भारतीय रेल्वेची चित्याचा वेगाने बदलाकडे धाव

                  आपली भारतीय रेल्वे सध्या झपाट्याने बदलत आहे, हे आपण जाणतातच. या बदलांचा मालिकेतीलच पुढचा अध्याय म्हणून समजता येतील, असे  प्रवास्यांशी सबंधित  तीन बदल  रेल्वे आपल्या सेवेत  करणार असल्याचे, सुतोवाच नुकतेच रेल्वेमार्फत करण्यात आले. एक बदल काहीसा सकारात्मक आहे, तर एका बदलाला काहीसी नकारात्मक छटा आहे.  तर एक न्युट्रल आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी यावर काहीसे मौन बाळगले असल्याने त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन.
पहिले नकारात्मक बदल बघूया .
तर मित्रांनो आपल्या प्रवासात आपली तहानभूक मिटवणारा रेल्वेडब्बा म्हणजे पँट्री कार बंद करणार असल्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. भारतीय रेल्वेच्या तिन्ही कोच फँक्टरीमध्ये (इंट्रीग्रेड कोच फँक्टरी चेन्नई, रेल कोच फँक्टरी रायबरेली, आणि रेल कोच फँक्टरी कपूरथाळा या तिन ठिकाणी भारतीय रेल्वेच्या प्रवाशी डब्याची निर्मिती होते)   या प्रकारचे डब्बे बऱ्याचा काळापासून बनत नसल्याचे दिसून आल्याने ही बाब उघडकीस आली. सध्या प्रवाशी सहजतेने आँनलाईन पद्धतीचा अवलंब करत प्रवाश्यात अन्न मागावू शकतो, आणि या प्रकारच्या डब्यांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या अन्नांचा दर्जाबाबत
अनेक तक्रारी रेल्वेकडे सातत्याने येत असतात. ही सेवा खासगी कत्रांटादरांकडून पुरवण्यात येत असते. यामध्ये रेल्वेची काहीही भुमिका नसते. मात्र रेल्वे नाहक बदनाम होते, ही कारणे यासाठी रेल्वेकडून देण्यात आली आहेत. या ठिकाणी अधिकचा स्लिपर दर्जाचा डब्बा बसवून प्रवाश्यांना अधिक सेवा देता येवू शकते, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
                आता बोलूया सकारात्मक बातमीकडे
तर मित्रांनो प्रवाश्यांना प्रवाशात आपले सामानाची घर ते रेल्वेस्टेशन आणि रेल्वेस्टेशन ते गंतव्य स्थान या ठिकाणी वाहतूक करणे सोईचे व्हावे यासाठी अँप बेस सेवा सुरु करणार असल्याचे संकेत रेल्वेने दिले आहे. हे अँप अँड्रोइड आणि आयफोन या दोन्ही प्रकारच्या फोनमध्ये कार्यरत राहू शकेल, असी याची रचना असणार आहे. "BOW"  या नावाचे  विशेष अँप यासाठी तयार करण्यात आले आहे. वहावयाचे वजन, वहावयाचे अंतर यावर दर अवलूंबून असणार आहेत.
आता न्युटल बातमी बघूया 
            भारतीय रेल्वे काही ठराविक रेल्वेस्टेशनवर "युर्झस चार्जेस" या मथळ्याखाली काहीसे अतिरीक्त शुल्क घेण्यात येणार आहे. या अतिरीक्त  शुल्कातून मिळणाऱ्या रक्कमेमधून त्या रेल्वेस्टेशनवर अधिक चांगल्या सेवा तसेच स्टेशन परीसराचा विकास करण्याचा रेल्वेचा मानस आहे. या ठिकाणी सातत्याने चांगल्या सेवा मिळाल्या तर कोणाचीच तक्रार नसेल मात्र नव्याचे नउ दिवस या न्यायाने जर काही काळ चांगली सेवा नंतर सेवा ढेपाळली असे व्हायला नको. मला वैयक्तिकरीत्या पुणे रेल्वे स्टेशनवर दोन वर्षापूर्वी आलेला अनुभव येथे सांगावासा वाटतो, इतर ठिकाणी 10रुपये असणारे प्लँटफाँम टिकीट पुणे स्टेशनवर तब्बल 20 रूपयाचे आहे. मात्र त्या दर्जाची सेवा तिथे उपलब्ध नव्हती, प्रसाधनगृहात अत्यंत अस्वच्छता होती, आता काय स्थिती आहे? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे(माझा पुणे स्टेशन वरील अनुभव मी  कुणाचेही मन दुखवण्याचा हेतूने सांगितला नाही) असो
                                 रेल्वे चित्त्याचा वेगाने बदलत आहे. प्रवासी संख्या, रेल्वेमार्गाची लांबी, कार्यरत कमचाऱ्यांची संख्या याबाबत जगात अव्वल काही रेल्वेत समाविष्ट होणारी आपली भारतीय रेल्वे आता तंत्रज्ञानात देखील अग्रेसर होण्याचा मार्गावर आहे. याचाच या पुरावा म्हणता येतील . भारतीय रेल्वेत वेळोवेळी होणारे बदल सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असेलच , तूर्तास इतकेच, नमस्कार.  
 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?