वंदन दुर्लक्षीत रघूनाथरावांना

   

आपल्या मराठी लोकांचा इतिहासाकडे नजर टाकल्यास मराठी भाषिकांचा इतिहास दोन रघूनाथरांवांशिवाय पुर्ण होणे अशक्यच. त्यातील एकाला खलनायक असुनही अमाप प्रसिद्धी मिळाली. दुसऱ्या रघूनाथरावांचे कार्य अतूलनीय असून देखील जिवंतपणी आणि मृत्यूनंतर देखील त्यांचा वाटेला उपेक्षाच आली. खलनायक असणारे रघूनाथराव म्हणजे रघूनाथराव पेशवे.तर अत्यंत गौरवास्पद कार्य करुन देखील उपेक्षीत राहिलेले रघूनाथराव म्हणजे गणिताचे प्राध्यापक असणारे श्रेष्ठत्तम समाजसेवक रघूनाथराव धोंडो कर्वे.1888 जानेवारी14 ही त्यांची जन्मतारीख ,म्हणजेच आज 2021 साली त्यांची 133 वी जयंती. त्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा .
        ज्या काळात महिलांचे देखील आरोग्याचे काही प्रश्न असतात, कुटुंबनियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे, याची कल्पना करणे देखील सर्वसामान्य जनतेच्या गावीही नव्हते, अश्या काळात, या विषयांवर समाजात जागृती करण्याचे कार्य  त्यांनी केले. त्यासाठी प्रसंगी बंदीवास देखील भोगला. मात्र कितीही संकटे आली तरी आपल्या तत्वापासून कसुभरही ढळले नाहीत. अविरतपणे ते आपले कार्य करत राहिले. फक्त लोकांना समाजसुधारणेचे धडे देयचे, मात्र स्वतःच्या आचरणात त्या गोष्टी करायचा नाहीत, या प्रकारचे समाजसुधारक ते नव्हते. त्यांनी स्वतःवर देखील कुटंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली . आपल्या65 वर्षाच्या आयुष्यातील (निधन1953आँक्टोबर  14) सुरवातीची बालपणाची वर्षे वगळता कायम त्यांनी कायम महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला. 

            समाजाकडून त्यांना कायम उपेक्षाच मिळाली. अमोल पालेकर यांनी त्यांचा आयुष्यावर चित्रीत केलेला "ध्यासपर्व " हा चित्रपट आणि  त्यांचा आयुष्याचा संघर्षावर बेतलेले एक नाटक हाच त्यांचा तो काय सम्मान .ते ज्या जातीत जन्मले, त्या ब्राह्मण जातीत सुद्धा त्यांचा कायम अनादरच करण्यात आला . समाजात अश्लिलता पसरवतात,म्हणून त्यांचावर खटला देखील ब्राह्मण जातीतील व्यक्तिंनी भरल्याचा इतिहास आहे. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या सारखीच उपेक्षा त्यांचा वाटेला आली.
आज आपण समाजात जे अनेक प्रश्न,जसे गरीबी, मुलभूत संसाधनावर अतिरीक्त ताण, स्त्रीयांचे विविध आरोग्यविषयक प्रश्न, त्यांची विविध ठिकाणी विविध प्रकारे  होणारी आरोग्याची (शारिरीक, मानसिक दोन्ही अंतर्भूत), आर्थिक स्तरावरची कुंचबणा मिळणारे मर्यादित स्वातंत्र्य या सर्वांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा या प्रश्नांवर मुलभूत कार्य करणाऱ्या रघूनाथ धोंडो कर्वे यांचे कार्य लक्षात येते.नाही म्हणायला पुण्यातील एका वर्दळीचा रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र त्यांचे कार्य रस्त्याला नाव देण्यातच बंदिस्त न करता, त्यांचे कार्य यापुढे तरी पुढे नेण्यात येईल, अशी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो,

जाता जाता सर्वांना मकर संक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?