कहाणी भुगर्भाच्या 2शोधांची


                         सध्या समस्त भारतीयांचे लक्ष बिहार निवडणूक, आणि महाराष्ट्राचे लक्ष विविध छोट्यामोठ्या मुद्द्यांकडे लागलेले असताना भारताचा भुगोलाच्या दृष्टीने 2 महत्त्वाच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यातील एक गोष्ट  सकारात्मक आहे, तर दुसरीला नकारात्मक छटा आहे. या दोन घटना राजस्थान आणि लडाख या क्षेत्रात उघडकीस आल्या आहेत . आपल्या मराठीतील मुख्य धारेच्या माध्यमांनी याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते ते सकलासी सांगावे सकल जना " या वचनानुसार आपणापर्यत सदर माहिती पोहचवण्यासाठी आजचे लेखन
                  तर सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरुन सध्या नद्या वहात आहेत. ही नदी सरस्वती नदीपेक्षा वेगळी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सरस्वती नदी 30 हजार वर्षापुर्वी सरस्वती नदी वहात होती, जी कालांतराने लुप्त झाली असे मानण्यात येते. तर नव्याने शोधलेली ही नदी 1लाख 72हजार वर्षापुर्वी वहात असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
                      या नदीच्या वाहण्याचा कालावधीतच आफ्रिकेतून मानव भारतात वास्तव्यास आला होता. हा कालावधी जूने अश्मयुगाचा वेळचा आहे . भारतीय    आणि जर्मम भुगर्भ शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे . त्यासाठी त्यांनी "लूमिनियस डेटिंग "या पद्धतीचा वापर केला आहे. ज्यामध्ये प्रथमतः उपग्रहाद्वारे छायाचित्र घेवून नंतर सदर मार्गावरील खोलवर असणाऱ्या खडकांतील पाण्याचे अनुमान बांधत हा शोध घेण्यात आला .या काहीश्या सकारात्मक बातमीनंतर बघूया नकारात्मक बातमी .
                   तर मित्रानो, आपल्याला माहिती असेलच की  इंडीयन प्लेट , युरेशियन प्लेटच्या खाली जात असल्याने हिमालयाची उंची आजमितीस वाढतच आहे. यादरम्यान  या प्रकियेमुळे काही फाँल्ट लाईन   निर्माण झाल्या आहेत. हिमालयात अस्या अनेक फाँल्ट लाईन    आहेत. त्यातीलच एक फाँल्ट लाईन   म्हणजे लडाखची फाँल्ट लाईन. लडाखची  फाँल्ट लाईन एका जागी जागी स्थिर आहे. आणि भुगर्गीय हालचालीचा विचार करता ती मृतवत असल्याचा आतापर्यत समज होता .मात्र  वाडीया इनस्ट्युट आँफ हिमालमयीन जिजाँलांजी या संस्थेने  नुकत्याच केलेल्या एका  संशोधनानुसार  लडाखची फाँल्ट लाईनची  लांबी उत्तरेकडे वाढत आहे. या संशोधनासाठी त्यांनी या फाँल्ट लाईनचे लेह ते सौनमुर या 213 किलोमीटरच्या पट्टयाचा अभ्यास केला या लडाखच्या फाँल्ट लाईनच्या वाढीमुळे  या भागात  सातत्याने मात्र छोटे भुकंप या क्षेत्रात येवू शकतात, अशी  भिती भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटत आहे. या छोट्या भुकंपामुळे  मोठा पाउस झाला तर या क्षेत्रात दरडी कोसळणे, दगाडापासून माती पुर्णतः वेगळी होउन वाहत्या पाण्याबरोबर वहात आल्याने चिखलाचा पुर आदी समस्या निर्माण होवू शकतात . या संशोधनात नदी पात्र उंचावणे,आदी गोष्टी देखील त्यांना आढळून आल्या आहेत. भारताचा संरक्षणेच्या दृष्टीने सदर परीसर अत्यंत महत्त्वाचा आहे . या भागात सहजतेने जाता यावे म्हणून अनेक प्रकल्प सध्या सुरु आहेत, हे आपण या वेळी लक्षात घेयला हवे.

               भुगोल विषय अत्यंत रंजक आहे. भुगोलाच्या विविध शाखा अत्यंत रंजक आहोत. मात्र आपल्या शालेय शिक्षणात भुगोलाची फक्त राजकीय भुगोल ही शाखाच शिकवण्यात येते. त्यातही यातील सिद्धांंत न शिकवता निव्वळ माहिती देण्यात येते, ज्यामुळे भुगोल कंटाळवाणा वाटतो , ही भुगोलाची रंजकता वाटेल असे जर शिकवण्यात आले तर भुगोलासारखा विषय नाही.तर या कंटाळवाण्या वाटणाऱ्या मुळात रंजक असणाऱ्या भुगोल विषयात अनेक संशोधने सध्या सुरु आहेत. ती आपणापर्यत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेलच. तूर्तास इथेच थांबतो. नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?