाणे .
अमेरीकेत आपल्या भारताप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग नाहीये , त्याठिकाणी प्रत्येक राज्य स्वतंत्र्यपणे राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर निवडणूका घेते .परीणामी प्रत्येक राज्याची निवडणूक घेण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे. अमेरीकेत कोणत्याही निवडणूकीत सुमारे 50% मतदान होते.  हा मजकूर लिहित असताना (2020 सप्टेबर 12) जगातील सर्वात जास्त करोना रुग्ण अमेरीकेत आहेत . त्यामुळे जर एखाद्या बुथवर एकत्र जमून मतदानाची प्रक्रिया पार पडली तर करोनाचा धोका अजून वाढू शकतो, असी भिती व्यक्त केली जातीये. किंवा मतदानाची टक्केवारी अजून घसरू शकते . या करोनाच्या समस्येवर मात करण्यासाठी मतदान पोस्टामार्फत करण्यात यावे असा मुद्दा मांडण्यात येत आहे आणि नाट्य घडतेय ते इथेच     

         
          मी वर सांगितल्याप्रमाणे अमेरीकेतील प्रत्येक राज्याची स्वतंत्र्य निवडणूक यंत्रणा असल्याने या पोस्टल मतदानाच्या देखील प्रमुख तीन पद्धती आहेत .पहिल्या पद्धतीत काही प्रमाणात इलेक्ट्रीक माध्यमांचा वापर होतो,त्या पद्धतीविषयी वाद नाहीये , दुसऱ्या पद्धतीमध्ये इलेक्ट्रीक आणि पारंपारीक पद्धतीचा एकत्रीत वापर होतो, तर तिसऱ्या प्रकारात पुर्णतः पारंपारीक पद्धतीचा वापर होतो ,वादाची ठिणगी पडते आहे ,ती दुसऱ्या आणि तिसऱ्या पद्धतीमुळेच .
           सध्या प्रसिद्ध होणाऱ्या जनमत चाचणीत सातत्याने कमी कमी मतदान होत असल्याचे दिसत असल्याने असेल कदाचित रिपब्लिकन पक्ष आणि त्या पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टल मतदानाच्या वाढत्या मागणीवर टिकेची झोड उठवली आहे, सध्या ज्या प्रमाणात पोस्टल मतदानाची मागणी होत आहे , ती पुर्ण केल्यास ही निवडणूक अमेरीकेच्या इतिहासातील गैरमार्गाचा अवलंब केल्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरेल या प्रकारच्या निवडणूकीत बोगस मतदार मतदान करुन खऱ्या अमेरीकेच्या मतदाराचे प्रतिनिधीत्वावर अयोग्य परीणाम करेल,असी  रिपब्लिकन पक्षाची  भुमिका आहे . त्यासाठी सत्तेचा वापर करत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  अमेरीकेतील केंद्रीय पोस्ट खात्याचा प्रमुखावर दबाव टाकत असल्याचे डेमोक्रेट्रीक पक्षाचे म्हणणे आहे .रिपब्लिक पक्षाने यामुळे निवडणूकीची प्रक्रिया किमान सहा महिने ते एक वर्षापर्यत चालेल,असी टिका केली आहे . डेमोक्रेटीक पक्षाचे या बाबत म्हणणे आहे की मतपत्रीका जमा करण्याचा कालावधी आणि ठिकाण यांची निश्चिती केल्यास हा धोका टाळला जावू शकतो.
                  आजमितीस अमेरीकेतील अध्यक्षपदाची निवडणूक यामुळे अत्यंत रंजक अवस्थेत पोहोचली आहे . येत्या सुमारे दिड महिन्यात ही धामधुम संपून चित्र पुर्णतः स्पष्ट झालेले असेल . माझा वेळोवेळी यातील घडामोडी सांगण्याचा प्रयत्न असेलच , तूर्तास इतकेच नमस्कार 
              ताजा कलम : अमेरीकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील महत्तवाचा टप्पा असलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांची समोरासमोर बसून चर्चा (Presidential debat) येत्या 29 सप्टेंबर, 15 आँक्टोबर आणि 29 आँक्टोबरला आहे .
(सौजन्य :ब्रिटीश ब्राँडकास्टींग कंपनी) 
चोथ्या भागाची लिंक 

तिसऱ्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 

पहिल्या भागाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?