साहित्य संमेलन आणि मी !

   

  मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या आणि साहित्यावर विशेष परीणाम असणाऱ्या लोकांसाठी विशेष महत्तवाचे असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे94 वे साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे निश्चित झाले आहे. मार्च 2021मध्ये  जेव्हा  जंगलात वसंत ऋतूमुळे विविध फुले फुलली असतील तेव्हा नाशिकच्या  साहित्य पंढरीत 94 व्या साहित्य संमेलनामुळे मराठी  साहित्याला नवीन धूमारे फुटत असतील. 
        या साहित्य संमेलनात मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेच्या विविध समस्येवर चर्चा  आयोजित केल्या जातात. जसे मराठी माध्यमांचा शाळा, वाचनालयाची स्थिती, मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण वगैरे , हे आपणास  माहिती असेलच. मात्र या विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेच्या दरम्यान एका महत्तवाच्या विषयावर फारसे विचारमंथन होताना आपणास दिसत नाही, तो विषय म्हणजे विज्ञान कथांचे मराठी साहित्यविश्वातील स्थान .            डाँ. जयंत नारळीकर यांनी मराठीत नावारुपाला आणलेल्या या साहित्यप्रकारात डाँ. श्रीनिवास आपटे यांनी देखील विपूल लेखन केले. मात्र डाँ. मोहन आपटे यांच्या निधनानंतर मराठी साहित्य विश्वासात हा लेखन प्रकार काहीसा मागे पडल्याचे माझे निरीक्षण आहे. वृत्तपत्रांच्या रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक पुरवण्यांमधील गेल्या काही दिवसातील दिवसात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचे विषय बघता हे आपणास सहजतेने लक्षात येते. नाही म्हणायला, विज्ञानातील काही संकल्पना स्पष्ट करणारी  पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.मात्र ती माहितीपर पुस्तके आहेत,ज्यामध्ये परीभाषिक संज्ञांचा वापर केला असल्याने ती काहीसी बोजड,  क्लिष्ट झाली आहेत.मात्र पारीभाषिक संज्ञांचा वापर न करता संकल्पना स्पष्ट करणाऱ्या विज्ञान कथेचा बाबतीत मराठी साहित्यविश्व काहीसे उत्साही दिसत नाही, असे माझे निरीक्षण आहे. विज्ञानकथांमध्ये परीभाषिक संज्ञा वापरत नसल्याने वैज्ञानिक संकल्पना समजण्यासाठी विज्ञानकथा अतिशय  महत्तवाची भुमिका बजावतात . ज्येष्ठांना आधुनिक वैज्ञानिक संकल्पना विज्ञानकथेच्या माध्यमातून सहजतेने समजू शकतात. मात्र मराठी साहित्य विश्वात हा प्रकार फारसा प्रसिद्ध पावलेला नाही, असे माझे निरीक्षण आहे.

     पुर्वी इंग्रजी भाषेत विज्ञानकथांमध्ये मांडलेल्या अनेक संकल्पना कालांतराने प्रत्यक्षात आलेल्या आपणास माहिती असेलच.एका अर्थाने वैज्ञांनिकांना आपल्या संशोधनासाठी त्यातूनच प्रेरणा मिळाली, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.जसे तोफेच्या गोळ्यात बसून चंद्रावर जाणे, वगैरे.
मराठीतील विज्ञान कथांंच्या विश्वात , वामन परत न आला, यक्षाची देणगी, प्रेषित, अभारण्य या सारख्या डाँ. जयंत नारळीकर यांनी लिहलेल्या कथासंग्रह कांदबऱ्यांनी हा प्रकारसुद्धा विक्रमी संख्येने वाचला जाउ शकतो, हे सिद्ध केले आहेच. गरज आहे,ती नव्या विज्ञानकथा लिहण्याची, त्यावर या साहित्य संमेलनात चर्चा होईल, अशी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?