असा बालनायक होणे नाही!

   
             कालचीच गोष्ट आहे. फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ?अशी विचारणा केली होती. ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे. तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे, बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का?
                      सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, असे डोरेमाँन, निंज्जा हातोरी, शिनच्यन, हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल, इतकेच. वासरात लंगडी गाय शहाणी, या तत्वामुळे. मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन, हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी.  फास्टर फेणेची कथा पहिल्यांदा येऊन कैक पिढ्या लोटल्या , तरी त्याची मोहिनी अजून देखील आहे . फास्टर फेणेमध्ये वर्णन केलेले शहर पुणे आहे, ज्याना जुन्या पुण्याची ओळख आहे, ते सहजतेने हे ओळखू शकतात . मात्र फास्टर फेणे मध्ये वर्णन केलेले पुणे आता अंर्तबाह्य बदलले आहे . मात्र त्याची जादू अजूनही कमी झालेली नाही. मी फेसबुकवर बघितलेली पोस्ट याचीच साक्ष देते . सध्या जे नवीन बालसाहित्य आहे, त्याची गोडी पुढच्या पिढीत  तशीच राहील का ? या बाबत शंका घेण्यास वाव आहे . लहान मुलांचा भावविश्वाचा विचार करून मराठीतील एक सिद्धहस्त लेखक श्री  भागवत यांनी त्यांना खुबीने रहस्यकथेच्या विश्वाची ओळख करून दिली आहे . फास्टर फेणे यांनी रचलेला नायक हा इंग्रजी बालसाहित्यात असतो, तसा सुपरमॅन नसून देखील मानला भावून ठेवतो . कुठेही अतिशययोक्ती नसून देखील वाचावासा वाटतो . आपल्यातीलच एक व्यक्ती असल्याचा भास फास्टर फेणे वाचताना  सातत्याने येतो . आताच्या टीव्हीतील कोणताही बालनायक जर कॉमिक्स रूपात आला तरी त्याची सर येणे अशक्यप्राय आहे , असे आपण खात्रीने म्हणू शकतो 

.              जी गोष्ट फास्टर फेणेची, तीच गोष्ट बोक्या सातबंडे या दुसऱ्या बालनायकाची . एक प्रसिद्ध व्यंगचित्रमालिका असणाऱ्या चिंटूसारखा या कथासंग्रहाचा नायक देखील सर्वसामान्य मध्यमवर्गीय . मराठीतील एक असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या दिलीप प्रभावळकरांच्या लेखणीतून अवतीर्ण झालेल्या या बाल नायकाने  माझ्यासारख्या अनेकांच्या बालपणी आनंद भरला . तीन भागात आलेल्या या बालनायकाने अनेकांना आनंद दिला . यावर एक टीव्ही मालिका देखील आली होती . जी तुफान गाजली . नुकत्याच करोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन .मध्ये काही जुन्या मालिका दाखवल्या गेल्या , त्या मालिकांमध्ये मात्र ही मालिका दाखवली गेली नाही . ही मालिका जर दाखवली गेली असती तर लॉकडाउनच्या   तणावाच्या काळात लोकांना तणावापासून काही काळ मुक्ती सहज मिळाली असती असो . 
          पूर्वी सारखेच सकस बालसाहित्य आता निर्माण होऊन माझ्या पिढीने  अनुभवलेली आनंदयात्रा याही पिढीला अनुभवयास मिळो . अशी ईश्वरचरणी  सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?