बिगूल 46व्या अमेरीकी अध्यक्षाचे (भाग 7वा)

   
                     गेले वर्षभर सुरु असलेल्या 46व्या अमेरीकी अध्यक्ष निवडीची प्रक्रीया आता आंतीम टप्यात आली आहे. मी गेली वर्षभर या विविध टप्यांची माहिती वेळोवेळी दिली आहे. ज्यांना ती वाचायची आहे, त्यांचासाठी मी मागील लेखाच्या लिंक या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत,असो.
           येत्या मंगळवारी अर्थात 3 नोव्हेंबर रोजी जरी अमेरीकेत 46 व्या अध्यक्षासाठी प्रत्यक्ष मतदान होणार असले, तरी करोना संसर्गाचा पार्श्वभुमीवर अमेरीकेत प्रत्यक्ष मतदानदिनाच्या आधीच सुरु असलेल्या टपाल मतदानाद्वारे  मतदान करण्यास अधिकाधीक अमेरीकी नागरीक प्राधान्य देत आहेत. Fox Newsने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या 2016 मध्ये आलेल्या टपाल मतदानापेक्षा 60%अधिक मतदान यावेळी टपाल मतदानाने झालेले आहे. या आधी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीनूसार जाँन बायडन पुढे होते . ते आता प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत देखील पुढे आहेत. मात्र त्यांची आघाडी पुर्वीपेक्षा कमी झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा करोना संसर्गामुळे मुळच्या नियोजनानुसार असलेल्या 3 असणाऱ्या अध्यक्षीय उमेदवारांचा चर्चा (presidential Debate) या दोनच घेण्यात आल्या . क्रमांक 2ची चर्चा रद्द करण्यात आली, आणि पहिली आणि तिसरी चर्चाच घेण्यात आली. पहिल्या चर्चेत काय घडले, ते मी या लेखमालेच्या सहाव्या भागात सांगितले आहेच.

       यावेळी त्यावेळी झालेल्या आक्रस्ताळेपणाला लगाम घालण्याचा प्रयत्न झाला त्यासाठी एक उमेदवार बोलत असताना दुसऱ्या उमेदवाराचा माईक बंद करणे आदी उपाययोजना करण्यात आले   मात्र यावेळी सुद्धा काही प्रमाणात चर्चेमध्ये आक्रस्ताळेपणा दाखवण्यात आला .मात्र यावेळी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जॉन बायदान बोलत  असताना वेळोवेळी त्यांचा बोलणे तोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी करोनाचा अमेरिकेतील प्रसार रोखण्यासाठीचा उपाययोजना, पर्यावरण, राष्ट्रीय सुरक्षा, सध्याचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक व्यवहार,अमेरिकेची आरोग्य व्यवस्था, अमेरिकेतील गरिबांचे प्रमाण, किमान वेतन विषयक धोरण,  स्थलांतराचा प्रश्न, कृष्णवर्षीयांचा प्रश्न, आदी मुद्याचा समावेश  करण्यात आला . सुरक्षा  विषयक बोलताना ऊत्तर कोरिया चीन , युक्रेन आदी उप मुद्यांचा समावेश करण्यात आला.  टेनिसी राज्यातील बोलमीट येथील नौशवील विद्यापीठात झाली एन बी सी वृत्तवाहिनीच्या महिला निवेदिका   kristen wlker यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले . ही चर्चा  22  ऑक्टोबर रोजी झाली . डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन बायडन यांचा प्रतिवाद करताना  डेमोक्रेक्तिक पक्षाच्या मागील कालावधीत काही झाले नाही आता ते काय करणार .? असा सूर वारंवार आवळला .  

                 भारतात जसी निवडणूकीला  पगारी सुट्टी असते. तशी अमेरीकेत पगारी सुट्टी नसते. हे आपण यावेळी लक्षात घेयला हवे.  अमेरिकन नागरिक त्यांची नोकरी सांभाळत आपल्या पसंतीच्या उमेदवाराने आपल्या मतदार संघात दिलेल्या उमेदवाराला मत देतो . हे उमेदवार नंतर अध्यक्षपदासाठी मतदान करतात . या उमेदवारांना आपण कोणाला मतदान करणार हे आधीच जाहीर करावे लागते. या उमेदवारांनी  पक्षांतर केले तर त्यांना तुरुंगवासाची क्षिक्षा होते .अमेरिकेत इलेट्रीक मतदान यंत्र न वापरता पारंपरिक कागदी मतपत्रिका वापरतात . अमेरिकेची वेळ आपल्या भारताच्या प्रमणावेळेपेक्षा  सुमारे 12 ते  18 तास मागे आहे . त्यामुळे आपल्या भारतात 4 नोव्हेंबर च्या मध्यरात्री  (5 नोव्हेंबर ची पहाट )  पर्यंत मतदान होऊन  5 नोव्हेंबर च्या दुपारपासून मतदान विविध कल येण्यास सुरवात होईल .  आणि  5 नोव्हेंबर च्या मध्यरात्री 6 नोव्हेंबरच्या पहाटे चित्र स्पस्ट झाले असेल . आणि अमेरिकेच्या 46व्या  अध्यक्षांची निवड झालेली असेल / निर्वाचित अध्यक्ष त्या नंतर दोन महिन्यानंतर अर्थात 20 जानेवारी 2021 रोजी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेईल त्या नंतर अमेरिकेला वेध  लागतील ते सिनेटच्या निवडणुकीचे . जी दर 4 वर्षांनी आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर 2 वर्षांनी होते . त्याची रंगत देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल . तूर्तास इतकेच नमस्कार . 
लेख सहावा 
 लेख पाचवा 
 लेख चौथा 
लेख तिसरा 
लेख दुसरा 
लेख  पहिला 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?