भारताचा इतर देशात डंका

           

             सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे अनेक काहिस्या निरुपद्रवी, मुद्यांवर चर्चेची गुऱ्हाळे चालवत असताना,समस्त भारतीयांची मान गर्वाने ताठ व्हावी , अस्या दोन घटना घडल्या. त्याविषयी पारंपारीक माध्यमांमध्ये फारसी चर्चा न झाल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.
                 तर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने मोक्याचा ठिकाणी वसलेल्या आणि सन 2008 पासून चीन ज्या क्षेत्रात विविध गोष्टींमार्फत आपले अस्तिव दाखवून देत आहे, अस्या लाल समुद्र आणि एडनच्या आखात तसेच अरबी समुद्र  यांच्या मध्ये नकाश्यामध्ये  गेड्यांचा शिंगाप्रमाणे भासणाऱ्या  भुप्रदेशातील अर्थात हाँन आँफ आफ्रिका या भागातील नागरीकांना  भारताच्या नौदलामार्फत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली.भारतीय नौदलाच्या आय एन एस ऐरावत या जहाजामार्फत हाँन आँफ आफ्रिका भागातील नागरीकांना 155 मेट्रीक टन गव्हाचे पीठ, 65 मेट्रीक टन तांदूळ आणि 50 मेट्रीक टन साखर असा एकदंरीत 270 मेट्रीक टन अन्नसाठा नुकताच वितरीत करण्यात आला. या भागातील सोमालीया, इथोपिया , डिबुटी आणि इरेट्रीया या देशात हे धान्य वितरीत करण्यात आले होते . सदर  भाग जागतिक व्यापाऱ्याचा दृष्टीने अत्यंत महत्तवाचा असल्याने फ्रान्स , अमेरीका,चीन, रशिया या देशांचे लष्करी तळ या भागात आहेत.(या भागापासून हाकेच्या अंतरावर अर्थात माँरीसियस मध्ये भारत आता आपला लष्करी तळ उभारत आहे)हे देश आपल्या बाजूने यावेत म्हणून चीनने सदर भागात 2007पासून विकासकामे सुरु केली आहेत . करोनाचा संसर्ग अत्यंत जोरात असताना हिंदी महासागरातील मादगास्कर,  माँरीसियस , मालदीव, सेसेसल्स या बेटस्वरुप देशांवर एकुण 580 टन खाद्य पदार्थ तसेच विविध आर्युवेदीक औषधांसह काही जीवनावश्यक औषधे देखील पुरवण्यात आली 

                         ही झाली एक घडामोड , आता दुसऱ्या घडामोडीविषयी बघूया .तर सन 2017 मध्ये अमेरीकेने इराणवर बंधने लादल्याने भारत ज्या रेल्वेमार्गासाठी मदत करु शकत नव्हता. परीणामी इराणने स्वतःचा ताकदीवर तो रेल्वे मार्ग उभारण्याचे ठरवले होते. तो इराणमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या चाबबहार ते इराण अफगाणिस्तान सिमेवरील झायडान या शहरापर्यत रेल्वेमार्ग उभारण्यासाठी इराणने भारताकडे पुन्हा एकदा मदत मागितली आहे. अमेरीकेत झालेले सत्तातर बघून इराणवरील बंधने कमी होण्याची शक्यता आहे,असे लक्षात आल्याने इराणने ही मागणी केली आहे. भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशासी व्यापार करताना पाकिस्तानचा अडथळा येतो.त्याला पर्याय म्हणून हा मार्ग भारताला उपयोगी पडणार आहे. इराणवरील बंधने कमी झाल्यास भारताला स्वस्तात इंधनपुरवठा होवू शकतो.
          भारत येणाऱ्या काळात जागतिक राजकारणात महत्त्वाची भुमिका बजावणार असल्याचे या दोन्ही घटनांमधून सहजतेनने लक्षात येते आहे. ही भारताची घोडदौड असीच विना अडथळा सुरु रहावी असी इश्वरचरणी करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?