भारतीय रेल्वे चित्याचा वेगाने बदलाकडे


150 वर्षापेक्षा अधिक इतिहास असणारी आपली भारतीय रेल्वे सध्या चित्याचा वेगाने बदलत आहे. याची साक्ष पटवणाऱ्या दोन घडामोडी गेल्या पंधरवाड्यात घडल्या. पारंपारीक माध्यमांनी याची यथोचित दखल न घेतल्याने त्या आपणास सांगण्यासाठी आजचे लेखन.
तर भारतीय रेल्वेत रेल्वेगाड्या ओढण्यासाठी विविध प्रकारच्या रेल्वे इंजिनाचा वापर करण्यात येतो, हे आपणास ज्ञात असेलच. जसे WDM 3D, WAP4, WAG 9H, WAP7 वगैरे. ते इंजिन कस्यासाठी वापरायचे?(प्रवाशी गाड्या ओढण्यासाठी, मालवाहतूकीच्या गाड्या ओढण्यासाठी किंवा दोन्ही प्रकारच्या गाड्या ओढण्यासाठी) ते इंजिन कोणत्या प्रकारच्या उर्जेचा वापर करून चालवायचे?(जसे विद्युतप्रवाहावर, डिझेलचा वापर करुन)  अथवा ते रेल्वे इंजीन कोणत्या प्रकारच्या रेल्वेमार्गावर चालवायचे (नँरोगेज , मीटरगेज की ब्राँडगेजवर) यावरुन हे प्रकार पडतात, हे ही आपणास माहिती आहे. 

तर मित्रांनो , भारतीय रेल्वेत गेल्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन घडामोडींपैकी एक घडामोड याच रेल्वे इंजिनाबाबत आहे. भारतीय रेल्वे सध्या डायरेक्ट करंट (डिसी) ट्रँक्शन मोटरवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाचे उत्पादन करणे बंद करत आहे. त्याच मालिकेत WAP4 या इंजिनाचे उत्पादन बंद करण्यात आले WAP4 हे रेल्वे इंजिन लवकरात लवकर गती पकडणे आणि जास्तीत जास्त वजन वाहुन नेणे या त्याचा गुणवैशिष्ठामुळे विशेष लोकप्रिय होते. WAP4 इंजिनमध्ये सिंगल फेजच्या विद्युत मोटारीचा वापर करण्यात येत होता. सध्या या विद्युत मोटारी नियंत्रणात ठेवणाऱ्या इंजिनमधील कंट्रोल पँनेलमध्ये आधूनिकीकरण करण्याचे काम रेल्वेमध्ये सुरु आहे. पुर्वीच्या कंट्रोल पँनेलमध्ये WAP4मध्ये वापरतात ,त्या प्रकारच्या विद्युत मोटारी नियंत्रण करण्याचे काम सहजतेने होत असे, जे काम सध्याचा आधूनिक कंट्रोल पँनेलमध्ये होत नाही, परीणामी ते बदलणे क्रमप्राप्त आहे. जून्या कंट्रोल पँनेलमध्ये थायरेस्टर प्रणालीचा वापर होत असे, तर सध्याचा आधूनिक कंट्रोल पँनेलमध्ये आयजीबिटी  अथवा माँसफिट प्रणालीचा वापर होत असल्याने ही अडचण निर्माण होते तसेच जून्या प्रकारच्या इंजिनात असणाऱ्या ब्रेकप्रणालीत देखील दोष होते, त्यामुळे त्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या रेल्वे इंजिनांना रेल्वेकडून निरोप दिला जात आहे. त्याच मालिकेत या WAP4 इंजिनांना निरोप देण्यात आला.
                                         एकीकडे एका प्रकारच्या इंजिनाचा निरोप सभारंभ सुरु असताना कपूरथाला येथील रेल्वे कोच फँक्टरीमध्ये रेल्वेच्या रिसर्च डेव्हलपमेंट अँड स्टँडडायझेशन  आँरगानयेसन (RDSO या नावाने विख्यात)या विभागामार्फत  आधूनिक प्रकारचे कुशन्स असणाऱ्या LHB प्रकारातील डब्बल डेकर प्रवासी डब्यांची निर्मिती केल्याची बातमी समोर आली. हे डब्बे 160 किमीच्या वेगाने पळण्यास सक्षम आहेत. याद्वारे एका डब्याद्वारे प्रवासी वाहून नेण्याचा क्षमतेत दिडपटीने वाढ होईल. अनेकदा कित्येक दिवस आधी आरक्षण करुन देखील वेटींग लिस्टचा अनुभव येत असतो, त्याला यामुळे काही प्रमाणात आळा बसू शकेल.तसेच एकाचवेळी जास्त प्रवाशी वाहुन नेल्यामुळे रेल्वेच्या वाहतूक खर्चात देखील घट झाल्याने हे डब्बे रेल्वेला काही  प्रमाणात अधिकचा नफा देखील देवू शकतात .अर्थात हे डब्बे प्रवाशी आणि रेल्वे दोघांसाठी फायद्याचे ठरतील मात्र हे डब्बे प्रायोगिक तत्वावर तयार केलेले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या मार्फत सुरक्षेच्या विविध चाचण्या घेतल्यानंतर हे डब्बे सामान्य जनतेसाठी उपलब्ध होतील.

भारतीय रेल्वे झपाट्याने आपली कात टाकत आहे. हेच या दोन्ही बातम्यातून दिसून येत आहे. रेल्वेत होणारे हे बदल आपणापर्यत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेलच. तूर्तास इतकेच , नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?