मी बघीतलेला बदलता ग्रामीण महाराष्ट्र

     

मनुष्याला अनुभवातून, प्रत्यक्ष बघून जे ज्ञान होते. ते शंभर पुस्तके वाचून होणाऱ्या ज्ञानापेक्षा कैकपटीने उत्तम असते, असे आपणाकडे म्हटले जाते.याचा अनुभव मी नूकताच 14 फेब्रुवारीरोजी केलेल्या नाशिक ठाणे प्रवासादरम्यान घेतला. तो आपणापर्यत पोहोचवून आपणास देखील त्यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आजचे लेखन .
    तर मित्रांनो, गेल्या रविवारी 14 फेब्रुवारी रोजी मी फिरण्याचा उद्द्येश्याने नाशिक -जव्हार - भिवंडी -ठाणे - इगतपूरी -नाशिक असा एसटीने चक्री मार्गाने प्रवास केला. या सबंध प्रवासात रस्ता छोटा असो अथवा मोठा असो तूरळक अपवाद वगळता सर्व रस्ते खड्डे विरहीत होते. अगदी मोखाडा, वाडा, या आदीवासी समजल्या जाणाऱ्या भागातील रस्तेसुद्धा खड्डेविरहीत होते. तसेच पुर्वी या भागातील ज्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत असे, त्या ठिकाणी जसे, भिवंडी शहर , कल्याण फाटा आदी सर्व ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधीकरण (MMRDA) च्या माध्यमातून उड्डाणपूल बांधून नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका केली आहे. ज्यामुळे वाहतूक सुद्धा जलद झाली आहे. जलद वाहतूक झाल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होत आहे, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. ठाणे शहरात देखील नाशिकपेक्षा कमी खड्डे आढळले. 

रस्त्याबरोबर मला या प्रवास्यात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाडा तालूक्याचा अपवाद वगळता सर्वत्र वनाच्छादान अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. वाडा आणि भिवंडी  तालूक्यात रस्ता काहीसा खराब होता. तसेच नागरीकरणाचा स्पर्श झालेल्या या तालूक्यात काहीसे वनाच्छादन कमी आढळले. विक्रमगड तालूक्यात वनांचा प्रकार बदललेला आढळला. त्र्यंबकेश्वर , मोखाडा जव्हार, या तालूक्यातील जंगले सदाहरीत होती तर विक्रमगड तालूक्यातील जंगले पानगळीच्या प्रकारातील होती. तसेच विक्रमगड तालूक्यापासून हवेतील कोरडापणा वाढलेला जाणवला. 
भिवंडी शहरात मात्र स्वच्छता कमी प्रमाणात आढळली.  भिवंडी शहरातील उड्डाणपुलाखाली बऱ्याचा मोठ्या प्रमाणात राडारोडा पडलेला आढळला. ठाणे शहर मात्र प्रचंड स्वच्छ आढळले त्याबद्दल होणे प्रशासनास मानावेच लागेल . 
मी पूर्वी दर रविवारी फिरायला जात असे .शनिवारी ऑफिसमधून सुटल्यावर सरळ बसस्टॅण्डवर जाऊन प्रवास  असे शनिवारी रात्री प्रवेश करून रविवारी पहाटेदुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्यावर दिवसभर त्या ठिकाणी फिरून सायंकाळी पुन्हा माघारी फिरून सोमवारी नित्यक्रम सुरु करत असे . मात्र कालांतराने त्यात खंड पडला . आता मी तो उपक्रम पुन्हा सूर करत आहे . पूर्वी इतका रेग्युलर नसेल मात्र  महिन्यतावुन एखादा रविवारी मी नक्की बाहेर जाईल त्या त्यावेळी मला जाणवलेल्या गोष्टी त्यावेळीतुम्हाला सांगेलच तूर्तास  इतकेच नमस्कार 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?