बदलत्या हवामानाचा फटका !


आपल्या भारतात इंधनाच्या वाढत्या किमतीने लोकांचे जगणे अवघड केले असताना, पृथ्वी गोलाचा विचार करता आपल्या भारताच्या जवळपास दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अमेरीकेतील आकाराने आणि अर्थव्यवस्थेचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असणाऱ्या टेक्सासमध्ये हवामानाने तेथील जनतेचे जगणे नरकप्राय केले आहे. तिथे अत्यंत हाडे गोठवणाऱ्या थंडीत घरे गरम करणाऱ्या हिटरसाठी आवश्यक असणाऱ्या वीजेचा अभूतपुर्व तूटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिण्याचे पाणी देणाऱ्या पाइपलाईनला तडे गेल्याने काही भाग पाण्यापासून वंचित आहे. अचानक वीजेची मागणी प्रचंड वाढल्याने तेथील वीज वाहण्याची यंत्रणा मोडून पडली आहे. त्यामुळे काही भागातील वीज गेली आहे. परीणामी काही रुग्णालयातील रुग्णांना उपचाराविना घरी सोडण्यात येत आहे.  आणि हे घडतेयं जगातील महत्त्वाची महासत्ता असलेल्या अमेरीकेत . आणि याला कारणीभूत आहे, गेल्या कित्येक वर्षात पडली नाही असी थंडी.

ही तीच अमेरीका आहे, जी दरदोइचा विचार करता जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करते.मात्र देशपातळीचा विचार करता चीन आणि भारत हे आमच्या इतकेच कार्बन उत्सर्जन करतात, त्यांनी स्वतःवर बंधने लादून घेतल्याशिवाय आम्ही बदलत्या हवामानाविषयी काहीही सकारात्मख पाउले उचलणार नाही, असे म्हणत पँरीस  अँग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यास विरोध करणारी. किंबहूना जागतिक हवामानबदल हा नैसर्गिक बदल आहे,पृथ्वीच्या इतिहासात असे बदल सातत्याने होत आहेत. मानवाच्या काहीही हस्तक्षेप नसताना हे बदल झाले आहेत, सबब  मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवामान बदल  होतो  वगैरे समजूती खोट्या प्रगतीला मारक आहे, असा समज ज्या देशातील एका मोठ्या व्यक्तीसमुहाचा आहे , तो देश .
आजमितीस हवामान बदलामुळे अत्यंत मेटाकुटीला आला आहे. मात्र या चित्रात या पुढे सकारात्मक बदल होईल, असे वाटते. जागतिक राजकारणाचा विचार करता जगातील अन्य देशांना मोठ्या प्रमाणात सतावणारी समस्या जो पर्यत अमेरीकेला सतावत नाही, तो पर्यत ती समस्याच अस्तिवात नसते. आणि इतर देशांना खुप आधीपासून सतावणारी समस्या आता अमेरीकेलाही सतावत आहे.तसेच सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अमेरीकेची पँरीस करारावर सही करण्यास अनुकूल भुमिका घेत आहे. त्याचप्रमाणे ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात त्याच डेमोक्रेटीक पक्षाचे पुर्वीचे अमेरीकेचे उपाध्यक्ष  अल् गोर यांनी या बाबत केलेले कार्य .सबब यापुढे हवामानबदलाविषयी भरीव कार्य होण्यास प्रचंड वाव आहे. याच आशावादावर मी तूमची रजा घेतो, नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?