आपल्या शेजारी हे घडत आहे.


आपल्या मराठी वृत्तवाहिन्या विविध ख्यातनाम लोकांच्या घराची दिवाळी दाखवत असताना आपल्या भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानातील गिलगीट बाल्टीस्तान या भागात रविवार 15नोव्हेंबरला विधीमंडळाच्या निवडणूका होत आहे.
 गेल्या काही दिवसांपर्यत प्रशासकीय रचनेनूसार हा प्रदेश केंद्राच्या नियंत्रणाखालील प्रदेश होता (गेल्या काही वर्षापर्यत  पाकिस्तानात केंद्राच्या नियंत्रणात दोन भाग होते. एक हा ज्याला आता आतापर्यत फेडरली अँडमिस्टेटीव्ह नाँर्दन एरीया {संक्षिप्तरुप फाना } म्हणत तर दुसरा म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरचा फेडरली अँडमिस्टेटीव्ह ट्रायबल एरीया {संक्षिप्तरुप फाटा } हा होता, जो काही वर्षापुर्वी खैबर ए पश्तूनवा{वायव्य सरहद्द प्रांत} यात विलीन केला) त्याला पाकिस्तानी संसदेने प्रांत {प्रांत आणि राज्य यात राजशास्त्रादृष्ट्या काही फरक आहेत. प्रांताला राज्याचा तूलनेत कायदेशी अधीकार कमी असतात. मात्र रचना 90ते95% सारखीच असते)म्हणून मान्यता दिल्यावर पहिल्यांंदा या निवडणूका होत आहेत. तेथील प्रांतीय विधीमंडळाची एकूण सदस्य संख्या 33आहे , त्यापैकी 9सदस्य केंद्रातून नियुक्त केले जातात तर 24सदस्य तेथील लोक निवडतात. 

या निवडणूकीच्या काळात एका मतदारसंघातील उमेदवाराचे निधन झाल्यामुळे तेथील निवडणूक 22 नोव्हेंबर रोजी होत आहे. बाकीच्या 23 मतदार संघासाठी सध्या मतदान सुरु आहे. पाकिस्तानचे प्रमुख वर्तमानपत्र असलेल्या DAWN ( पहाट )या वृत्तपत्रानुसार 1972मध्ये आझाद काश्मीरपासून स्वतंत्र झाल्यापासून त्या प्रदेशात ज्या ज्या निवडणूका झाल्या आहेत, त्या त्या वेळी केंद्रात सत्तेत असणारा पक्षच तेथील प्रांतिक विधी मंडळात निवडून आला आहे. आता त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का ?हे बघणे मजेशीर असेल.
भारताचा पाकिस्तानच्या या भागालाच स्वतंत्र प्रांतालाच दर्जा देणे यालाच विरोध आहे. द हिंदू या भारतातील प्रमुख वृत्तपत्रानुसार या भागात शिया मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास राहतात.पाकिस्तानचे अधिकृत नाव सुन्नी इस्लामिक रिपब्लीक आँफ पाकिस्तान आहे. त्यामुळे अन्य पाकिस्तानी जनता आणि स्थानिक जनता यात सातत्याने वाद होतात. डाँनच्या बातमीनूसार या भागाची साक्षरता 98%आहे. या भागातच जगातील सर्वाधिक उंच 10 शिखरांपैकी 4 शिखरे आहेत. येथून जवळच  रशिया आणि ब्रिटीश भारत यांच्यात वाद होवू नये म्हणून बफर झोन असावा म्हणून अफगाणिस्तानात घातलेला चिंचोळा पट्टा आहे.
सध्याचा बदलत्या जागतिक राजकारणात या भागाचे महत्त्व खुप आहे. या भागातील घडामोडी तूम्हाला कळवण्याचा माझा प्रयत्न असेलच तूर्तास इतकेच,नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?