नमन आधुनिक भारताच्या निर्मात्याला


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताची उभारणी करण्याचे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलले , अश्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 14नोव्हेंबर ही जयंती, त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली.
1947च्या सुमारास एखाद दोन वर्षे मागे पुढे  जगभरातील 90 हुन अधिक देश पारतंत्रातून स्वतंत्र झाले, त्या देशातील आजची स्थिती आणि भारताची सद्यस्थिती याचा मागोवा घेतल्यास आपणास पंडीत नेहरु यांचे योगदान लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी अनेक ब्रिटीश आणि पाश्चात्य विचारवंतांनी भारताच्या भवितव्याबाबत अत्यंत प्रतीकुल मते व्यक्त केली होती. ती मते खोटी ठरवली गेली, ती पंडीत नेहरुंमुळेच.
एखाद्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील, तर वर्गातील सर्वच विद्यार्थी  पहिल्या क्रमांकावर उतीर्ण होत नाही, एखाद दुसराच पहिलाच क्रमांकाने उतीर्ण होतो, मात्र यामुळे पंधरा अथवा विसाव्या क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कमी लेखणे चूकीचे असते. तसेच भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांचे आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी काही देश प्रगतीबाबत भारताच्या पुढे असतीलच. मात्र म्हणून भारताच्या प्रगतीबाबत पंडीत नेहरुंचे योगदान नाकारणे कृतन्घ ठरेल, यात शंका नाही.

पंडीत नेहरु यांनी केलेल्या प्रगतीबाबत मी 2019 नोव्हेंबर 13 रोजी लिहलेल्या लेखाची लिंक या लेखाच्या खाली दिलेली आहे. जिज्ञासू ती बघू शकतात.
पंडीत नेहरु यांनी त्यावेळच्या जागतिक महासत्तांच्या राजकरणात भारताची फरफट न होण्यासाठी भारताबरोबर स्वतंत्र्य झालेल्या देशांची स्वतंत्र्य संघटना उभारली. त्यावेळचे जागतिक संदर्भ आता पुर्णपणे बदलले आहेत, त्यामुळे सध्याचा काळातील संदर्भ लावून त्या वेळची परिस्थिती बघणे अत्यंत चूकीचे आहे.  त्यावेळी पाश्चात्य देशांनी गरीब राष्ट्रांचे आपल्या वसाहतवादी धोरणातून प्रचंड शोषण केले . त्यामुळे पाश्चात्य देशांनी आपल्या वसाहतींना तात्काळ स्वातंत्र्य द्यावे असी भारताची भुमिका होती. त्यामुळे पाश्चात्य देशांच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या ताब्यात नसणारे भारताच्या भूभागाच्या शेजारील प्रदेश  हे भारतात समाविष्ट न करण्याचे पंडीत नेहरुंचे धोरण होते. जर हे प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले तर भारत ज्या वसाहतवादाचा धिक्कार करतो, त्याच धोरणाचा अवलंब करतो, असा संदेश त्यामुळे गेला असता, असे तत्कालीन शासन कर्त्यांना वाटत होते. ज्याचे प्रतिबिंब त्यावेळच्या परराष्ट्र धोरणात उमटलेले दिसते. 

भारतातल्या अनेक मोठ्या धरणाची निर्मिती, टाटा मुलभुत संशोधन संस्था, भारतीय अणूविज्ञान विभाग, इस्रो , आदी  जगभरात नावाजलेल्या अनेक संस्थांची निर्मिती त्यांचा काळात झाली आहे. त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावेच लागेल, हे नाकारुन चालणार नाही.
पंडीत नेहरु हे भारताच्या मागेपूढे वर्ष 2 वर्ष स्वतंत्र झालेल्या उत्तर आफ्रिकी , अथवा भारताच्या शेजारील देशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मात्र पुढे लोकशाही गुंडाळून हुकुमशहा झालेल्या सत्ताधिकाऱ्याप्रमाणे ते सहज वागू शकले असते. मात्र ते त्यांनी केले नाही. याबाबत त्यांचा आदर करणेच योग्य ठरेल.
पंडीत नेहरुंचे भारताबाबतचे योगदान एका ब्लॉग पोस्टचा विषय नाहीच .तरी आपली रजा घेतो, नमस्कार. 
2019 नोव्हेंबर 13 रोजीच्या लेखाची लिंक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?