पुर्व चिनी समुद्र आणि मेकाँग नदी वादाची नवी ठिणगी

               

गेल्या आठवड्याभरात चीन हा मुद्दा भारतीय माध्यमांमध्ये विशेषत्वाने चर्चिला गेला. या मुद्द्यांची चर्चा करताना भारतीय माध्यमांमध्ये भारत चीन सीमावादाबाबतच बोलले गेले. मात्र भारतीय माध्यमे चीनबाबतच्या सीमावादाबाबत वार्तांकन करत असताना चीनबरोबर इंडो चायना भागातील देशांचा (आग्नेय आशिया )मेगाँक या नदीवरुन वाद सुरू होता. चीनच्या जलविद्यूत प्रकल्पामुळे मेगाँक नदीतील पाण्याचा प्रवाह  अचानक सुमारे 50%कमी झाल्याने या देशांनी चीनबाबत नाराजी व्यक्त केली. याबरोबर चीनने भारताबरोबर सीमा वाद उकरुन काढत असताना तैवान (अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना, अर्थात आर ओ सी ){अधिक माहितीसाठी आपण ज्याला चीन म्हणतो त्याचे अधिकृत नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना अर्थात पि आर सी आहे} या देशाच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्र वाहुन नेणारी विमाने पंधरा विमानाच्या गटाने दोनदा दाखल करुन आपण काय करु शकतो, याची जगाला झलक दाखवली. दुर्देवाने आपल्या भारतीय माध्यमांमध्ये या विषयी फारसे बोलण्यात आले नाही. मला सिंगापूर सरकारची मालकी असणाऱ्या चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीमध्ये याविषयक बातमी दिसली. ती आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन .

                 तर मित्रांनो चीनच्या म्यानमार आणि भारत या देशाला लागून असणाऱ्या प्रांतात मेगाँक नदी उगम पावते, आणि चीन , म्यानमार , थायलंड व्हितनाम , लाओस ,कंबोडिया या देशात वाहत जावून पुढे समुद्राला मिळते. या नदीतून थायलंड कंबोडिया या देशातून जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.तसेच  त्याचा हद्दीतील सर्वच नद्यांवर अजस्त्र म्हणता येतील असे जलविद्युत आहेत. त्याच प्रमाणे याही नदीवर अजस्र  असा विद्युतप्रकल्प आहे . जो नदीच्याच नावाने ओळखला जातो . त्या नदीमध्ये डिसेंबर 2020 च्या शेवटच्या आठवड्यापासून अचानक अचूक बोलायचे झाल्यास 47% कमी वाहत असल्याचे दिसून आले . या बाबत इंडो चायना भागातील देशांनी तपास केला असता चीनने मेगाँक जलविद्युत प्रकल्पात प्रचंड प्रमाणत पाणी साठवल्याने हे घडल्याचे लक्षात आले . चीनने आपण जलविद्युत प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी   हे करत असल्याचे जानेवारीच्या दोन तारखेला जाहीर केले हा प्रकार ते 24 जानेवारीपर्यंत करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले मात्र नदीच्या खोऱ्यातील अन्य देशांच्या मते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून हा नदीपात्रातून कमी पाणी वाहण्याचा प्रकार घडला आहे .ही हि नदी चीन खेरीज अन्य देशांसाठी खूपच मह्त्वाची आहे थायलंड देशातील बऱ्याच मोठ्या प्रमाणतील लोकांच्या उपजिवीकेचे साधन या नदीवर अवलूंबून आहे . अन्य देशातील लोकसुद्धा दळणवळणासाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलूंबून आहेत . नदीतील पाणी अचानक 47% कमी झाल्याने या सर्वांवर विपरीत परिणाम होणार आहे  काही देशांना जलवाहतूक करता येणार नाही  
आता बघूया दुसरी बातमी 

चीनच्या मुख्य भूमीमध्ये सन 1949 कम्युनिष्ट पक्षाचे सरकार आल्यावर तेथील आधीच्या सरकारने चीनच्यास मुख्य भूमी शेजारील एका बेटावर राजाक्षय घेतला . तेच बेट म्हणजे आपण ज्याला तैवान हा देश म्हणतो ते बेट.  सन 1949 पासून दोन्ही देश आम्हीच मुख्य चीन असून अन्य भूभाग आमचा फुटीर भाग असल्याचे म्हणत आहेत . त्यामुळे त्यांच्यात सातत्याने विवाद होत असतो . त्याचाच एक अध्याय गेल्या आठवाड्यात रचला गेला , जेव्हा पीआरसी चीनने तैवानच्याहवाई हद्दीमध्ये  दक्षिण पूर्व  भागातून  क्षेपणास्त्र वाहुन नेणारी विमाने पंधरा विमानाच्या गटाने दोनदा दाखल केली . चीनच्या मते तैवान हा त्यांच्याच भाग असल्याने त्यांनी दुसऱ्या देशावर आक्रमण केलेले नाही . मात्र अमेरिकेच्या मते त्यांचे पूर्व चिनी समुद्रातील मित्र देशावर हा  आक्रमणाचा प्रयत्न होता . हा ;लेख लिहीत असताना अमेरिकेने चीनला पुन्हा असेकरू नये नाहीतर तो आमच्यावरील हल्ला समजण्यात येईल अश्या शब्दात निर्वाणीचा इशारा दिला आहे . चीन आणि अमेरिकेतील विस्तवाचा पुढील अंक म्हणून या कडे बघता येईल . 
            स्वामी विवेकानंद यांनी भारतातून अमेरिकेत जात असताना चीनमार्गे ( स्वामी विवेकानंद यांची बोट श्रीलंका आग्नेय आशिया, चीन  जपान मार्गे अमेरिकेला गेली )जात असताना त्यांनी चीन हा निद्रिस्त ड्रॅगन आहे ,जेव्हा हा जागा होईल तेव्हा जगाची झोप उडवेल अशे विधान केले होते . सध्याचे चीनचे वर्तन बघता ही भीती खरी ठरत आहे असे वाटतेमात्र जगात प्रत्येक कृष्णकृत्याची शिक्षा कधीना काडी मिळतेच , तशी चीनला देखील मिळेलच तो दिवस लवकरत लवकर येवो आणि जागचे कल्याणहोवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?