भारत भूतान मैत्री नव्या वळणावर

           


  मित्रानो,आपला  भारत शेजारील देशांशी  नव्याने मैत्रीपूर्ण सबंध प्रस्थपित करत आहे , हे आपण जाणताच . बांगलादेश मालदीव म्यानमार या देशांशी आपल्या भारताशी चीनचा प्रभाव असताना नव्याने निर्माण होणारे मैत्रीपूर्ण सबंध आपण या आधीच बघितले आहेत ते  ज्यांनी वाचले नसतील त्यांच्यासाठी या लेखाच्या शेवटी त्यांचा लिंक दिलेल्या आहेत . त्या ठिकाणी जाऊन आपण ते वाचू शकतात या लेखात मी बोलणार आहे ते भूतान या देशाविषयी

                  भूतान हा  भारत आणि चीन या दोन महासत्ताच्या मधोमध असणारे हिमालयाच्या कुशीतील एक बफर  देश आहे . भारताच्या शेजारील देशांमध्ये घटनादत्त राजेशाही असणारा हा एकमेव देश आहे . .प्रजेची मागणी नसताना शांततेने आपले अधिकार कमी करता जनतेला लोकशाही मार्गावर नेणारा राजा म्हणून भूतानच्या राजाची ओळख आहे . एकीकडे सर्व जग जीडीपी च्या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजत असताना देशातील लोक किती आनंदी आहे , या फूटपट्टीवर देशाची प्रगती मोजण्याची शिकवण जगाला देणारा देश म्हणजे भूतान . भारताच्या पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश या चार राज्याशी मिआहेत . ळून एकत्रित  600 किलोमीटरची सीमा असणारा देश म्हणजे भूतान . नेपाळ सह ज्या देशाचे नागरिक भारतीय प्रशासन सेवेत दाखल होऊ शकतात तो देश म्हणजे भूतान .भारताच्या शेजारील बहुतेक सर्व देश चीनच्या विळख्यात कमी अधिक प्रमाणात अडकले असताना चीनच्या विळख्यात काहीच ना पडलेला देश म्हणजे भूतान सन  1910 भारत ब्रिटिशांच्या अधीन असताना ज्या देशाची जवाबदारी भारताने स्वतःच्या खांद्यावर घेतली तो देश म्हणजे भूतान  (  या कराराचे भारत स्वतंत्र झाल्यावर 1949 मध्ये नूतनीकरण करण्यात आले या नव्या कराराचे देखील 2007 मध्ये नूतनीकरण करण्यात आले .) सार्क आणि बिमस्टेक या आंतरराष्ट्रीय संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे भूतान 


        भुतानबरोबर भारताचा सबंध  गेल्या काही महिन्यापर्यंत मोठा दादागिरी करणारा भाऊ या या न्यायाने होता . मात्र गेल्या काही महिन्यापासून भारताचे भूतान बरोबरचे  सबंध बरोबरच्या न्यायाने आलें आहेत गेल्या 4 महिन्यात भारताने  भुतानबरोबर मिळून विविध अश्या   2 जलविद्युत प्रकल्पासाठी बरोबरीचा वाटा उचलण्याबाबत करार केला आहे . या आधी भारताने भूतानमध्ये जलविद्यतप्रकल्प उभारायचे आणि भुतानने ते प्रकल्प चालवायचे त्यात तयार झालेली वीज ईशान्य भारतातील राज्यांना विकायची अशा शिरस्ता होता याच बरोबर  भारत आणि भूतान यामध्ये व्यापार करणे सोईस्कर व्हावे यासाठी नव्या व्यापरमार्गाची उभारणी देखील करोना संसर्गाच्या भीतीने लादण्यात आलेल्या लॉक डाउनच्या काळात झाली . हा नवा मार्ग धरून सध्या भारत आणि भूतान यांच्या दरम्यान 10 व्यापारी मार्ग आहेत . या मार्गावरून फक्त भारताबरोबरच नव्हे तर अन्य देशांशी देखील व्यापार करण्याची सूट भारत आणि भूतान यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार भूतानला देण्यात आली आहे .  काही दिवसांपूवी भारताच्या भूतानमधील राजदूत असणाऱ्या रुचिरा काम्बोच यांनी केलेल्या विधानानुसार भारत आणि भूतान मधील सबंधाला  विविध पैलू आहेत . या विधांमुळेच भारत भूतान मैत्री नव्याने चर्चेत आलें आहेत .  हे आपण या ठिकाणी लक्षात घेयले पाहिजे 

भारत आपल्या शेजारील देशाशी नव्याने मैत्री सध्या करत आहे. त्यामुळे या क्षेत्रात सातत्याने नव्याने नवीन बदल होत आहेत हे बदल आपणापर्यंत पोहोचवाण्याचा माझा प्रयत्न असेल मात्र सध्यापुरते इतकेच 


मालदीवच्या लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_45.html

म्यानमार विषयीच्या लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_68.html

बांगलादेश विषयीच्या लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/10/blog-post_40.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?