मन विष्णण करणारी आकडेवारी


आपण समस्त भारतीय लोक या करोना काळात येणाऱ्या आगामी सणांच्या तयारीत मग्न असताना, गेल्या आठवड्यात एक मन विष्णण करणारी एक आकडेवारी समोर आली. ही आकडेवारी होती जगभरातील  उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांचा  विविध प्रकारे अभ्यास करून त्या आधारे देशांची क्रमवारी केल्यावर भारताला मिळणाऱ्या क्रमांकाबाबतची . आर्यलँड या देशातील मानवतेसाठी काम करणारी सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असणाऱ्या  कॅन्सल्ट वर्ल्ड वाईड  आणि  आणि जर्मनीतील महत्त्वाची स्वयंसेवी संस्था असणारी वेल्थ हंगर लाइफ   या दोन स्वयंसेवी संस्थांनी जगभरातील  देशांचा विविध प्रकारे अभ्यास करुन तयार केलेल्या आकडेवारीत भारताचा क्रमांक होता 94वा . या आकडेवारीत जितका क्रमांक कमी तितकी देशातील स्थिती उत्तम होय. यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे हिंदी भाषेतील कित्येक वृत्तवाहिन्यांच्या मते पृथ्वीवरचा नरक असलेल्या पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षा उत्तम असल्याचे या अहवालात नमुद  करण्यात आले आहे . सार्क देशातील अफगाणिस्तान या देशाचा अपवाद वगळता अन्य सर्व देश भारतापेक्षा सरस कामगिरी करत असल्याचे यावेळी दिसून आले आहे.सन 2006 पासून हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध करण्यात येतो . 
या संस्था लोकांना पुरेश्या उष्मकांचे खाद्य मिळते का ? पाच वर्षाखालील मुला मुलींचे वयानुरूप उंची आणि उंचीनुरूप वजन आहे का ? पाच वर्षांखालील मुला मुलींचा मृत्युदर काय आहे ? या बाबीचा विचार करून एखाद्या प्रदेशाला गुण देऊन त्यांचे गुणांकन करतात . या संस्थेमार्फत जेव्हढे कमी शून्याचा जवळ गन मिळतात तेव्हढा तो प्रदेश चांगला तसेच जेव्हढे गुण जास्त शंभरच्या जवळ तेव्हढा तो प्रदेश वाईट असे समजले जाते 
भारताची सन 2020 मध्ये स्थिती आहे 107 देशांमध्ये 94 नंबर . तर मागील वर्षी अर्थात 2019मध्ये होती 117 देशांमध्ये 102 नंबर .  देशांच्या संख्येत हा फरक पडण्याचे कारण म्हणजे काही देशाची माहिती न मिळाल्याने अथवा मिळालेली माहिती पुरेशी नसल्याने . 

    या निर्देशकांचे विविध भाग केले आहेत ज्यामध्ये पेक्षा  5कमी असेल तर लो , 10 tते 19.9  इतके असेल तर मॉडरेट  20.0  ते  34.9 इतके असेल तर सिरीयस आणि 35 ते 49.9  इतके असेल तर अलार्मिंग आणि 50  पेक्षा जास्त असेल तर एक्सटमिन्ग अलार्मिंग समजले जाते . सन 2020  मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्सटमिन्ग अलार्मिंग मध्ये कोणताच देश नाही . काही मोजके देश अलार्मिंग आहेत आपल्या भारताचा समावेश सिरीयस या वर्गवारीत होतो . भारताचे गुण आहेत  27.2  . या अहवालानुसार देशातील चौदा टक्के जनता कुपोषित आहे 
या अहवालानुसार आपल्या शेजारील देशांकडे बघितल्यास पाकिस्तान 88 ,नेपाळ 73, श्रीलंका 64 बांगलादेश 75 म्यानमार 78आणि अफगाणिस्तान  99क्रमांकावर आहेत . या अहवालानुसार भारताने पाच वर्षाखालील मुला  मुलीच्या मृत्यूदारात खूपच लक्षणीय कामगिरी केली आहे . मात्र लोकांना आवश्यक त्या उष्मांकाचे खाद्य मिळणे आणि पाच वर्षाखालील मुला मुलींचे वयानुरूप उंची आणि उंचीनुरूप वजन यामध्ये भारताला खूप सुधारणेची गरज आहे . 
पाश्चात्य देशातील स्वयंसेवी संस्थांनी केलेला अहवाल म्हणजे भारताची जाणूनबूनज बदनामी करण्यासाठी केलेला कट असे या कडे बघण्याची गरज नाही . तर आपण अजून कुठेकुठे प्रगती करायला हवी . याचे दिशादर्शक म्हणून या कडे बघायला हवे .जगभरातीलप्रकाशित होणाऱ्या विविध अहवालत भारतचे स्थान कुठे आहे या विषयी मी वेळोवेळी सांगतच राहील तूर्तास इथेच थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?