खगोलशास्त्रातील अदभूत शोधाची कहाणी !

       

   सध्या आपल्या भारतात कृषी कायद्यामुळे, तसेच पेट्रोल दरवाढीमुळे देश ढवळला जात असताना, खगोलशास्त्रज्ञांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. मराठी माध्यमांतून याविषयी फारच कमी माहिती दिली जात असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .
      तर मित्रांनो खगोलशास्त्रांना आपल्या पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर क्वार्ससचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण क्येसार JO313_1806 असे केले आहे. सन 1950 मध्ये मानवास क्येसार ही संकल्पना माहिती झाल्यापासून  आतापर्यत शोधलेल्या क्येसारमध्ये हा क्येसार सर्वात लांबचा क्येसार आहे. हा क्येसार इतका तेजस्वी आहे की याला 13अब्जाच्या ऐवजी 100 प्रकाशवर्षे दूर ठेवले तर हा क्वार्स सुर्याइतका प्रकाशीत दिसेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या क्येसारची प्रकाशमानता +7.7 इतकी निर्धारीत केली आहे. शास्त्रज्ञांनी या क्येसारची निर्मिती विश्वनिर्मितीनंतर 6लाख 70 हजार  वर्षापुर्वी निर्मिती झाली असावी, असा कयास बांधला आहे. Cerro Telolo Inter American वेधशाळेच्या Bianco 4 या दुर्बिणीमार्फत हा क्येसार शोधला गेला आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी दिर्घीका आणि अतीप्रचंड कृष्णविवरांची निर्मिती कशी झाली? यावर या क्सेसार च्या अभ्यासाने प्रकाश पडु शकतो, असे शास्त्रज्ञांना वाटते. एका अतिप्रचंड  कृष्णविवरातून याला उर्जा मिळत असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

        क्येसार हा अवकाशातील अत्यंत गुंतागुंतीचा प्रकार आहे. अत्यंत छोट्या जागेतील अत्यंत प्रकाशमान खगोलीय वस्तू म्हणजे क्येसार होय. जेव्हा क्येसार हा प्रकार मानवास माहिती झाला, तेव्हा शास्त्रज्ञास हा  तेजोमेघ आहे, असे वाटले. मात्र सखोल अध्ययनानंतर हा प्रकार तेजोमेघापेक्षा वेगळा असल्याचे दिसून आले. आणि त्यास क्येसार असे नाव मिळाले. तीव्र स्वरुपाच्या चुंबकीय शक्तीमुळे अतीतीव्र स्वरुपाच्या कृष्णविवारांमुळे  ,क्येसार  खुपच मोठ्या प्रमाणात प्रकाशमान होतो. हे कालांतराने संशोधनातून स्पष्ट  झाले. मात्र त्याची रचना नक्की कोणत्या प्रकारची आहे, याबाबत शास्त्रज्ञांना अजूनही खात्रीदायक माहिती मिळालेली नाही. खगोलशास्त्रज्ञ अजूनही याबाबत संशोधन करत आहे. 
आतापर्यतचा खगोलशास्त्रातील अत्यंत महत्तवाचा शोध म्हणून या शोधाकडे बघता येवू शकते.विश्वनिर्मितीबाबतच्या आतापर्यतची सर्व संकल्पना या शोधामुळे बदलल्या जावू शकतात. माझा यासारख्या नवनवीन शोधाची माहिती आपणापर्यत देण्याचा प्रयत्न असेलच .तूर्तास इतकेच,नमस्कार.
(या लेखासाठी द हिंदू आणि बिबीसी च्या संकेतस्थळावरील लेखांची मदत घेतली आहे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?