चीनचा विस्तारवाद सुरुच

 
                      आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला असता  जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असणाऱ्या चीनचा विस्तारवाद अजूनही सुरु असून  त्यांनी नेपाळच्या 5 जिल्ह्यातील एकत्रीत 150 हेक्टर जमिन स्वतःच्या नियंत्रणात घेतल्याचे नुकतेच स्पष्टपणे निर्दशनास आले आहे.या मुळच्या नेपाळच्या मात्र चीनने अनधिकृतरीत्या घेतलेल्या भुभागावर चीनने काही इमारती आणि लष्करी ठाणी उभारली असल्याची माहिती युनाटेड किंग्डमच्या काही माध्यम़ानी दिली आहे
                 नेपाळ आणि चीनची सिमा हिमालयाच्या डोंगराळ भागातून जात असल्याने नदीच्या तिर किंवा एखादा खांब उभारुन ही सीमा निश्चित केली आहे. चीनच्या लष्कराने (ज्याला पिपल्स लिबरेशन आर्मी अथवा संक्षिप्त स्वरुपात पि एल ए म्हणतात) हे खांब उखडून अथवा नदीच्या प्रवाहात बदल करुन ही घुसखोरी केली आहे. नेपाळच्या ज्या भागात चीनने घुसखोरी केली आहे, त्या भागातील नेपाळी नागरीकांचे विविध उत्पादने चीनकडून खरेदी करण्यात येत असल्याने तेथील नागरीकांनी ही घुसखोरी सहन केली आहे .
             आधूनिक चीनचा संस्थापक माओ याचा मते चीनचा तळवा तिबेट असून त्याची पाच बोटे अर्थात लडाख, नेपाळ, सिक्कीम, भुतान, आणि अरुणाचल प्रदेश असून भविष्यात हा भुभाग घेणे चीनच्या शासन कर्त्यांचे धोरण असले पाहिजे,याच धोरणा अंतर्गत ही घुसखोरी करण्यात आली आहे.भारतात देखील याच धोरणाचा अवलंब करुन घुसखोरी करण्यात येते.

               या 5 जिल्हांपैकी एक जिल्ह्याची सीमेजवळ  भारता नेपाळ  सीमेजवळ आहे. चीनने नेपाळचा भुभाग घेतलेल्या 5जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 70 हेक्टर जमिन याच जिल्ह्यातील आहे. मे महिन्यातच नेपाळची काही जमिन हडपल्याचे दिसून आले होते, मात्र त्या वेळेस नेपाळकडून हे खोटे असल्याचे सांगण्यात आले होते.मात्र यावेळी अनेक युरोपीय देशातील माध्यमांनी या बाबतचे वृत्त दिल्याने या बाबत दोन्ही देशांना नकार देणे अशक्य झाले .सर्वप्रथम या बाबतचे वृत्त देणाऱ्या एका नेपाळी पत्रकाराचे शव चीनच्या सीमेवर सापडले होते .ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. 
सध्याचे नेपाळच्या सरकारची विचारधारा चीनच्या राष्टीय विचारधारेसी अर्थात कम्युनिस्ट विचारधारेसी समानता असल्याने आणि 2015मध्ये नेपाळमध्ये त्यांचा संविधानावरुन झालेल्या आंदोलनात भारत नेपाळ सिमेवरील प्रदेशात नेपाळमध्ये राहणाऱ्या मधेशी लोकांनी  भारताचा आणि नेपाळचा संपर्क तोडल्यामुळे नेपाळमध्ये गृहपयोगी  वस्तूंंची टंचाई झाली होती. त्यावेळेस चीनने त्यांना प्रचंड मदत केल्याने भारत आणि नेपाळचे काहीसे सबंध दुरावले आहेत. त्या पार्श्वभुमीवर याकडे बघायला हवे. 
भारताच्या शेजारील देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत,त्या वेळोवेळी तूमच्या पर्यत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेलच, तूर्तास ईतकेच ,नमस्कार.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?