इंदिरा गांधी : एक कणखर पंतप्रधान

           

     आपल्या भारतात काही व्यक्तीमत्वे असी आहेत की, समोरच्याला फक्त त्याचे नाव सांगावे, सबंधीत व्यक्ती बाकीचे सर्वकाही समजून जाते. भारताच्या माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी या त्यापैकीच एक .19 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना मानाचा मुजरा .
            अनेकांना इंदीरा गांधी यांचे नाव घेतल्यावर फक्त आणीबाणीचीच आठवण होते. मात्र खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, सिक्कीमला भारतात पुर्णतः समाविष्ट करुन घेणे.  पाकिस्तानची प्रमुख आर्थिक ताकद असणारा पुर्व पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आणणे, आदी अनेक कार्ये त्यांचा कार्यकाळात झाली.
                       पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लामाबादच्या निर्मितीसाठी लागलेल्या पैसामध्ये पुर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या कररुपी उत्पनाचा वाटा जवळपास 90 ते95% होता. ज्याला इंदिरा गांधीनी स्वतंत्र देश करुन पाकिस्तानचे आर्थिक कबंरडेच मोडले. एका बाजुला पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडताना भारतातील तळागाळातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या हेतूने खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. सन 2008 साली अमेरीकेतील सब प्राईम क्राइसीस मध्ये भारताला खुपच कमी नुकसान झाले, याचे प्रमुख कारण भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण होते, हे नाकारुन चालणार नाही. आणि या बँकांच्या राष्ट्रीयकरणात वाटा सर्वात मोठा वाटा इंदीरा गांधीचा होता, एकार्थी आपण इंदीरा गांधींमुळेच 2008च्या आर्थिक मंदीतून वाचलो, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

सिक्कीमला भारतीय संघराज्यात पुर्णतः समाविष्ट करुन चीनला शह देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचा या कार्यामुळेच पुढे इशान्य भारतात पुढे अनेक विकास कामे राबवणे, शक्य झाले. सिलूगुडी काँरीडाँर ला काही प्रमाणात स्थैर्य भारतात सिक्कीम पुर्णपणे विलीन झाल्यामुळेच मिळाले हे नाकारण्यात काही अर्थ नाही. 
संस्थानिकांचे तनखे बंद करुन संस्थाने पुर्णतः भारतात विलिन करण्याबाबत त्यांचे योगदान कोणीच विसरु शकत नाही. संस्थानिक आणि ईतर जनता हे एकाच पातळीवर आले.  या कृतीमुळे बहूसंख्य संस्थानिक विरोधी पक्षात जावू शकतात, हे माहिती असून त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी हे पाउल उचलले ( आजच्या राजकारणाचा विचार करता पुर्वीचे बहुसंख्य संस्थानिक क्राँग्रेसच्या विरोधी पक्षात आहेतच) संस्थानिकांच्या तनख्यामुळे देशाच्या तिजोरीवर येणारा अतिरिक्त भार त्यांनी कमी केला, याबाबत त्यांचे आभार मानावे तितके थोडेच.
त्यावेळच्या अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षाने इंदिरा गांधींविषयी काढलेले अनुद्गार इंदिरा गांधींची जागतिक राजकारणात किती दहशत होती ? याची साक्ष  देण्यासाठी पुरेसे नाही का ?
इंंदिरा गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले प्राणांचे मोल देखील न विसरता येण्यासारखे आहे. ज्यांना भारताचा भुगोल माहिती आहे,त्यांना हे देखील माहिती आहे की, जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग हा पंजाब मधून जातो. हिमाचल प्रदेशातून जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या मार्गात प्राणवायूच्या कमतरतेसह, अनेक भौगौलिक अडचणी आहेत .जर दुर्दैवाने पंजाब स्वतंत्र देश झाला असता तर आपणास जम्मू काश्मीर देखील गमवायला लागला असता. म्हणजेच इंदिरा गांधींनी आपल्या प्राणाचे मोल देवून पंजाबसह जम्मू काश्मीर देखील वाचवला. त्याबद्दल त्यांना शतशः नमन 

                      इंदिरा गांधी यांचे भारतासाठीचे योगदान, हा  एका ब्लॉग पोस्टचा विषय नाहीच. तरी त्यांचा जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना नमन करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?