समान मानव माना त्यांना

       

कवीवर्य कुसुमाग्रजांची फटका या काव्यप्रकारातील एक सुप्रसिद्ध कविता आहे, "स्वातंत्र्य देवतेची विनवणी" नावाची. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पुर्ण होवून सुद्धा समाजात असणाऱ्या दोषांबद्दल स्वातंत्र्यदेवता आपल्या भारतीयांना ते दोष दूर करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत आहे, असी कल्पना करुन दैनिक सकाळसाठी लिहलेली ही कविता खरोखरीच उत्तम आहे.(दुर्देवाने ही कविता प्रसिद्ध होवून 22 वर्षे होवून देखील परिस्थिती फारसी बदललेली नाही. किंबहूना " जातीभेद,जून्या गोष्टी सोडून नव्या गोष्टी आत्मसात करणे,  तसेच मराठी भाषेविषयची स्थिती" पुर्वीपेक्षा खालवलेली दिसते, )असो.
         या कवितेत महिलांविषयी बोलताना कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात, "समान मानव माना स्त्रीला, देवी म्हणूनी भजू नका, दासी  म्हणूनी  पिटू नका". कवीवर्य कुसुमाग्रज यांनी महिलांविषयी व्यक्त केलेली ही अपेक्षा आपल्या समाजातील अनेक घटकांना देखील तंतोतंत लागू होते. आपल्या भारतातील दिव्यांग व्यक्ती समुह देखील या व्यक्तीपैंकीच एक .
आपल्या समाजाचा दिव्यांग व्यक्तींविषयक दृष्टिकोन आता अत्यंत हळूहळू बदलत आहे. त्यामुळे  बहुसंख्याचा दृष्टिकोन दिव्यांगाबाबत अरेरे! काय त्यांचे दुर्देव. किती त्रास त्याला होतोय असा असायचा, किंवा काही वात्रट लोक ती व्यक्ती ज्या हाल अपेष्टांना सहन करतेय. त्यावरुन तीची थट्टा करायची असाच असतो. 
मात्र दिव्यांग व्यक्तींना त्यांचा अडचणी स्विकारुन समानतेने वागवणे, आवश्यक असते. त्यांचा शाररीक अथवा मानसिक वैग्युणेमुळे येणारी अक्षमता स्विकारुन त्यांना जगणे अधिक सोपे होईल, असी व्यवस्था समाजात असावी ,ही जाणीव आता समाजात येत आहे.

       आपल्या भारतात दिव्यांग व्यक्ती म्हटल्या की प्रामुख्याने शाररीक दिव्यांग व्यक्तींचाच समावेश केला जातो. मात्र अपंगत्व हे फक्त शाररीक नसून मानसिकसुद्धा असू शकते. याची जाणीव आपल्या भारतात खुपच कमी लोकांना आहे.  परीणामी प्रौढ मानसिक दिव्यांग ही आपल्या समाजातील एक प्रमुख समस्या आहे. प्रौढ दिव्यांगामध्ये, विविध गंभीर मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्ती तसेच डिक्सेसेलिया, मतीमंदत्व या सारखे जन्मजात दोषांचा समावेश होतो.
          आता आपल्या भारतात शाररीक दिव्यांगाबाबत जनजागृती हो आहे,हे ही नसे थोडके .मला खात्री आहे की, अजून काही 3डिसेंबर चे जागतिक दिव्यांग दिन झाल्यावर आपल्या समाजात मानसिक दिव्यांगाबाबत नक्कीच विचारमंथन होईल.हा 3डिसेंबर लवकरात लवकर यावा, असी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?