चीनचा विळखा

      

आपल्या भारताच्या पुर्वेकडे असणारा जगातील क्षेत्रफळाने तिसरा मोठा देश, आपला प्रमुख शत्रू ,आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असणारा देश म्हणजे चीन. हा चीन आँक्टोपस ज्याप्रमाणे आपल्या सभोवतालचा प्रदेशात आपले पाय पसरवून आपले भक्ष्य भक्षण करतो. त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या सभोवताली आपले जाळे पसरत आहे, हे आपणास ज्ञात आहेच. नुकतेच या चीनरुपी आँक्टोपसने रम्य ही स्वर्गाहुन लंका या भावगीतात वर्णन केलेल्या लंकेला अर्थात श्रीलंकेला आपला विळखा घातला आहे.
           तर मित्रांनो, द हिंदू या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनूसार श्रीलंकेने त्यांचा अति उत्तरेकडे असणाऱ्या जाफना या प्रातांतील तीन बेटांवर चीनला विद्युत प्रकल्प उभारण्यास 18जानेवारी रोजी मंजूरी दिली आहे. या तीन बेटापैकी आकाराने सर्वात मोठे असणारे बेट तामिळनाडूपासून फक्त 26.997 नाँटिकल मैल किंवा 50 किमी अंतरावर आहे.(नाँटिकल मैल हे समुद्रातील अंतर मोजण्याचे अंतर आहे. एक नाँटिकल मैल म्हणजे 1.85 किमी)आणि हे कोणत्या स्थितीत घडतेय? तर  कर्ज न फेडता आल्यामुळे श्रीलंकेचे हंबनपोट्टा हे बंदर श्रीलंकेने 99 वर्षासाठी चीनला दिले आहे. यावरुन श्रीलंकेत असंतोष आहे, असे कारण देत श्रीलंकेने भारत आणि जपान संयुक्तरीत्या विकसीत करत असणाऱ्या कोलंबो बंदराचा पुर्व भागाचे काम श्रीलंकेने दोघांकडून 2 फेब्रुवारी रोजी काढून घेतल्यावर.

          चीनच्या बाबतीत ही गेल्या महिन्याभरातील  दुसरी बातमी होती. या आधी चीनमध्ये उगम पावून म्यानमार , थायलंड कंबोडिया ,व्हितनाम या देशातून वहात जाणाऱ्या नदीचा प्रवाह अचानक कमी केल्याने हे देश चीनवर नाराज होतेच .आणि हे कमी का ? म्हणून कमी की काय ? म्हणून चीनने त्यांचा प्रमुख शत्रू असणाऱ्या तैवान या देशाविरुद्ध छुपे युद्ध सुरु केले आहे . चीनने तैवानच्या सावभौमित्वाखालील असणाऱ्या मात्र चीनच्या हद्दीपासून जवळच असणाऱ्या एका बेटानजीक वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु केले आहे . ज्यामुळे तैवानच्या त्या बेटाच्या नैसर्गिक परिसंस्थेला धोका उत्पन्न झाला आहे . चीनचे असे वागणे म्हणजे एखाद्या दुबळ्या राष्ट्रविरोधात सातत्याने छोट्या छोट्या कारवाया करून त्यांना आपणस हवे तस्यां वटाघाटी करण्यास भाग पडण्याचा प्रयत्न म्हणता येईल असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे . 
            चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणे अत्यावश्यक असल्याचे या गोष्टीतून दिसत आहे .  जगभरातील ताकदवान देश यासाठी प्रयत्न करतीलच , किंबहुना जगभरात असे प्रयत्न सुरु पण झाले आहेत .गरज आहेर त्यात गती आणण्याची तीपण लवकरात लवकर येईल अशी मनोमनी कल्पना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?