बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

                    "मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव  आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा  अर्थ आहे . भारतातील सिनेसृष्टीचा  विचार करता  कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण त्यांचे नाव घ्यावेच लागेल  . त्यांचा मृत्यूस सन 2020 ऑक्टोबर 10 रोजी 56 वर्षे पूर्ण होत आहेत ,  त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन . 
                  जागतिक कीर्तीच्या टाइम्स मॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तम अश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता, तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्त यांची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्या 20 वर्षाचा कालावधीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले. गुरुदत्त यांची सिने कारकीर्द जर अजून बहरली असती तर भारताच्या झोळीत ऑस्करचे किमान 2 ते  3 पदके नक्की आले असते . या बाबत कुणालाच शंका असायला नको . 
                         वास्तवातील रियल लाईफला रील लाईफच्या रुपेरी पडद्यावर सहजतेने साकारणे यात त्यांचा हात मधुर भांडारकर यांच्या खेरीज कोणी अन्य धरू शकणार नाही , याबाबाबत कोणाचंच मनात किंचितशी देखील शंका नसावी . मधुर भांडारकर यांनी ज्या प्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता रुपेरी पडद्यावर आणली . त्याच प्रमाणे मधुर भांडारकर यांच्या कित्येक वर्ष आधी त्यांनी हा प्रयोग केला होता . बॉलिवूडचे वास्तव त्यांनी "कागज के फुल या सिनेमातून जगासमोर आणले , तर पैशापुढे मानवी नटे कशे थिटे पडतात, याचे चित्रण त्यांचा प्यासा या चित्रपटातून समोर येते . तर नात्यासंदर्भातील क्षणभुंगुरता त्यांचा " साहब बीबी और गुलाम " या चित्रपटातून आपल्याला दिसते . 
      अनेक प्रतिभावानं  मिळते तसे अल्पायुष्य त्यांना मिळाले . उणापुऱ्या 39 वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत हिमलयाएव्हढे कार्य केले . त्यांनी तेलगू भाषिक अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्परणाची संधी दिली . एकेकाळी बेस्ट मध्ये कन्डक्टर असणाऱ्या जॉनी वॊकर यांना आपल्या अनेक चित्रपटात संधी देऊन त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवेश सुकर केला . 

            त्यांचा 20  वर्षांच्या सिने कारकिर्दीतील पहिले दशक त्यांनी प्रभात या सिने निर्मितीच्या क्षेत्रातील कंपनीत नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पहिले . मात्र त्यांच्या सिने कारकिर्दीला खऱ्या  अर्थाने सुरुवात झाली ती सन 1952 साली आलेल्या बाजी या चित्रपटाने . तेथून सुरु असणारा त्यांचा चित्रपट प्रवास हा त्यांचा अकस्मात अस्या निधानपर्यंत म्हणजेच  10 ऑक्टोबर 1964 पर्यंत सुरूच होता . 
     प्रेमाच्या कात्रीत अडकून त्यांचे 10 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत काहीश्या एकाकी अवस्थेत त्यांचे अकस्मित असे निधन झाले . निधनाप्रसंगी त्यांच्या प्लेटमध्ये फक्त त्यांचा एक विश्वासू नोकर सोबतीला होता . त्यांची पत्नी,  मुले, अथवा प्रेयसी त्यांच्याबरोबर नव्हती . त्यांचे निधन  ही  त्यांनी जाणूनबुजून केलेली आत्महत्या होती , की प्रचंड नैराश्य आल्याने घेतलेले मद्य आणि अनावधानाने घेतलेल्या झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्याचे निधन झाले या बाबत निश्चित असे काहीही सांगता येणे अवघड आहे . त्यांचे 9 ऑक्टोबर 1964  रोजी रात्री फोनवर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांच्याबरोबर प्रचंड वाद झाला होता . त्या वादाच्या वेळी त्यांनी आपल्या पत्नीस जर तू आपल्या मुलांना मला भेटायला घेऊन आली नाहीस तर माझे मृत शरीर बघशील असे सांगितले होते . मात्र तरी देखील त्यांची पत्नी गीता दत्त यांनी आपल्या मुलांना  गुरुदत्तांकडे घेऊन जाण्यास नकार दिला . आणि 10 ऑक्टोबर 1964  रोजी त्यांचे शरीर त्यांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत सापडले आणि भारतीय एका मनस्वी , हळव्या कलाप्रधान सिने अभिनेता , सिने दिग्दर्शक, सिने निर्माता , सिने दिग्दर्शक असणाऱ्या गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर याना कायमचे मुकला  
त्यांचा निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीची झालेली हानी भरून निघणे अशक्यच आहे . मात्र त्यांच्यावर जशी वेळ आली तशी अन्य कोणावरही ना येवो अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?