महाराष्ट्राची एसटी गाळात ?

         

 सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे बिहार निवडणूक, अर्णब गोस्वामी यांची अटक आदी मुद्याभोंवती घुटमळत असताना, आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीबाबत काहीसे मन विषष्ण दोन बातम्या येवून धडकल्या.करोना संसर्गाच्या भीतीने सक्तीने लादण्यात आलेल्या लाँकडाउनमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या आपल्या एसटीच्या तोट्यात भरच पडली, परीणामी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीचे काही आगार आणि ईतर मालमत्ता  तारण ठेवण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली, हे कमी म्हणून काय एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत पगार देण्यात यावे यासाठी नाशिकच्या कामगार आयुक्तांना निर्देश द्यावे लागले. या त्या दोन बातम्या होत्या सन1948 साली स्थापन झाल्यावर 72वर्षात ईतकी दैनावस्था महामंडळावर या आधी कधीच आली नव्हती. करोना काळात थांबलेल्या प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पनाला पर्याय म्हणून एसटीमार्फत मालवाहतूकचा पर्याय देखील अमंलात आणण्याचा प्रयत्न करुन बघण्यात आला, मात्र मालवाहतूकदारांच्या संघटनेमार्फत याला विरोध झाल्याने एसटी प्रशासनाला हा प्रयत्न थांबवावा लागला. 

               एसटीला राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान वर्षोंवर्ष थकल्याने, एसटीकडून राज्य सरकारला प्रचंड प्रमाणात प्रवासी कर  दिला गेल्याने, तसेच अन्य राज्याचा एसटीने आपल्या महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात घूसखोरी केल्याने, मात्र त्या प्रमाणात अन्य राज्यात आपल्या एसटीने मार्ग सुरु न केल्याने एसटीचे उत्पन प्रचंड प्रमाणात घटले.
           कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. कोल्हापूरपासून 25 किमीवर महाराष्ट्र संपून कर्नाटक राज्य सुरू होते . कोल्हापूरपासून नाशिक सुमारे 450किमी अंतरावर आहे. अशी परिस्थिती असताना नाशिकहून कर्नाटक राज्य परीवहनाच्या 3 बसेस कोल्हापूर येथून बेळगावला जातात. या उलट नाशिकहून  महाराष्ट्राची  एकही बस  कोल्हापूरहून पुढे बेळगावला जात नाही. रात्री सव्वाआठ ते सव्वानउ या दरम्यान गुजरात राज्य परीवहनाच्या 4 बसेस  नाशिकहून सुरतला जातात याउलट सदर काळात महाराष्ट्राची एकच बस सुरतला जाते. वर सांगितलेली उदाहरणे प्रातिनिधीक आहेत. शितावरून भाताची परीक्षा या म्हणीनूसार ईतर राज्याच्या एसटीबसेस महाराष्ट्रात किती खोलवर घुसलेल्या आहेत, हे यावरून स्पष्ट होते. या बसेस आपल्या महामंडळाच्या जागेत आपला व्यवसाय करतात.महामंडळाने आपल्या वाहक आणि चालकांसाठी तयार केलेल्या सोईसुविधा वापरतात. मात्र या बसेसमुळे आपले प्रवासी कमी होतात, परीणामी एसटीला कमी उत्पन मिळते
                  पुणे ते सोलापूर आणि पुणे ते कोल्हापूर या दरम्यान अनुक्रमे तेलंगणा आणि गोवा राज्याच्या एसटी  आपल्या एसटीपेक्षा तब्बल 40 रूपये कमी भाडे घेतात. त्यांना हे शक्य होते, त्या मागचे प्रमुख कारण म्हणजे त्या राज्य सरकारकडून घेण्यात येणारा कमी प्रवाशी कर . जर त्यांना आपल्या एसटीच्या भाड्याचा समकक्ष भाडे ठेवायला भाग पडले तर , त्यामुळे त्यांचा नफा 40 रुपयांनी वाढण्याचा धोका उत्पन होवू शकतो. रोगापेक्षा इलाज भयंकर असी स्थिती त्यामुळे निर्माण होईल .तरी प्रवाशी कर कमी करणे, हाच यावर उपाय आहे.

                  आपल्या भारतातील स्थापन झालेले पहिले राज्य परीवहन महामंडळ , भारतातील प्रवाश्यांना सगळ्यात पहिले आरामदायी प्रवासी सेवा देणारे राज्य परीवहन महामंडळ (एशियाड या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गाड्या) तसेच आधूनिक स्वरुपाच्या इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या गाड्या(शिवाई नावाच्या गाड्या) राज्य महामंडळाकडून सर्वप्रथम चालवण्याचा विक्रम करणाऱ्या आपल्या महामंडळाला ही परिस्थिती निश्चितच भुषणावह नाही .आपल्या शेजारील मध्यप्रदेश या राज्यातील परीवहन महामंडळ अत्यंत कमकुवत आहे. तर छत्तीसगढ या राज्यातील राज्य परीवहन महामंडळ तेथील राज्य सरकारने कायमस्वरीपी बंद केले आहे . आपल्या महाराष्ट्राच्या परीवहन सेवेची वाटचाल त्या पद्धतीने होवू देयची नसल्यास आताच हातपाय हलवणे गरजेचे आहे. कर्नाटक या राज्य परीवहन सेवेला देखील प्रचंड प्रमाणाण तोटा होत होता, जो त्यांनी बंद करून , सार्वजनिक उपक्रम नफ्यात चालू शकतात, याचा वस्तूपाठच घालून दिला आहे, आपणास त्या प्रकारची पाउले उचलावीच लागतील. 
          आपली एसटी जिपिस प्रणालीचा प्रवाश्यांकरीता वापर, रेल्वेच्या धर्तीवर 650मिली शुद्ध पाण्याची बाटली 10रूपयांना तर 1लीटरची पाण्याची बाटली 15रूपयांना पुरवणे  अस्या अनेक गोष्टीचा वापर करत प्रवाशीभीमुख सेवा देत आहे, त्याची गती आपण वाढवलीच पाहिजे.सध्या आपल्या एसटीवर आलेले संकट भविष्यात दुर होईलही, मात्र पुन्हा असे संकट येवू नये, यासाठी आपण हातपाय हलवलेच पाहिजे, तरच या करोना संकटामुळे आपण काही शिकलो असे म्हणण्यास काही अर्थ राहिल, अन्यथा नाही. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?