तळगाळातील व्यक्तिंच्या व्यथा मांडणारे महात्मा फुले.

 

आजपासून सुमारे 140 वर्षापूर्वीची गोष्ट आहे . भारतातील सर्वसामान्य , तळागाळातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी समाजातील उच्च पदस्थ व्यक्ती , इंग्रजी वेशभुषेत एकत्र जमले आहेत. या चर्चासत्रात जमलेल्या बहुसंख्य व्यक्तिंचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संपर्क नव्हता. अश्या व्यक्तींच्या समुहात एक व्यक्ती येते. व्यक्तीचा पेहराव सर्वसामान्य जनतेसारखाच असतो. सदर व्यक्ती मला माझे म्हणणे मांडायचे आहे, असा आग्रह आयोजकांकडे करते. ही अशिक्षीत गावढंळ वाटणारी व्यक्ती या उच्च पदस्थांच्या सभेत काय बोलणार ? म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र एक औपचारीकता म्हणून त्या व्यक्तिला बोलण्याची संधी दिली जाते. मात्र त्या सभेत उपस्थित असणाऱ्या उच्च पदस्थ व्यक्तींना लाजवेल , अश्या अस्सलिखित इंग्रजी भाषेत ती व्यक्ती शेतकऱ्यांचे मुळातील दूःख जनतेसमोर मांडते. या चर्चासत्राला उच्चपदस्थांचा विरंगुळा असे संबोधते. त्या व्यक्तींचे नाव असते. महात्मा ज्योतीबा फुले.
28 नोव्हेंबर ही त्यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली .
                  समाजातील तळागाळातील व्यक्तींचा अज्ञानाचा फायदा घेत समाजातील उच्च पदस्थ कोणत्या प्रकारे लूबाडतात, हे त्यांनी जवळून बघीतले. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखनात या तळागाळातील व्यक्तीला याबाबत सजगता यावी, यासाठी प्रयत्न केले. त्यांचा ब्राह्मणांचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड ,तृतीय रत्न, या पुस्तकात ही बाब विशेषत्वाने दिसते. त्यांचे लेखन कोणत्याही  एका विशिष्ट व्यक्ती समुहाविरुद्ध नव्हते, तर लोकांचा अज्ञानाचा फायदा घेत त्यांना लूबाडणाऱ्या लोकांविरुद्ध होते
          . महात्मा फुले हे  महिलांसाठी शिक्षण सुरु करणारे पहिले भारतीय होते . महात्मा फुले यांच्या आधी एका युरोपीय व्यक्तीने महिलांसाठी शाळा सुरु केली होती. मात्र ती व्यक्ति युरोपीय होती, भारतीय नव्हती.हीबाब लक्षात घेणे आवश्यक आहे.सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अधिकार असलेल्या उच्च पदस्थ व्यक्ती समुहातील नसलेल्या महात्मा फुले यांनी भारतीयांचा दैन्याबाबतचे मुळ कारण शोधून , त्यावरच प्रहार केला. याबाबत त्यांचे आभार मानावे, तितके कमीच आहे. समाजातील अर्ध्याहुन अधिक संख्येला बंद असलेली ज्ञानाची कवाडे त्यांनी उघडली. 
               आजच्या शेतकऱ्यांना भेडसवाणाऱ्या अनेक समस्या त्याही वेळी शेतकऱ्यांना त्रस्त करत होत्या. त्यावर त्यांनी अनेक उपायही सांगितले होते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आयोगामागून आयोग नेमणारे सध्याचे शासन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेले उपाय वाचण्याचे तरी कष्ट घेत का ? असा प्रश्न सध्याची शेतकऱ्यांची स्थिती बघून वाटते.
महात्मा फुले यांचे कार्य एका पोस्टचा विषय नाहीच . मात्र लेखनात कुठेना कुठे थांबणे आवश्यक आहे. तरी जाताजाता सर्वांना महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या  शुभेच्छा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?