खगोलशास्त्र प्रेमींना मोठी पर्वणी

             
              आपल्या भारतात पर्वण्यांना धार्मिकदृष्ट्या अन्यन्य साधरण महत्व आहे. खुप वर्षांनी अथवा दिवसांनी या पर्वण्या येतात, त्यामुळे या दिवशी केलेल्या धार्मिक विधी विधींना विशेष महत्त्व आहे .पुढच्या मंगळवारी अर्थात 17नोव्हेंबरला अशीच एक पर्वणी येणार आहे. मात्र ही पर्वणी धार्मिकदृष्ट्या नाही तर खगोलशास्त्र प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे . आकाशात पुर्व दिशेला या  पर्वणीचा योग असणार आहे 
                                    या दिवशी सुर्याभोवती 33 वर्षात एक फेरी पुर्ण करणाऱ्या टेंम्पल टटेल या धूमकेतूमुळे पृथ्वीवर  उल्कावर्षाव होणार आहे . दरवर्षी  नोव्हेंबर महिन्यात 14 नोव्हेंबर ते 21नोव्हेंबर या दिवशी  या धूमकेतूमुळे उल्का वर्षाव होत असतो. जो दर 33 वर्षांनी सगळ्यात जास्त होत असतो. या आधी सन 1998 साली तो सगळ्यात जास्त दिसला होता.  दर वर्षीप्रमाणे याही वर्षी  देखील तो  होत आहे . या वर्षी होणाऱ्या उल्का वर्षावाच्या सर्वोच्च क्षण 17 नोव्हेंबर च्या रात्री (18 नोव्हेंबरची पहाट ) रात्री तीनच्या सुमारास आहे. या सुमारास तो पुर्व दिशेला सिंह राशीच्या पार्श्वभुमीवर दिसणार आहे. 
उल्का वर्षाव ज्याला बोलीभाषेत तारा तूटणे म्हणतात. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. शुभ अथवा अशुभ असे काही नाही .पृथ्वीबाहेरील अवकाश हे संपुर्णत : रिकामे नाही. अनेक वस्तू या मार्गात आहे, ज्या सुर्याभोवती फिरतात . यांची सुर्याभोवती फिरण्याची कक्षा काही ठिकाणी पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्याचा कक्षेला छेदते. ही कक्षा ज्या ठिकाणी छेदते, त्या ठिकाणी पृथ्वी आल्यास त्या वस्तू पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे झेपावतात. पृथ्वीच्या वातावरणात घर्षण झाल्यामुळे त्या वस्तू जळून जातात. आणि पुर्णतः नष्ट होतात. त्यांनाच उल्का म्हणतात . जर या वस्तू पुर्णतः जळाल्या नाहीत. तर त्याचे अवशेष पृथ्वीवर आदळतात, ज्याला अशनी म्हणतात. ही अशनी पृथ्वीवरील ज्या.ठिकाणे आदळते, तिथे एक मोठा खड्डा तयार होतो.ज्याला विवर म्हणतात.
                 आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या तालूक्याचा गावातील विवर आपणास माहिती असेलच .या लोणारच्या लगतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असणारे सिंदखेड राजा हे भुइकोट किल्याचे गाव आहे. या लोणार पासून 72 किमीवर गजानन महारांजांच्या वास्तव्याने पुनित झालेले  शेगाव आहे. येथून जवळच देउळगावराजा येथील बालाजी मंदीर सुप्रसिद्ध आहे. लोणार तालूक्या मुख्यालयाचे गाव होण्याचा आधी ज्या तालूक्यातील गाव होते, त्या मेहकर येथील एक आश्रम प्रसिद्ध आहे. जर 4ते 5 दिवसांचा  मोकळा वेळ असल्यास या भागात चांगली सहल होवू शकते. या ठिकाणची सर्व ठिकाणे एकमेकापासून अर्ध्या ते पाउण तासाच्या अंतरावर आहेत
वर्षभरात अनेक उल्कावर्षाव होतात, ते ज्या धुमकेतूमुळे होतात, तसेच तो उल्का वर्षाव आकाशात ज्या नक्षत्राच्या अथवा राशीच्या पार्श्वभुमीवर दिसतो, त्या नक्षत्र अथवा राशीच्या नावाने तो ओळखला जातो.उल्का वर्षाव साध्या डोळ्याने बघता येते. सुर्यग्रहण बघताना घ्यावी लागते , तसी कोणतीही विशेष काळजी उल्कावर्षाव बघताना घ्यावी लागत नाही. मात्र दुर्बिणीतून बघीतल्यास हा उल्का वर्षाव अधिक उत्तमप्रकारे बघता येतो. उल्का वर्षाव बघताना सतत आकाशाकडे बघावे लागत असल्याने आणि  एक उल्का पडल्यावर काही वेळाने दुसरी उल्का पडत असल्याने हे काम कंटाळवाणे वाटू शकते. मात्र खगोलप्रेमी असलेल्या व्यक्तींना याचा त्रास जाणवत नाही, हेही आपण लक्षात घेयला हवे. यासाठी सभोवताली अंधार असणे आवश्यक आहे. जर बाहेर खुप उजेड असल्यास उल्का दिसणे अवघड आहे. त्यामुळे जर उल्का वर्षाव बघायचा असल्यास प्रकाश प्रदुषणापासून(एखाद्या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त कृत्रिम उजेड  असल्यास त्या ठिकाणी प्रकाश प्रदुषण आहे असे म्हणतात) दूर जावे लागेल.
मग बघताय ना हा उल्का वर्षाव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?