जरा याद करो उनकी ..........

           

    26 नोव्हेंबर हा एक दिवस नाहीये . भारताच्या  एक ठसठशीत जखमेचा तो दिवस आहे. 2008 नोव्हेंबर. 26 समुद्रमार्गे पाकिस्तानातून 10 अतिरेक्यांनी मुबंईत घातलेल्या धुमाकुळाचा दिवस . आज 2020 साली या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली . वैद्यकशास्त्राचा विचार करता , सध्या आपल्या शरीरात असणाऱ्या  सर्व पेशी  नष्ट होऊन  पूर्णतः नवीन पेशी अस्तित्वात येण्यासाठी 12 वर्षे  लागतात .  या न्यायाने या हल्याचा वेळी आपल्या शरीरात असणाऱ्या पूर्व पेशी आता नष्ट झाल्या आहेत . मात्र त्यावेळी झालेले मानसिक घाव अजूनही भरून आलेले नाहीत . इतका हा हल्ला मोठा होता . 
           या हल्ल्याचे पूर्ण नियोजन करून हा हल्ला झाला होता . याची साक्ष त्यांनी दिवस निवडण्यापासून होते .26 नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिन  म्हणून साजरा करतो. त्याच्यावर हल्ला व्हावा,  हा यामागचा प्रमुख हेतू होता . त्यांनी प्रचंड प्रमाणात दारुगोळा देखील आणला होता , त्यावेळचा अत्याधुनिक दळणवळण  सोयीसुविधा त्यांनी वापरले होते . त्याचा जोरावर त्यांनी सलग तीन दिवस रात्र आपल्या सैन्यावर प्रचंड हल्ला केला . त्यांनी त्यासाठी मुंबईची अर्थात आपल्या आर्थिक राजधानीची निवड केली . कराची मार्गे येऊन त्यांनी मुबंईत आपले बस्तान बसवले . या आधी 15 वर्षे अर्थात 1993 मार्च मध्ये सुद्धा मुंबईत समुद्रमार्गे स्फोटके आणून साखळी स्फोट केले होते . मात्र त्यातून आपण काहीच शिकलो नसल्याचे या हल्ल्यातून स्पष्ट झाले . 

      छत्रपती शिवाजी महाराज वगळता आपल्या भारताच्या मध्ययुगातील कोणत्याही राज्यकर्त्याने समुद्रावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले नाहीत{. प्राचीन इतिहासात चालुक्य (दोन्ही चालुक्य राजवटी ) गुप्त आदी घराण्याने दोन्ही समुद्राला स्पर्श होईल इतक्या मोठ्या भूभागावर सत्ता निर्माण केली मात्र त्यांना आरमार उभारावेशे वाटले नाही नाही } जे पुढच्या काळात मराठी भाषिक सरदारांनी आपसातील वैरापायी धुळीला मिळवले . जाची शिक्षा आपणास या हल्ल्यातून मिळाली . नुकतेच या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारास पाकिस्तानात शिक्षा झाली . यातील अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली हा सध्या अमेरिकी कारागृहात शिक्षा भोगतोय . त्याचे आपणाकडे प्रत्यार्पण झाल्यावर या विषयी अधिक माहिती मिळेल . 
                         या हल्यात आपण अनेक शूरवीर लोकांना गमावले . भारताचे हे नुकसान आपण कधीही भरून काढू शकणार नाही . यात सहभागी असणारे सर्व गुन्हेगार यमसदनी जातील मात्र हे नुकसान कधीही भरून निघणार नाही .आपल्या भारतात कोणत्याही गोष्टीचे होते तसे गलिच्छ राजकारण याही गोष्टीचे झाले . यात हौताम्य आलेल्या व्यक्ती काही ठराविक व्यक्तीच्या अतिरेकातून मृत्युमुखी पडल्या असे संतापजनक आरोप देखील याबाबत झाले . या हल्ल्यानंतर मुबईची सुरक्षव्यवस्था वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची निश्चित करण्यात आले . त्यातील वस्तुस्थिती काय आहे ,? हे आपण जनतातच . त्यानंतर समस्त देशात असा प्रकारचा मोठा हल्ला झालेला झालेला नाही . हे देखील आपल्या प्रशासनाचे यशच म्हणायला हवे . यामध्ये आपण एकमेव जिवंत पकडलेल्या अजमल कसाब या अतिरेक्याला सर्व प्रकारच्या न्यायविषयक सेवा पुरवून योग्य पद्दतीने न्यायालयीन खटला चालवून पुण्याचा येरवडा कारगृहात फाशी दिले . 

            या विषयी खूप काही लिहिता येऊ शकते , मात्र लेखन कुठेना कुठे थांबणे आवश्यक आहे , त्यामुळे येथेच थांबतो , जाताजाता या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण आदरांजली वाहतो , 
जय हिंद 
याच हल्याविषयी मागच्या वर्षी अर्थात  20129  नोव्हेंबर 25 रोजी लिहलेल्या लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?