पाकिस्तान 3 नव्या बदलाचा वाटेवर ?

 

    सध्या आपल्या भारतात एका बलात्कार च्या घटनेवरून वातावरण अतिशय तंग झाले असताना आपल्या भारताच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शत्रू राष्ट्रात अर्थात पाकिस्तानमध्ये तीन  वेगवेगळ्या घडामोडींनी अतिशय वेग पकडला आहे . एक घडामोड आहे . पाकिस्तानातील सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी उघडणे ही आहे . दुसरी घटना आहे , पाकिस्तानचे माजी पंप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात नव्या खटल्याचा प्रारंभ करण्याची तयारी करणे आहे तरतिसरी घटना आहे , पाकिस्तानने अनधिकृत रित्या ताब्यात ठेवलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाला स्वतंत्र प्रांताचा(provience ) दर्जा देणे ही आहे .  पाकिस्तानातील  घटना आता सविस्तर बघूया . प्रथम गिलगिट बाल्टिस्तान विषयी बोलूया . 
             तर मित्रानो, सन 1947 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून काश्मीरच्या पश्चिमेकडील आणि वायव्य दिशेला असणाऱ्या भागावर पाकिस्तानने अनधिकृत कब्जा केल्याचे आपणास माहिती असेलच . या पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या वायव्य भागाला गिलगिट बाल्टिस्तान म्हणतात .सन 1970 पर्यंत हा विभाग पाकिस्तानच्या आझाद काश्मीरचा भाग होता. सन  1970 साली पाकिस्तानने त्याला आझाद काश्मीरपासून वेगळे काढून त्याच्या स्वतंत्र विभाग तयार केला . ज्याला आता आतापर्यंत फेडरल ऍडमिस्ट्रेटिव्ह नॉर्दन टेरिटरी म्हणत असत (ज्याचे संक्षिप्त स्वरूप फेना होते ) ज्याची राजधानी गिलगिट  आहे या भागाला  स्वतंत्र विधिमंडळ आहे मात्र तिला अधिकार .असून नसल्यासारखे आहेत .  पाकिस्तानच्या संविधानानुसार हा विभाग औटोमॉम्स रिजन आहे . मात्र याचे सर्व नियंत्रण इस्लामाबाद येथून होते . पाकिस्तानच्या अन्य प्रांताप्रमाणे या भागाला सध्या अधिकार नाहीत . पाकिस्तानच्या मते आपण सदर भागाला राज्याचा दर्जा दिला तर त्यांचा काश्मीर विषयक दावा कमकुवत होईल . त्यामुळे पाकिस्तान या भागाला आतापर्यंत या भागाला स्वतंत्र प्रांताचा दर्जा देत नव्हता . 

       मात्र चीनच्या सहकार्याने सुरु झालेल्या चीन पाकिस्तान एकॉमोमिक कौरीदपूर जो CPECनावाने प्रसिद्ध आहे . त्या कामात अडचण नको , म्हणून आता गिलगिट बाल्टिस्तान या भागाला पाकिस्तान स्वतंत्र प्रांताचा दर्जा देत आहे . त्यासाठी पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या केंद्रीय विधिमंडळात 2/3 मतांनी प्रस्ताव संमंत होणे आवश्यक आहे . मात्र सत्ताधिकारी पक्षाला अर्थात तारिके इंसाफ या पक्षाला तितके संख्याबळ नसल्याने ते जमवण्याची तयारी सध्या पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान करत आहे . पाकिस्तानच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लष्कराने  , विरोधी पक्षांना  देखील या मुद्यावर सत्ताधिकारी पक्षाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे . हे करणे सोईकसार व्हावे यासाठी मुस्लिम बांधवांचा  शिया पंथाचे लोक अधिक असणाऱ्या गिलगिट बाल्टिस्थान  या भागात जाणूनबुजून पाकिस्तानच्या इतर भागातून मुस्लिम बांधवांचा सुन्नी पंथांचे लोक बसवून या भागातील लोकसंख्येचा समतोल बिघडवून टाकण्याचे काम गेल्या कोत्येक वर्षांपासून सुरु आहे . (पाकिस्तानला आपण मुस्लिम धर्मीय बांधवांचा देश म्हणत असलो तरी . पाकिस्तानचे अधीकृत नाव सुन्नी इस्लमिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे . अर्थात पाकिस्तानचा अधिकृत धर्म सुन्नी इस्लाम आहे . आपणास गिलगिट बाल्टिस्तान या भागात स्थानिकांवर ज्या अत्याचाराच्या घटना दिसतात त्या मागे हा सुन्नी आणि शिया या पंथातील वाद कारणीभूत असतो  )त्या संदर्भात येत्या दोन ते तीन आठवड्यात अत्यंत मोठ्या घडामोडी घडतील याकडे आपण लक्ष  देयाला हवे . 

आता पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी उघडणे या विषयी बोलूया तर येत्या 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचे सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्र येऊन इस्लमबाद येथे मोर्चा काढण्याचे ठरवत आहे . मात्र पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्र असलेल्या डॉंन ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांचे नेर्तृत्व कोणी करायचे याबाबत विरोधी पक्षात दोन गट आहे , पाकिस्तानात स्वतःचे सैन्य सदृश्य बळ असणाऱ्या आणि  एका धार्मिक पक्षाचे अध्यक्ष  असलेल्या  एफझुल रहमान नावाच्या एका उलेमाची मीच  या मोर्च्याचे  नेर्तृत्व करणार अशी भूमिका आहे जी हा लेख लिहीत असताना मान्य करण्यात आली आहे .  या  संदर्भात बोलतांना या मागे भारताचा हात असल्याचा दावा  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे .

 पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान ज्यांना पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जिया उल झक यांनी राजकारणात आणले आणि जे सध्या भष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानात शिक्षा भोगत आहेत असे नवाज शरीफ  आपल्या भारतातील मित्रांचा फायदा व्हावा या हेतूने वैद्यकीय उपचारासाठी लंडन येथे गेले असता  पाकिस्तान  विरोधी   करावया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्या विरोधात लाहोरच्या शाहदापुरा पोलीस स्टेशन मध्ये पाकिस्तान पिनल कोडच्या (जे  मुळात ब्रिटिशांनी सन 1860 मध्ये  तयार केलेले  इंडियन पिनल कोड आहे . पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तानने त्याचे नामकरण पाकिस्तान पिनल कोड  असे करून वापरण्यास सुरवात केली त्यानंतर बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तान पिनल कोडचे रूपांतरण बांगलादेश पिनल कोडमध्ये झाले  )  विविध कलमांखाली एफ आर आय दाखल करण्यात आली आहे . त्यामुळे विरोधी पक्षांचे आंदोलन कोणत्या प्रकारे वळण  घेते हे बघणे इछुकतेचे ठरेल . कारण नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तानातील प्रमुख पक्ष आहे 
                  पाकिस्तान जेव्हा जेव्हा अस्थिर बनला त्या त्यावेळी काश्मीर मधील परिस्थिती अत्यंत वेगाने बदलली अशा इतिहास आहे . त्यामुळे या बदलाकडे आपण डोळ्यात तेल घालून बघणे आवश्यक आहे . हा लेख वाचणारे ते करतीलच अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?