भारत अफगाण मैत्री नव्या वळणावर

   


    मित्रानो भारत आपल्या शेजारील देशांशी असणारे मैत्रीचे नाते  अधिक दृढ करत आहे, हे आपणास माहिती आहेच  बांगलादेश,  म्यानमार या देशांशी ईशान्य भारताच्या विकासात भागीदार म्हणून तर श्रीलंका नेपाळ मालदीव भूतान या देशांशी चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी तर पाकिस्तानला कोंडीत पकडण्याबरोबर, मध्य आशियातून   नैसर्गिक   ऊर्जा संसाधने मिळण्यासाठी अफगाणिस्तान बरोबर भारत मैत्री वाढवत आहे हे आपणास ज्ञात आहेच . आतापर्यंत मी बांगलादेश , म्यानमार, भूतान , नेपाळ, मालदीव, श्रीलंका  आदी देशांशी भारताचे नव्याने विस्तारित होणारे मैत्री संबंध आपण अभ्यासले आहेत . ज्यांना ते वाचायचे असतील त्या लोकांना शोधणे सोईस्कर व्हावे या साठी त्याचा लिंक या लेखाच्या खाली देत आहे . आज मी बोलणार आहे  अगणिस्ताना विषयी . 

     अफगाणिस्तान महाभारतातील  शकुनी मामाचा देश, फक्त बंगालमधीलच नव्हे तर भारतातील महत्वाचे साहित्यिक असणाऱ्या रवींद्रनाथ टागोर  यांच्या कथेतील कबुलीवाल्याचा देश, 1761 साली  भारतावर आक्रमण करून मराठी भाषिकांचा लाजिरवाणा पराभव करणाऱ्या अब्दालीचा देश, 12व्या  शतकापासून  भारतावर आक्रमण करणाऱ्या विविध आक्रमकांचा देश म्हणजे अफगाणिस्तान , बुद्ध धर्मीय संस्कृतीचा प्रभाव असणारा मात्र मुस्लिम बांधव यांची जवळपास 100% वस्ती असणारा देश म्हणजे अफगाणिस्तान . पूर्वीच्या सिल्क रूट वरील मध्य आशिया आणि आखाती देश यांच्या मधील दुवा म्हणजे अफगाणिस्तान. सार्क  संघटनेतील भारताच्या बरोबर सदस्य देश असणारा देश म्हणजे अफगाणिस्तान. ब्रिटिश भारत आणि रशिया यांच्या साम्राज विस्तारात दोंघांचे भांडण होऊ नये म्हणून बफर स्टेट म्हणून भूमिका बजावणारा देश म्हणजे अफगाणिस्तान . (अफगाणिस्तानचा नकाशा बघितला असता पाकिस्तानच्या उत्तरेला भारताला येऊन मिळणारी  चिंचोळी पट्टी   दिसते  जी ब्रिटिश इंडिया आणि रशिया यांनी आपले सीमेवरून  वाद होऊ नये म्हणून अफगाणिस्तानला दिलेल्या भूभागाची आहे . ) दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या शीतयुद्धामुळे बेचिराख झालेला देश म्हणजे अफगाणिस्तान . भारताची नैसर्गिक वायूची गरज भागवण्यासाठी ताजकिस्तान या देशातून येणारी  पाईपलाईन ज्या ज्या  देशातून जाणार आहे त्या तील  ताजिकिस्तान पाकिस्तान आणि भारत वगळता अन्य देश म्हणजे अफगाणिस्तान ( या पाइपलाइनला तापी म्हणतात ) 


तर मित्रानो पहिल्यांदा 10 वर्ष चाललेल्या मात्र तरीही कोणीही न जिकंलेल्या  सेव्हियत रशिया,  अफगाणिस्तान आणि अमेरिका या तीन देशात  यांच्यात झालेल्या युध्द्दामुळे आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या कट्टर धार्मिक शासक मिळाल्यामुळे बेचिराख झालेल्या अफगाणीस्तानची नव्याने उभारणी करण्याचे काम सध्या अत्यंत वेगात सुरु आहे . आणि त्यामध्ये भारताचे प्रचंड योगदान आहे . आजमितीस अफगाणिस्तानच्या 43 राज्यांमध्ये मिळून भारताने आजमितीस 400 विकासकामे उभारली आहेत . आणि अजूनही उभारत आहे .( अफगाणिस्तानला समुद्र किनारा लाभलेला नसल्याने त्याचा व्यापारात अडचण येऊ नये म्हणून त्याला अफगाणिस्तान इराण सीमेवरून इराणच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत  बांधून दिलेल्या मार्ग वगळून )  अफगाणिस्तानची संसदेची इमारत देखील भारताने बांधलेली आहे . अफगाणिस्तान भारत मैत्री असे नामकरण करण्यात आलेले धरण हि त्यातील प्रमुख कामे 


दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येणारे  अफगाणिस्तान पुनर्स्थापना  संमेलन  नुकतीच 2020 नोव्हेंबर 24 रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते . हे संमेलन संयुक्त राष्ट संघटना, फिनलंड या देशाचे सरकार आणि अफगाणिस्तानचे सरकार या तिघांनी संयुक्तरित्या आयोजित केलेली होती . ज्यामध्ये भारतातर्फे आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी  सहभाग नोंदवला .यामध्ये येत्या काही वर्षात भारत अफगाणिस्तानमध्ये 80 विकासकामे उभारणार असल्याचे भारताकडून जाहीर करण्यात आले  ज्यामध्ये अफगाणीस्तानची राजधानी असलेल्या काबुलची पाण्याची गरज भागवण्यासाठी,  काबुल या हिंदकुश पर्वतात उगम पावून,  पाकिस्तानात  सिंधूला मिळणाऱ्या नदीच्या मैदान या उपनदीवर बांधून देण्यात येणाऱ्या धरणाचा प्रामुख्यने समावेश आहे . या धरणामुळे काबुल नदीचे पाणी  कानी होऊन त्यामुळे पाकिस्तानच्या खैबर या पश्तुनवा या  प्रांतात  समस्या उभ्या राहतील अशा कांगावा करत पाकिस्तानने या धरणाच्या निर्मितीस विरोध केला आहे . सध्या आपण अमेरिकेचे खूप मोठे हिंतचिंतक असल्याचे भासवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेला अमेरिकेचे  सैन्य अफगाणिस्तान मधून काढण्याचा कार्यक्रम सुरु आहे . अमेरिकेचे सैन्य   गेल्यावर पाकिस्तानबाबत सहानुभीती असणारे तालिबानी लोकांचे सरकार येण्याची शक्यता असताना भारत हे विकासकामे उभारत आहे हे विशेष 

भारत अफगाणिस्तान मैत्रीविषयी खूप काही बोलता  येऊ शकते मात्र कुठे तरी थांबणे आवश्यक असल्याने इथेच इथेच थांबतो, नमस्कार 

नेपाळ विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_20.html

श्रीलंका विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_19.html

भूइ तान विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_17.html

म्यानमार विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_68.html

मालदीव विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/11/blog-post_45.html

बांगलादेश विषयक लेखाची लिंक 

http://ajinkyatarte.blogspot.com/2020/10/blog-post_40.html 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?