मनुष्याची वाटचाल वेगाने अंताकडे

 

गेल्या 3 आठवड्यात आपल्या भारतात एका अभिनेत्याचा मृत्यूबाबत  वृत्तवाहिन्या हिरीहिरीने वार्तांकन करत असताना समस्त पृथ्वीवरील मानवजातीच्या छातीत धस्य व्हावे , अश्या  चार घटना चार वेगवेगळ्या खंडात घडल्या.त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . 
                 तर मित्रांनो,  उत्तर अमेरीका खंडातील कँलिफोर्नियाच्या जंगलातील आग तसेच आशिया खंडातील सैबेरीयाच्या पश्चिमेला आर्क्टिक प्रदेशात लागलेली आग मोठे प्रयत्न करून देखील विझत नाहीये. त्याचप्रमाणे  गेल्या वर्षाभरापुर्वी लागली तसीच आग दक्षिण अमेरीकेतील अँमेझाँनचा जंगलात लागली आहे. या आगींमुळे पृथ्वीवरील तापमान वाढवणाऱ्या ग्रीन हाउस गँसचे प्रमाण प्रचंड वाढणार असल्याची भिती या विषयातील जाणकार व्यक्त करत आहे .हे कमी काय म्हणून युरोप खंडातील ग्रीनलँड येथील तसेच हिमालयातील नेपाळ भारत सिमेवर उगम पावणाऱ्या कोसी,  गंडक या नद्यांच्या उगम क्षेत्रातील  आणि  नेपाळ तिबेट सिमेवरील बर्फ वितळण्याचा  वेग झपाट्याने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .कोसी गंडक या बिहार राज्यातील प्रमुख नद्या आहेत . जर झपाट्याने बर्फ वितळून या नद्यांना अचानक मोठे पूर आले ,आणि त्यानंतर या नद्या पाण्याअभावी कोरड्या पडल्यास एका फार मोठ्या लोकसंख्येवर परीणाम पडु शकतो.
            दरवर्षी डिसेंबर महिन्यात काँन्फरस आँफ पार्टिज (जी COP या नावाने प्रसिद्ध आहे )  नावाची हवामान बदलाविषयी काय करावे ? याविषयी एक परीषद होते . मात्र  गेल्या कित्येक वर्षापासून होणाऱ्या परीषदेमध्ये निव्वळ कागदी ठराव पारीत केले जातात. प्रत्यक्षात काहीच कार्यवाही केली जात नाही . अमेरीकेसारखे दर व्यक्तीचा विचार करता सर्वाधिक प्रदुषण करणारा देश, मात्र एकुण प्रदूषणाचा विचार करता लोकसंख्या जास्त असल्याने तसेच अर्थव्यवस्था विकसीत होत असल्याने काहीसे जास्त ,मात्र दर व्यक्तीचा विचार करता नगण्य प्रदुषण करणाऱ्या भारत आणि चीन या देशांचा  बागुलबुवा उभा करत स्वतःवर काहीही बंधने लादून घेत नाही .परीणामी नेमोची येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी काँन्फरस आँफ पार्टिज ची परीषद पार पडते . 

           रशियातील जंगले जगाच्या एकुण जंगलांपैकी 20%आहेत . रशियाच्या जंगलांपैकी बहुतांश जंगल सैबिरीयात आहे .दक्षिण अमेरीकेतील अँमेझाँनचा जंगलांना  पृथ्वीचे फुफ्फुस समजण्यात येते, आणि हा मजकूर लिहीत असताना दोन्ही जंगले मोठ्या प्रमाणात जळत आहेत . दोन्ही ध्रुवांनंतर जगातील सर्वात जास्त गोड्या पाण्याचा साठा हिमालयात आहे. जो बहुतांशी बर्फाचा स्वरुपात आहे .जो झपाट्याने नष्ट होत आहे .
            या 2020 वर्षामध्ये अमेरीकेच्या पुर्व किनाऱ्यावर उष्ण कटिबंधातील चक्रीवादळांनी (ज्यांना अमेरीकेत हरीकेन असे म्हणतात) बऱ्यापैकी नुकसान केले असल्याने तसेच अमेरीकेच्या पश्चिम किनाऱ्यावर लागलेल्या वणव्यामुळे बऱ्यापैकी लोकांना विस्थापित व्हावे लागल्याने अमेरीकेचा सुर कदाचित थोडा नरमाईचा लागू शकतो. मात्र तो जर लागला नाही तर मनुष्य जातीची उलटी गणना अत्यंत जोरात चालू आहे , आणि दिवसोंदिवस ती अधिकाधीक वेगाने होणार  हे स्पष्ट आहे त्यासाठी  कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही  .पृथ्वीबाहेर अवकाशात राहण्या संदर्भात होणारे सध्याचे संशोधन अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे .त्यामुळे ही पृथ्वी वाचवणे क्रमप्राप्त आहे . हा लेख वाचणारे असंख्य जण त्याबाबत काहीना काही नक्कीच करत असणार , याबाबत मला शंका नाहीये. मी युरोपिय देशांच्या निवडणूकीत ज्या प्रमाणे बदलते हवामान हा विषय  पक्षाच्या जाहिरनाम्यात असतो, तश्याच प्रकारे भारतीय निवडणूका बदलते हवामान या विषयावर लढवल्या जाव्यात ,असी इश्वर चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार .
(या लेखासाठी WION आणि BBC या वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांची मदत घेतली आहे. अधिक माहितीसाठी सबंधित वृत्तवाहिन्या बघाव्यात)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?