हीच ती का मराठी ?

           

गेल्या आठवड्याभरापुर्वीची गोष्ट आहे एका मित्राने मला फोन केला होता, नेहमीचे क्षेमकुशल झाल्यावर त्याने तूझ्याकडे अरे ते पुस्तक आहे का ?  असा प्रश्न केला.मित्राने विचारलेले पुस्तक मराठीतील एक नामांकित पुस्तक होते. तेव्हापासून एक प्रश्न मला सातत्याने मनात येत आहे, की आपल्या मराठीत अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत, ज्यावर अनेक दिर्घ कालावधीच्या मालिका सहजतेने तयार होवू शकतात, ज्या लहानमुलांसह प्रौढ व्यक्तीही सहजतेने बघू शकतील अस्या असताना अत्यंत कटकारस्थांनी भरलेल्या, विविध प्रकारचे गुन्हे सहजतेने दाखवणाऱ्या मालिका मराठीत का बनत आहेत.
               जे मालिकांचे तेच विनोदी कार्यक्रमाचे आपल्या मराठीत चि.वि जोशी, पु.ल. देशपांडे, व. पू. काळे, यांच्या सारखे सकस विनोदी लेखन करणारे साहित्य असताना महिलांचे कपडे पुरूषांनी घालणे, आणि विनोद निर्मिती करणे , यात काय हशील? एकेकाळी वाईटपणाचा शिक्का बसलेल्या तमास्यात या प्रकारचे विनोद असतात.आणि ते सादर करण्यास नाच्या म्हणतात ,जो मानाच्या दृष्टीने अत्यंत कमी असतो.
आपल्याकडे रहस्यकथांची  मोठी परंपरा आहे. मात्र सोनी टिव्हीवरील सि आय डी सारखा अनेक वर्षे चालणारा कार्यक्रम मराठीत का होत नाही,  म्हणायला मराठीत काही तसे काही प्रयोग झाले, मात्र ते वर्ष सोडा महिन्यात संपले असे का? 
                 फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर समस्त भारत देशातील लोकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य मराठी साहित्यात आहे असे मला वाटते. सब टिव्ही वरील "तारक मेहता का उलटा चष्मा" सारखा कार्यक्रम मराठीतील "बट्ट्याची चाळ"वर देखील करता येवू शकतो.अर्थात हे फक्त प्रातनिधीक उदाहरण झाले, असी अनेक उदाहरणे आहेत. 

सध्या मराठी चित्रपटात अनेक चांगले सहकुटुंब बघता येतील अश्या विषयावर निघत आहेत हि बाब येथे आपण लक्षत घेतली पाहिजे मी येथे जाणूनबुजून ओटीपी सारखे नाव तंत्रज्ञान आणि त्यात मांडण्यात येणारे विषय त्याचे सादरीकरण यावर काहीही भाष्य करणार नाही. कारण त्याची पोहोच असणारी लोकसंख्या एकूण लोकसंख्येचा विचार करता टाक्याच भाषेत (शेकडेवारी ) अजूनही फारशी नाही . आणि कोणत्याहीची गोष्टीचे यशापयश मोजण्यासाठी काही कालावधी जाणे अत्यावश्यक आहे . जो या ऑपटिपी सारख्या माध्यमांबाबत मी हे लिहितोय त्या   महाराष्ट्रात तरी गाठला गेला नाही असे मला वाटते. म्हणून मी हा विषय टाळतोय .  
                          मी ज्या प्रयोगाबाबत बोलतोय  असे प्रयोग या पुर्वी झाले आहेत, आणि ते यशस्वी देखील झाले आहेत, हे मला माहिती आहे. मात्र "उपासनेला दृढ चालवावे", या समर्थांचा वचनानुसार ती परंपरा पुन्हा निर्माण होणे आवश्यक आहे .
जनमताची ताकद फार मोठी आहे, जनमतामुळे न्यायालय देखील पुर्वी पुराव्या अभावी निर्दोष सोडलेल्या आरोपींना जन्मठेपीची शिक्षा देवू शकते हे आपण जेसिका लाला आणि प्रियदर्शनी मट्टू या हत्याकांडात बघीतले आहे.(जन्मठेपीची 14वर्षांची तरतूद आणि चांगल्या वर्तनामुळे जेसिकाचे आरोपी सुटण्याची शक्यता आहे, ते सोडून देवूया)  तसा प्रकारचे जनमत मराठी भाषिकांमध्ये लवकरच  निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?