असे बनले संविधान (भाग 4)

     

     आपले संविधान जगातील उत्कृष्ट असणाऱ्या काही संविधानापैकी एक आहे. आपले संविधान अमेरीका या देशासारखे अत्यंत ताठर नाही. किंवा युनाटेड किंंग्डमसारखे सहज बदलता येण्यासारखे  नाही. आपल्या संविधानात दुरुस्तीचे तीन प्रकार कलम 368 मध्ये सांगितले आहेच. हे आपणास माहिती असेलच . 
हा मजकूर लिहण्यापर्यत संविधानात 104 वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. त्यातील 42वी, 44 वी आणि 73 वी, 74 वी घटनादुरुस्ती ,69वी घटनादुरुस्ती, 97वी, 52वी, 86 वी, 101,आणि 103वी घटनादुरुस्त्या  विशेष  महत्त्वाच्या आहे. 
42वी घटनादुरुस्ती ही आणिबाणीच्या काळात झालेली घटनादुरूस्ती आहे, यामध्ये घटनेत झालेले बदल हे काहीसे वादगस्त असून या घटनादुरुस्तीत खुप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्यामुळे ही घटनादूरुस्ती  या घटनादुरुस्तीला मिनी संविधान म्हणतात..  या घटनादुरुस्तीमुळे सविधानाच्या उद्देशपत्रीकेत (प्रियंबल मध्ये) काही शद्बांची भर घालण्यात आली. आज पर्यत हे शद्ब अनेकदा वादगस्त ठरले आहेत, मात्र हे शद्ब काढून टाकण्याची घटनादुरुस्ती झालेली नाही.

44वी घटनादुरूस्ती 42व्या घटनादुरुस्तीमुळे झालेले बदल पुर्वपदावर आणणारी घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते. या घटनादुरुस्तीने संपत्तीच्या अधिकाराला मुलभूत अधिकाराच्या कक्षेतून काढून कायदेशीर अधिकाराच्या कक्षेत आणले गेले.  44वी घटना दुरूस्ती जनता दलाच्या ऐताहासिक सरकारच्या कार्यकाळात झाली. दोन वर्ष सरकार चालवल्यावर त्याची कितीतरी शकले झाली.
73वी आणि 74वी घटनादुरूस्ती नरसिंहराव पंतप्रधान असताना झाली . या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज संस्थेला घटनादत्त स्वरुप मिळाले.73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे भारतीय संविधानाच्या कलम 245 मध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले. या कलमामध्ये अनेक उपकलमे जोडण्यात आली. 
69 वी घटनादुरुस्ती दिल्लीच्या विशेष दर्जाविषयी भाष्य करणारी आहे. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारमुळे विशेष चर्चेत आहे. यानुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला मंत्रीमंडळ आणि विधीमंडळाची स्थापना करण्यात आली.
97वी घटनादुरुस्ती ही सहकारी संस्थांविषयी भाष्य करते.या घटनादुरुस्तीमुळे घटनेत प्रथमच सहकरी संस्थांचा समावेश करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे आणि संबधीत बाबी आपणास.माहिती आहेच.तर 52वी घटनादुरुस्ती पक्षांतर बंदी केलेल्या नेत्यांवर काय कारवाई करावी, पक्षांतर म्हणजे काय? हे स्पष्ट करते 

सध्याचा कळात कळीचा मुद्दा बनलेल्या राजकीय नेत्यांचा पक्षबदलावर नियंत्रण ठेवण्याचे काम या घटनादुरुस्तीमार्फत संविधानात अंतर्भुत केलेल्या कलमांंद्वारे केले जाते. करोनाचा संसर्ग इतरत्र पसरु नये म्हणून लादण्यात आलेल्या लाँकडाउनचा काळात महत्त्वाचा ठरलेल्या नवी शिक्षण नितीविषयक एक महत्त्वाचा टप्पा सन 2002मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने घातला.ज्यानुसार प्रत्येक भारतीय नागरीकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला.  सध्याचा मंदीसदृश्य काळात सर्वांसाठी कळीचा मुद्दा ठरलेला जि एस टी बाबतच्या तरतूदी 101 व्या घटना दूरुस्तीने संविधानात आणल्या. सध्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या आयुष्याच्या दृष्टीने ज्वलंत प्रश्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत मात्र खुल्या गटातील लोकांना आरक्षण देण्याचा निर्णय संविधानात 103व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला .
घटनादुरुस्ती संदर्भात केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार आणि गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार हे दोन खटले विशेष महत्त्वाचे आहेत.आपले भारतीय संविधान आपल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे. आपल्या भारताचे संविधान अँप स्वरूपात देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ते सहजतेने वाचता येवू शकते.मग कधी घेताय आपले संविधान वाचायला.!
(सदर लेखाचा विषय श्री दिलीप फडके सरांनी सुचवला आहे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?