मेरे पिया गये हे रंगून

     

           सध्या भारताचे आपल्या शेजारी देशांशी असलेले सबंध नव्याने वृद्धिगत होत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आदी देशांशी आपले सबंध  संबध मैत्रीच्या नव्या वळणावर आहेत . त्यातील बांगलादेशाशी असणाऱ्या घनिष्ट संबंधावर मी याआधीच लिहले आहे . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लीक करावे. मी आता बोलणार आहे .म्यानमार विषयी 
          आपल्या  सारखाच ब्रिटिशांची वसाहत असणारा म्यानमार या देशाच्या कारभार 1935 पर्यंत भारतातूनच चालवला जात असे . 1935साली म्यानमार आणि भारताचा कारभार स्वतंत्र करण्यात आला .1857 च्या उठावानंतर दिल्लीच्या बादशहाला आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना म्यानमारच्या तुरुंगात कैद करून ठेवले होते तर म्यानमारच्या राजाला रत्नागिरीत कैद करून ठेवले होते . हे आपण जाणतातच . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्यानमारचे राष्ट्रपिता ऑग सांग हे युनाटेड किंगडम मध्ये शिकत असताना एकमेकांचे जवळचे मित्र होते ,  आशियांची स्थापना करताना म्यानमारने त्याचे सदस्यत्व भारताला देऊ केले होते (जे भारताने सदर समूह हा अमेरिकेची तळी उचलतो या कारणामुळे नाकारले ) जुन्या हिंदी चित्रपटात "मेरे पिया गये हे रंगून" हे गाणे असल्याचेदेखील आपणास माहिती असेलच . मात्र आपल्या भारतानंतर वर्षभराने स्वातंत्र मिळाल्यावर देशात लष्कराने उठाव केला आणि देश लष्करी नियंत्रणात गेला . म्यानमाराने पुढे कॉमनवेल्थचा त्याग केल्यावर भारताचे आणि म्यानमारचे सबंध काहीसे दुरावले. नरसिंहराव  पंतप्रधान झाल्यावर लुक ईस्ट पॉलिसीद्वारे त्या कडे अधिक लक्ष देण्यात येऊ लागले .हा झाला इतिहास  गेल्या काही महिन्यामध्ये  म्यानमारशी अनेक अनेक प्रकल्पावर काम सुरु झाले आता बोलूया त्या विषयी . 

ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा अधिक चांगला संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी म्यानमारच्या  राखाइन या भारत म्यानमार आणि बांगलादेश या तीन देशाच्या सीमा एकत्र येणाऱ्या  राज्यातील सिंग्वे  बंदर भारताकडून विकसित करण्यात आले .(या म्यानमारच्या राज्यातच  रोहिंग्या हा काहीशी वादग्रस्त  समाज राहतो)   ज्याचे काम डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण करण्यात आले. या सिंग्वे बंदरापासून भारतीय हद्दीतील मणिपूर राज्यातील इंझॉल या शहरापर्यंत रस्ता तयार नसल्याने हे बंदर वापरता येत नाहीये . या बाबत नुकतेच भारतआणि  म्यानमारमध्ये लष्करप्रमुख आणि परराष्ट्र सचिव पातळीवर  झालेल्या बोलणीनुसार मार्च 2021 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे हे काम रखडण्यासाठी या भागातील विविध व्यक्ती समूहांच्या वाद कारणीभूत आहेत . हे काम पूर्ण झाल्यावर मिझोरामया  राज्यात जाण्यासाठी सिलिगुडी कॅरिडॉरच्या लांबच्या रस्ताने पोहोचवण्याऐवजी जवळच्या रस्त्याने पोहोचवता येईल . हे काम 2010 पासून भारत आणि म्यानमार या दरम्यान सुरु असलेल्या कलादन प्रकल्पा अंतर्गत करण्यात येत आहे . 
म्यानमारशी आपले सबंध अधिक दृढ व्हावे आणि त्यावरील चीनचा प्रभाव कमी व्हावा यासाठी भारताने नुकतीच आपली एक पाणबुडी म्यानमारच्या नौदलाला  भाड्याने दिली आहे . . जगातील सर्वात जास्त व्यापार हा हिंदी महासागरातून होतो . चीनचा नकाशा बघितल्यास या भागापासून चीन बऱ्यापैकी लांब आहे . पारिणामी हिंदी महासागराचा जवळ असणाऱ्या म्यानमारशी चीन सलगी करत आहे  ( याच कारणासाठी चीन पाकिस्तानच्या विकास करत आहे )  त्याला खोडा घालण्यासाठी याचा सहजतेने वापर करता येईल 

भारत नव्या जगाचे इंजिन बनण्यासाठी सज्ज होत असल्याचे या दोन्ही घटनांमधून दिसत आहे . या अंतर्गत होणारे बदल वेळोवेळी सांगण्याचा माझा प्रयत्न असेलच . तूर्तास इतकेच . नमस्कार 
बांगलादेशाविषयी मी लिहलेल्या लेखाची लिंक  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?