50 वर्षे अभिमानाची ( भाग 2)

       

  आपल्या भारताच्या लष्कराने बांगल देशाची निर्मिती करण्याचा घटनेला या 2020 वर्षात 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्षे सुरु झाले. या निमित्ताने भारतीय लष्कराचे मनःपुर्वक आभार. तसेच या घटनेत अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरीत्या सहभाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन.
या घटनेमुळे अनेक बदल झाले.
        ज्यामध्ये पाकिस्तानचा आर्थिक प्रगतीचा दर झपाट्याने कमी होणे. पाकिस्तानच्या इतर असंतुष्ट गटांना त्यामुळे प्रेरणा मिळणे भारताच्या लष्करी आणि कुटनितीच्या ताकदीच्या प्रत्यय सर्व जगाला येणे, या प्रमुख गोष्टी होत्या .असो.
       पाकिस्तानची नविन राजधानी इस्लामाबाद उभारताना लागलेल्या पैश्यापैकी जवळपास सर्वच पैसे, हे त्या वेळच्या पुर्व पाकिस्तानातील तागाची इतर देशांना निर्यात करुन मिळवले होते. आपण पाकिस्तानचा आर्थिक वृद्धीचा दराचा विचार करता 1971 चा आधीचा पाकिस्तानचा आर्थिक वृद्धी  दर आशियातील सर्वात जास्त आर्थिक वृद्धी दर असणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये मोडला जात असे.(राजकीय स्थैर्य मात्र नसल्यागतच होते .1947 ते 1959 पर्यंत 7 पंतप्रधान बदलले गेले. 1958 च्या लष्करी  उठावामुळे 1959 साली पाकिस्तानातील पंतप्रधानपद संपले. जे पाकिस्तानात दिसले ते 1970 साली) जो नंतर झपाट्याने कमी झाला. दरामध्ये ही विक्रमी घट होण्यामागे     पुर्व पाकिस्तान ही सोन्याची अंडी पाकिस्तानने गमावल्याचे प्रमुख कारण आहे.

                 अखंडीत पाकिस्तानातून पुर्व पाकिस्तान वेगळे झाल्यामुळे पाकिस्तानातील इतर असंतुष्ट गटांना आपण प्रयत्न केल्यास वेगळे होवू शकतो, या बाबत विश्वास वाटू लागला. ज्यामुळे बलूचिस्थान लिबरेशन आर्मी सारख्या संघटनांना बळ मिळाले. जिये सिंध ही स्वतंत्र्य सिंधूदेशाची चळवळ जोमाने सुरु झाली.
                          या विजयामुळे भारताच्या लष्करी आणि कुटनितीचा प्रत्यय जगाला आला. पाकिस्तानची पाणबुडी गा़झी बुडवण्यासाठी खेळलेली चाल असो, राजस्थानात अत्यंत तूटपुंज्या मानवी बळावर प्रचंड मोठ्या पाकिस्तानी सैन्याला चाळलेली धूळ असो. अथवा बांगलादेशात मुक्तीवाहिनी बरोबर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढलेले युद्ध असो, अथवा मुक्तीवाहिनीला दिलेले प्रशिक्षण असो. किंवा जग तिसऱ्या महायुद्धाच्या टोकावर बसलेले असताना सेव्हीयत सोशालिस्ट आँफ रशिया चे आरमार आणि युनाटेड सँटेटस् आँफ अमेरीका यांचे आरमार तसेच युनाटेड किग्डमचे आरमार यांच्यात प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग येवू न देणे (जगात दोनदा तिसऱ्या महायुद्धाला सुरवात होण्यासारखी  स्थिती उद्भवली होती , एक म्हणजे ही होय, तर दुसरी म्हणजे क्युबन मिसाईल इंसीडंट म्हणून प्रसिद्ध असणारा प्रसंग. मात्र आपल्या सर्वांचा सुदैवाने दोन्ही प्रसंगात युद्ध झाले नाही, ), तसेच पुर्व पाकिस्तानातील स्थलांतरांना सोईसुविधा पुरवणे.या सर्व प्रसंगात भारताचे लष्करी, आर्थिक तसेच कुटनितीचे सामर्थ्य जगाला समजले. याच्या आधी जगात भारताची प्रतिमा फारशी  चांगली नव्हती. विकसनशील देशांतील एक देश म्हणूनच जग भारताकडे बघत असे .आपण आफ्रिकी देशांकडे ज्या नजरेतून बघतो, त्याच नजरेतून जग त्यावेळी आपणाकडे बघत होते.  त्या दृष्टिकोनात या विजयामध्ये प्रचंड बदल झाला . 

             काही व्यक्ती या युद्धाला सर्वस्वी पाकिस्तान जवाबदार असून देखील भारताने त्याबाबत पाकिस्तानकडून काहिही युद्ध खंडणी न घेता त्यांचे सैनिक सहज मुक्त केले अशा आरोप करतात . मात्र कोणतेही  निर्णय  त्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतलेले असतात . ज्याचे कालांतराने मूल्यमापन करताना त्यातील विसंगती दिसू शकतात . मात्र प्रत्येक वेळची स्थिती वेगवेगळी असते हे आपण यावेळी लक्षात घेतले पाहिजे . या युद्धाविषयी खूप काही बोलता येऊ शकते मात्र ततूर्तास इतकेच नमस्कार 
माझ्या या लेखाच्या पहिल्या भागाची लिंक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?