नांदी 46 व्या अमेरीकी अध्यक्षाची

   

  विविध घटनात्मक, आणि अवैध उपाय अमंलात आणून सुद्धा आपली डाळ शिजत नाही, हे लक्षात आल्याने, अखेर विविध परपरांना तिलांजली देत, 20 जानेवारी 2021 रोजी अमेरीकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सुत्रे जाँन आर. बायडन यांच्याकडे सुपुर्त केली, आणि एका वादगस्त पर्वाची अखेर झाली. 
       डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादगस्त पर्वाची सुरवात त्यांचा निवडीपासूनच झाली. लोकांचा जनाधार(पाँप्युलर वोट) विरोधी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना असून देखील इलेक्ट्रोर जास्त संख्येने निवडून आल्याने राष्ट्रपतीपदाची माळ गळ्यात पडलेल्या (याच मुद्यावरुन जाँन बायडन राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत.)  डोनाल्ड ट्रम्प यांनी सुत्रे हाती घेताच  डेमोक्रेटीक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, सेक्रेटरी आँफ स्टेट (आपल्या परराष्ट्र मंत्र्याचा समकक्ष )पदावर कार्यरत असताना सरकारी कामासाठी खासगी इमेल वापरले.ज्यामुळे देशाची सुरक्षीतता धोक्यात आली. त्यामुळे त्यांना तूरुंगात टाकण्याची भाषा केली.  डोनाल्ड ट्रम्प यांचा सगळाच कार्यकाळ वादगस्त ठरला. त्यांना निवडून आणण्यामागे रशियाचा हात आहे, असाही आरोप त्यांच्यावर  झाला.46 व्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार यांच्या विरुद्ध सत्तेचा गैरवापर करत भुतपुर्व युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असलेल्या मात्र सध्या स्वतंत्र्य देश असलेल्या युक्रेनच्या पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा आरोप देखील त्यांचावर झाला. आपल्याला अवघड ठरतील असे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना, माध्यमांना जाहिरपणे  अपमानास्पद वागणूक देणाऱ्या मेस्किकोचा सीमेलगत असणाऱ्या राज्यांचा विरोधअसताना मेस्किकोच्या  सीमेवर भिंत उभारणाऱ्या , (यामुळे अमेरीकेत राष्ट्रीय आणिबाणी जाहिर करावी लागली) एकाच कारकिर्दीत दोनदा महाभियोगाच्या कारवाईला सामोरे गेलेला, बेछूट विधान करणारा, आक्रमक व्यक्तीमत्वाचा , हेकेखोर स्वाभावाचा, बदलत्या हवामानात काही कृती करण्याबत टाळाटाळ करणारा, अमेरिकेचे नागरीकत्व इतर देशातील नागरीकांना देण्याबाबत कमालीचा निरुच्छाही असणारा राष्ट्राध्यक्ष म्हणून जग डोनाल्ड ट्रम्प यांना ओळखेल. 

       नव्या अध्यक्षाला मेस्किको देशातून तसेच लँटिन अमेरीकेतून येणाऱ्या  निर्वासीतांचा लोंढा, अमंली पदार्थाचा पुरवठा या देशांतर्गत प्रश्नाबरोबर अफगाणिस्तान , इराण या देशातून सैन्य माघारी बोलवणे, चीन बरोबरचे व्यापारी युद्ध , हवामान बदलाबाबत उपाययोजना करणे. आदी प्रश्नावर कार्यवाही करावी लागेल. त्या पाश्वभूमीवर त्यांना सरस कामगिरीसाठी शुभेच्छा दिसू सध्यापुरते थांबतो , नमस्कार 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?