भविष्याचा वेध घेणारी ....... नॅशनल रेल पॉलिसी

                       


      भारतीय रेल्वे ही प्रचंड संख्येने बदलत आहे ,  हे आपण जाणतातच . त्याच मालिकेत भविष्यात कोणकोणते बदल होणार आहे ?  याची झलक देणारी नॅशनल रेल पॉलिसीचा मसुदा  नुकतीच केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे . ज्यामध्ये पुढील  30 वर्षाचा आढावा घेऊन रेल्वमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत . याची  रूपरेखा सांगण्यात आली आहे .   या मसुद्याचे  तीन  भागात विभाजन करण्यात आले आहे . जे  2024 पर्यंत करावयाची कामे,  2030 पर्यंत करावयाची कामे , आणि 2050 पर्यंत कामे असे विभाजन करण्यात आले आहे . केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मसुद्यामध्ये  2024  आणि 2030 पर्यंतचा कामाचा समावेश करण्यात आला आहे 

यातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत 

1).महामार्गाच्या बाबतीत ज्याप्रमाणे सुवर्णभूज चतुष्कोण तसेच पूर्व पश्चिम मार्ग आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे , त्या धर्तीवर देशातील चार  प्रमुख महानगरे असणारे दिल्ली मुबई , चेन्नई कोलकात्ता एकमेकांशी किमान 160 किमी प्रति तास या वेगाने चालणाऱ्या रेल्वे गाड्यांचा माध्यमातून जोडणे . 

2) देशातील मालवाहतुकीतील रेल्वेचा सध्याचा असणारा 27%  वाढवून 45% आणणे 

3) सध्या मालवाहतुकीच्या रेल्वेचा सध्या असणारा वेग 22 किमी तास असणारा वेग वाढवून  50 किमी प्रति तास  करणे 

4) महतवाचा रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद करणे 

5)सन  2023 डिसेंबर 23पर्यंत रेल्वेचे संपूर्णतः विद्युतीकरण करणे 

6)रेल्वेची वाटचाल अधिकाधिक ग्रीन एनर्जी अर्थात  शून्य कार्बन  इमिशनकडे करणे . 

7)रेल्वेकडे असणाऱ्या पायभूत सोयीसुविधांचा 100% वापर करत खखोळंबल्या उपाययोजनाला गती आणण्यासाठी प्रयत्न करणे 

8)2050 पर्यंत वाढणाऱ्या रेल्वेच्या प्रवाशी आणि मालववाहतुकीच्या बोज्याचे आकलन करून ती गरज पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करणे 

9) सार्वजनिक खासगी भागीदारीतून ( public  private partnership { PPP})च्या माध्यमातून रेल्वेच्या अधिकाधिक विकास करण्याबाबत नियोजन करणे 

10 ) रेल्वेला सन  2030 पर्यंत  आर्थिक स्थैर्य आणणे . 

आपली सध्याची भारतीय रेल्वे वेगाने बदलत असल्याचे यातून दिसत आहे  आपण सध्या बघत असणारी भारतीय रेल्वे आपली मुले आणि नातवंडे बघणार माहिती . त्यांना आपण अनुभवत असणारी रेल्वे रेल्वेच्या संग्रालयातच बघायला मिळणार याचीच ही नांदी म्हणायला हवी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?