बदलता दक्षिण आशिया

                 गेल्या आठवड्याभरात भारतातील माध्यमे तनिष्कची जाहिरात, टीआरपीचा घोटाळा आदी  विविध विषयांचे वार्तांकन करण्यात गुंतून गेली असताना भारताच्या दृष्टीने सकारात्मक म्हणता येईल अश्या घटना बांगलादेश आणि नेपाळ मध्ये घडल्या . मात्र या विजय साजरा करावा अश्या घटनांचे म्हणावे असे वार्तांकन मराठी माध्यमांमध्ये न आल्याने माझे आजचे लेखन या मुद्यांची माहिती देण्यासाठी .  

       तर मित्रानो , आपला पाकीस्तानपेक्षा धोकादायक शत्रू असणारा चीन गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सभोवताली असणाऱ्या देशांना विविध प्रकारे मदत करून, त्या देशांमध्ये विविध विकास प्रकल्प उभारून त्यांच्याभोवती आपला फास गुंडाळीत आहे. याच मालिकेत त्याने श्रीलंकेतील हंबनपोट्टा हे बंदर विकसित केले . मात्र हंबनपोट्टा हे बंदर विकसित करताना चीनने छुप्या पद्धतीने लादलेल्या अटी पूर्ण न करता आल्याने श्रीलंकेला हंबनपोट्टा हे बंदर  99 वर्षासाठी चीनला वापरण्यास देणे भाग पडले आहे .श्रीलंकेतील हंबनपोट्टा बंदराप्रमाणेच बांगलादेशातील सोनाडीया हे बंदर विकसित करण्यासाठी चीन प्रयत्नशील होता . त्यासाठी चीन सन 2006 पासून बांगलादेशाबरोबर विविध पातळीवर बोलणी करत होता . मात्र बांगलादेश चीनला या बाबत होकार अथवा नकार कळवत नव्हता . मात्र दिनांक  4  ऑक्टोबर 2020 रोजी बांगलादेशने चीनला या बाबत पूर्णतः नकार कळवला . आता हे बंदर भारताचा मित्र देश ज्या बरोबर भारतातील  सुद्धा विविध विकास कामे चालू आहेत , असा जपान हा देश आता हे बंदर विकसित करणार आहे . सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात जलमार्गाने मालवाहतूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे . त्याला चीनच्या बंदर विकासामुळे काही प्रमाणात अडचण झाली असती . चीनला ही एक प्रकारची चपराकच म्हणायला हवी . 

             हे बंदर बांगलादेशच्या 8 प्रशासकीय विभागापैकी चितगाव या प्रशासकीय विभागात येते . या विभागात सोनाडीया   हे एक बेट आहे . बांगलादेशाच्या मुख्य भूमीपासून जवळच असणाऱ्या या ठिकणी मोठे जहाज येऊ शकतील अश्या प्रकारचे बंदर (DEEP SEA PORT ) उभारणे सहज शक्य आहे . अश्या ठिकाणी बंदर उभारल्यास बांगलादेशातील महत्त्वाचे बंदर असलेल्या चितगावावरील सध्या येणारा अतिरिक्त भर कमी होईल .हे जाणून बांगलादेश या ठिकाणी बंदर उभारण्यास उत्सुक होता . जी संधी चीन घेऊ इच्छित होता . याला भूगोलाच्या 2 प्रमुख शाखांपैकी एक  असणाऱ्या मानवी भूगोलाच्या राजकीय भूगोल या उपशाखेतील स्ट्रिंग ऑफ प्लस या सिध्न्तांनुसार केलेली कृती असे म्हणतात . 

          एका बाजूला बांगलादेश चीन पासून दूर जात असताना शेजारच्या नेपाळमध्ये सुद्धा भारताला अनुकूल ठरणारे बदल घडत आहेत . नेपाळचे पंतप्रधन के पी ओली शर्मा  यांनी मंत्रिमंडळात बदल करताना नेपाळच्या केंद्र  सरकारमधील  उपप्रधान जे या सरकारमध्ये सरंक्षण मंत्री देखील होते . आणि सातत्याने भारतविरोधी वक्तव्ये करत होती . असे काहिस्या चीनच्या  बाजूचे मंत्री ईश्वर पोखरेल  यांचा कडून सर्व कारभार  काढला  आहे .  आता ईश्वर पोखरेल हे नेपाळच्या केंद्रीय मंत्रिमंडळात बिन खात्याचे मंत्री असतील. त्यांच्याकडील कारभार पंतप्रधान बघणार आहेत   नेपाळच्या मंत्रिमंडळातील चीनचा  सूर बऱ्याच प्रमाणात कमी होईल , तसेच नेपाळ आणि भारत यातील गेल्या काही दिवसात दुरावलेले संबंध पूर्वपदावर येण्यास मदत होईल  अशा विश्वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहे .


  याच वर्षी मी महिन्यात भारताने कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सोईचे व्हावे म्हणून लिपूलेख भागात रस्ता बांधल्यावर नेपाळकडून काही वक्तव्ये  प्रसिद्ध केली गेली त्यावेळी या मागे चीनचा हात आहे ,असे विधानआपल्या भारताचे लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी केले त्यावेळी त्यांनी या विधानामुळे भारतीय लष्करातील गोरख रेजिमेंटचे मन दुखावले आहे , हे आणि या प्रकारची अनेक भारताविरोधी विधाने केली होती   आपल्या भारताचे लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे हे येत्या 3 नोव्हेंबर रोजी नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत .त्याला देखील यांचा विरोध होता त्यांचा मते भारत आणि नेपाळयांच्यातील सीमा प्रश्न सुटणे अत्यावश्यक आहे . त्याशिवाय भारताशी चर्चा करायला नको   त्या दृष्टीने बघितल्यास याचे महत्व लक्षात येते .  ईश्वर पोखरेल यांचे भारताबरोबर नेपाळच्या लष्कराचे प्रमुख पूर्णचंद थापा यांच्याबरोबर देखील वाद होते भारताबरोबर असणाऱ्या वादावर नेपाळच्या लष्कराचे प्रमुख पूर्णचंद थापा यांनी वक्तव्ये करावी यासाठी दबाव आणला होता . करोना काळात त्यांच्यावर मोठी जवाबदारी देण्यात आली होती.  मात्र त्यांनी ती योग्य हाताळली नसल्याचे सांगण्यात येत आहे . त्याच प्रमाणे त्यांच्यावर भष्ट्राचारचे देखील आरोप करण्यात आले आहे . कअर्थ रोना काळात काही वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी खर्च करताना देखील लष्करासाठी पैसा वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हा देखील त्यांच्या वर आरोप करण्यात येत आहे . 

           भारत आणि नेपाळ यांच्यात खुली सीमा आहे . आपण सहजतेने एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतो . आपल्याकडे देखील अनेक नेपाळी लोक राहतात . ब्रिटिशांच्या काळापासून भारतीय लष्करात नेपाळी लोकांची तुकडी आहे . भारतीय प्रशासकीय सेवेत देखील ते सहभागी होऊ षाक्ततात त्या दृष्टीने भारत नेपाळ सबंध चांगले असणे आवश्यक आहे . त्यामुळे या बदलांना खूप मोठा अर्थ आहे . यात शंकाच नाही . मी वेळोवेळी यातील बदल आपण पर्यंत पोहोचवेलच , तूर्तास इतकेच , नमस्कार 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?