50 वर्ष अभिमानाची

             

                     या डिसेंबर महिन्यात एका मोठ्या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्प सुरु  होणार आहे. या घटनेने एक विश्वविक्रम केला आहे. ही घटना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटना आहे, भारताने  जगातील एका देशातील 90 हजार सैनिकांना युद्धकैदी बनवण्याची , जो एक जागतिक विक्रम आहे, ज्या देशातील सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले तो देश आहे, पाकिस्तान आणि  ती घटना आहे, पाकिस्तानचा पुर्व भाग पाकिस्तानचा तावडीतून सोडून स्वतंत्र देश  अर्थात बांगलादेशच्या निर्मितीची . येत्या 16 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या 49वा स्वातंत्र्यदिन आहे.हा अतूलनीय भीम पराक्रम करणाऱ्या भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा .
                                              बांगलादेश, 1947 साली पाकिस्तानची निर्मिती होत असताना बंगाल प्रांताच्या पुर्वेकडील जो भाग पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला , तो भाग म्हणजे बांगलादेश.सन 1858ते 1947 आपल्यावर राज्य करणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशाच्या अर्धा भुभागा एव्हढा असणारा देश, भारताच्या पाच राज्यांना(पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपूरा , मिझोराम )सीमा असणारा देश म्हणजे बांगलादेश. आपल्या भारताची सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा ज्या देशाबरोबर आहे तो देश म्हणजे बांगलादेश. आपले राष्ट्रगीत ज्या रविंद्रनाथ टागोर यांनी लिहले त्यांचाच बंगालविषयी गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देणारा देश म्हणजे बांगलादेश. ज्या देशाच्या शासनकर्त्यांनी मांडलेल्या संकल्पनेतून सार्कची मुहुर्तमेढ रोवली गेली , तोक्ष देश म्हणजे बांगलादेश.

                                    1947साली स्वतंत्र्य झाल्यावर 1956 साली तयार झालेल्या संविधानानुसार {(पाकिस्तानचे पहिले  संविधान1956साली तयार झाले तरी लगेच लष्करी उठाव झाल्यामूळे पाकिस्तानात पहिल्या सार्वत्रीक निवडणूका 1970साली झाल्या) पाकिस्तानात 1956 नंतर 1972साली पुर्णतः नविन संविधान तयार करण्यात आले. जे 1987 पर्यत अस्तिवात होते. सध्या पाकिस्तानात 1987 साली तयार झालेले मुळातील तिसरे संविधान अस्तिवात आहे} 1970 साली झालेल्या देशाच्या पहिल्याच सार्वत्रीक निवडणूकीत मिळालेल्या कौलानुसार जे पंतप्रधान पदासाठी सुयोग्य उमेदवार होते त्या शेख मुहुबीजीर रेहमान यांना पंतप्रधान बनू न देता त्यावेळच्या मुळच्या लष्करी असणाऱ्या राष्ट्रपतींनी अर्थात  ह्या ह्या खान  यांनी  त्यावेळच्या पश्चिम पाकिस्तानातील  फिरोझ खान  यांना पंतप्रधान बनवल्याने आधीच असंतुष्ट असणाऱ्या पुर्व पाकिस्तानातील जनतेने शेख मुहुबुजीर रेहमान यांच्या नेर्तृत्वाखाली उठाव केला. पाकिस्तानने अत्यंत पाशवी पद्धतीने तो मोडून काढण्याचा प्रयत्न केला .परीणाम स्वरुप तेथील लाखो लोक भयभीत होवून भारतात शरणार्थी म्हणून येण्यास सुरवात झाली. भारताला हे शरणार्थी झेपेणात  यातून भारत आणि पाकिस्तानात 15 दिवस युद्ध झाले, या युद्धात पाकिस्तानच्या प्रतापामुळे  महासत्तांनी आपले प्रचंड असे नौदल बंगालचा उपसागरात आणल्याने तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झाली होती.सुदैवाने तो धोका टळला. युद्धाची फलनिश्चिती स्वरुप भारतीय उपखंडात एका नव्या देशाचा जन्म झाला , त्याचे नाव बांगलादेश.आणि ज्यांचा नेर्तृत्वाखाली पुर्व पाकिस्तानने अखंड पाकिस्तान विरुद्ध उठाव केला, ते नेते अर्थात शेख मुहुबुजीर रेहमान देशाचे राष्ट्रपती झाले.


                तेथून आता 2020पर्यतची भारत बांगलादेशची वाटचाल पुढच्या भागात . तो पर्यत नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?