कधीपर्यत हे चालणार?

     

महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजधानी अर्थात पुणे शहरात 9 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत असंस्कृतपणाचे वर्तन घडले. त्याबद्दल या प्रकरणाचा करावा तितका निषेध कमीच आहे.
      पुण्यातील असंस्कृत नागरीकांमुळे एका रानगव्याचा दूर्देवी मृत्यू झाला. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवो. मोठ्या प्रमाणावर पुर येवो, अथवा एखादा वन्यजीव चुकून मानवी वस्तीत येवो, अस्या प्रसंगी कसे वागायचे ? याविषयीचा आपल्याकडे असंस्कृतपणा सार्वत्रीक आहे. त्याचेच प्रत्यंतर  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुण्यात घडले.
या अस्या असंस्कृत लोकांमुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे येतात. या अति उत्साही लोकांना आवरायचे की , ज्यांना खरोखरीच मदतीची गरज आहे . त्यांचा मदतीसाठी धावायचे?, असा प्रश्न या अतिउत्साही लोकांमूळे  सातत्याने उपस्थित होतो.       
       एखादा वन्यजीव मानवी वस्तीत आल्यावर सबंधीत वस्तीतील लोकांमध्ये भिती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या लोकांबरोबरच त्याला बघायला इतर लोकही येतात. या गर्दीमुळे आधीच घाबरलेला वन्यजीव  अजूनच घाबरतो, आणि जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे फिरायला लागतो. तो इकडे तिकडे फिरत आहे, हे बघून लोक सुद्धा भयभीत होतात. आणि मग मोठी दुर्घटना घडते. खरेतर आपल्या पृथ्वीवर मानवप्राणी सोडता अन्य कोणताही जीव सहज गमत म्हणून दुसऱ्या प्राण्यांचा वाटेवर जात नाही. प्राणी दुसऱ्यावर हल्ला करतो, तो घाबरल्यामुळे स्व संरक्षणार्थ . जर त्याला दुसऱ्या प्राण्याची भिती वाटली नाही, तर पक्के हाडवैरी असणारे कुत्रा मांजर सारखे प्राणी देखील एकत्र नांदत असल्याचे आपण बघतोच.

     सध्या मानवाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या हद्दीत मानवी वस्ती होणे आता क्रमप्राप्त आहे. ज्यामुळे वन्यजीव आणि मानव यांनी एकत्र सहजीवन करणे अत्यावश्यक आहे. ही गोष्ट अवघड असली तरी अशक्य नाही. गुजरातच्या गीर अभारण्याचा प्रदेश, आसाममधील काझीरंगा अभारण्याचा प्रदेशात या प्रकारचे सहजीवन खुप आधीपासूनच आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बाबा आमटे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या विविध प्रकल्पात आपणास हा प्रत्यय येतो. आता असे प्रयत्न व्यापक स्वरुपात राबवणे, अत्यावश्यक आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच यासाठी वन्यजीवांपेक्षा मानवांना प्रशिक्षीत करणे सहजसोपे आहे.
वन्यप्राण्यांना एका विशिष्ट जागेत अभारण्यात बंदीस्त करणे हा यावरचा उपाय होवूच शकत नाही. प्रत्येक वन्यप्राण्यांची एक विशिष्ट हद्द असते. त्या हद्दीत ते दूसऱ्या प्राण्याला प्रवेश करु देत नाहीत. जर त्यांना अभारण्यात बंदीस्त केले तर त्यांचा आपसात हद्दीबाबत वाद होवून पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.
त्यामुळे मानवांनी वन्यप्राण्यांबरोबर शांततेत रहायला शिकणे हाच महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी अर्थात पुण्यात झालेल्या दुर्देवी  हत्येचा प्रकार पुन्हा होवू न देणे यासाठी आवश्यक आहे. नाहीतर केरळमध्ये गर्भ असलेल्या हत्तीचा मृत्यू, पुण्यात रानगव्याचा मृत्यू हे प्रकार चालूच राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?