चीनचा विळखा ?


चीन आपल्या भारताचा एक प्रबळ शत्रू, अनेकांना ज्याचे  नाव घेतले तरी  तळपायाची आग मस्तकात  जाते असे राष्ट्र. आपल्या भारताच्या विरोधात विरोधात अनेक जागतिक व्यासपीठावर अधिकृत अथवा छुप्या पध्द्तीने बाजू घेणारे राष्ट्र . या चीनच्या संदर्भात 3 घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. आपल्या पारंपरिक माध्यमांनी या घडामोडीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.
                           तर मित्रांनो, बांगलादेशाने चीनला त्यांचे बंदर विकसीत करण्यापासुन रोखल्यानंतर चीनने पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर जे त्यांचा सिंध प्रांताची आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे, अस्या कराची जवळील दोन बेटे  विकसीत करण्यासाठी पाकिस्तानबरोबर करार केला आहे. त्यासाठी चीन त्या ठिकाणी त्याचा तळ देखील विकसीत करणार आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी करोनामुळे लॉक डाऊन असताना पाकिस्तानच्या सरकारने एक अध्यादेश काढला आहे कराचीच्या समुद्रापासून मुंबईचा समुद्र किनारा अत्यंत जवळ आहे, हे आपणास ज्ञात आहेच. त्यामुळे  भारताच्या इतक्या जवळ चीनने आपला तळ उभारणे, भारतासाठी निश्चितच चांगले नाही.

                          त्याच प्रमाणे चीनने या पुर्वी जाहिर केल्याप्रमाणे तिबेट या राज्याला चीनच्या मुख्य भुमीसी जोडण्यासाठी सध्या अस्तिवात असणाऱ्या रेल्वेमार्गाखेरीज दुसऱ्या मार्गाची उभारणी करण्यासाठी पायाभरणी सुरु केली आहे. हा प्रस्तावित नवा मार्ग भारत चीन या सीमेपासून अत्यंत जवळून जातो. या नव्या मार्गामुळे चीन बीजिंगहुन तिबेटपर्यत आपले सैन्य आता लागतो, त्याचा एक तिर्तांयांस वेळेत आणू शकतो.हा रेल्वेमार्ग अत्यंत जवळ येतो तो अरुणाचल प्रदेशाजवळ .अरुणाचल प्रदेशाबाबत चीनची भूमिका काय आहे / हे सर्वसुत आहेच 
हे दोन मुद्दे झाले भारतावर प्रत्यक्ष परीणाम करणारे. तिसरा मुद्दा परीणाम करतो, तो भारताचा समावेश असलेल्या अमेरीकाप्रणीत 4 देशाचा संघ अर्थात क्याड चा एक सदस्य देशतो  असलेल्या आँस्टोलियावर. आँस्टोलियाचा सर्वाधिक व्यापार हा चीनबरोबर होतो. जगभरात आँस्टोलिया ज्या देशांशी व्यापार करते , त्या देशांची उतरत्या क्रमाने यादी केली असता, दोन ते दहा क्रमांकाच्या देशांच्या एकत्रीत व्यापारापेक्षा अधिक व्यापार हा पहिल्या क्रमांकावरील चीनशी होतो. आँस्टोलिया आणि चीन या देशांच्या व्यापारात आँस्टोलियाची चीनला प्रचंड प्रमाणात निर्यात आहे .या उलट आँस्टोलियाची चीनकडून आयात अत्यंत कमी आहे. आँस्टोलिया चीनविरोधी असणाऱ्या क्याँडमध्ये सक्रिय सहभाग घेतो, या सबबीखाली चीनने  आँस्टोलियाकडून होणारी आयात थांबवण्याचा ईशारा दिला आहे. त्यामुळे आँस्टोलिया स्वतःचे आर्थिक नुकसान करुन घेण्यापेक्षा भारत चीन विवाद, चीन अमेरीका विवाद,  चीन जपान विवाद या आपल्यासी प्रत्यक्ष सबंध नसणाऱ्या बाबींकडे दुर्लक्षच करु शकते.त्यामुळे चीन विरोधी जागतिक आघाडी उभारण्याबाबत भारताच्या प्रयत्नाला खीळ बसू शकते .
                      चीन निद्रीस्त ड्रँगन असून हा ड्रँगन जेव्हा जागा होईल, तेव्हा जगाची झोप उडवेल , असे स्वामी विवेकानंद यांनी ते अमेरीकेत जात असताना म्हंटले होते, ते आता सत्यात येताना दिसत आहे. चीनची ही ताकद कमी होण्यासाठी जग अजून प्रयत्न करेँ, असी आशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो,नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?