कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद



सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चिला जाणाऱ्या मुद्यामध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय हा प्रमुख मुद्दा आहे . केंद्र सरकारकडून लादल्या गेलेल्या कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद आता उमटत आहे .  याबाबत मराठी वृत्तवाहिनीवर फारशी माहिती देण्यात न आल्याने त्या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . ही माहिती द प्रिंट आणि व्हियॉन या माध्यमातून घेतलेली आहे . त्याचा लिंक या लेखाच्या खाली पोस्ट केल्या आहेत जिज्ञासू त्या भागू शकतात .
तर मित्रानो ज्या बांगलादेशाबरोबर ईशान्य भारताच्या विकासासाठी भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत त्या बांग्लादेशाबरोबर कांदा या पिकावरून भारताचे संबंध काहीसे तणावपूर्ण बनले आहेत . भारतीय कांद्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील  सर्वात मोठा ग्राहक  हा बांगलादेश आहे . हे पण लक्षात घेयला हवे , तर बुधवार दिनांक 2020 सप्टेंबर 16रोजी  बांगलादेशचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शह्ररिअर आलम (Shahriar Alam )  यांनी तीव्र शब्दात या बंदीबाबत नापसंती दाखवली .बांगलादेशने या आधीच तुर्कस्तान आणि इजिप्त या देशातून कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे  ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात तेथून जहाजे येतील असेही त्यांनी ढाका येथील पत्रकार परिषदेत सांगितले 

2019 ऑक्टोबर महिन्यात देखील बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारत दोऱ्यावर आलेल्या असताना देखील कांद्याचा भारतीय राजकारणात वापर होतो , ज्याचा बांगलादेशाला त्रास होतो . जर हे असेच चालू राहिले तर बांगलादेशला वेगळा विचार करावा लागेल असेही त्यांनी  आपल्या हिंदी भाषेतील भाषणात सुनावले होते . गुरुवारी देखील बांगलादेशाचे भारतातील हाय कमिशनर मोहमदद इम्रान यांनी भारताच्या परराष्ट्र खात्याला या बाबत डिप्लोमॅटिक नोट पाठवली आहे . ज्यांना एखाद्या देशाचे आंतरराष्ट्रीय सबंध कसे असतात , हे माहिती असतात त्यांना यातील गांभीर्य लक्षात येईल .पुढे असणाऱ्या सणाचा पार्श्वभूमीवर भारतात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या हिल्सा माश्याची 1457 टन निर्यात भारताला करण्याची तयारी बांगलादेश करत असताना भारताने हि निर्यात थांबवल्याने बांगलादेश भारतावर काहीशा नाराज आहे . 
बांगलादेश ज्या देशातून कांदा आयता करू इच्छितो त्या इजिप्त आणि तुर्कस्तान पैकी,  तुर्कस्तान या देशाची काश्मीर विषयक भूमिका पाकिस्तानच्या भूमिकेशी जवळीक साधणारी आहे . ही बाब दुर्लक्षून चालणार नाही .,महाराष्ट्रातील कळीचा मुद्दा असणाऱ्या या मुद्यावर येत्या दोन तीन दिवसात सर्वमान्य तोडगा निघेल अशी अशा व्यक्त करून साध्यपुरते थांबतो , नमस्कार 


 व्हियॉन  ची लिंक

https://www.wionews.com/videos/gravitas-bangladesh-onion-crisis-328250

द प्रिंट ची लिंक 

https://theprint.in/diplomacy/bangladesh-asks-india-to-resume-onion-exports-upset-over-breach-of-unwritten-understanding/504489/







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?